Skip to main content

पौर्णिमा..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 13/04/2009 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
हृदयांत रंगलेल्या खेळात येशील का? हा डाव प्रीतिचा गं तू पूर्ण करशील का? बघ मागतो तुला मी आकाश चांदण्याचे मज आस पौर्णिमेची तू चंद्र होशील का? पाऊस घेत हाती मल्हार छेडतो मी, होऊन धार मजला, तू चिंब करशील का? दिवसांत कैकवेळा घेतो मिठीत तुजला होऊन रातराणी श्वासात उरशील का? भिजल्या अनेक रात्री बघ आठवांत तुझिया ओलावल्या मनाने मज तू स्मरशील का? दिधले मला सखे तू उद्दिष्ट जीवनाचे ते ध्येय पूर्ण करण्या तू हात धरशील का? हे पाहिले तुझ्या मी, डोळ्यांत स्वप्न माझे घेऊन ते उराशी साकार करशील का? - प्राजु
Taxonomy upgrade extras

भीमाशंकर : खांडस मार्गे.

लेखक हर्षद आनंदी यांनी सोमवार, 13/04/2009 05:24 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण तीन वर्षांपुर्वीची गोष्ट. पुण्यातील स्.प. महाविद्यालयाजवळ मास्टेक कंपनीचा बीपीओ होता, तिथे मी संगणक अभियंता म्हणुन कार्यरत असताना, तेथील काही हौशी तरुणांनी एकत्र येउन गिरीभ्रमण कंपू स्थापन केला. त्यांच्या पहिल्या गिरीभ्रमणाचे यश बघुन, मी सुध्दा त्यांच्या कंपुत सामील झालो. काही नवखे, काही अनुभवी असे आम्ही सह्याद्रीत भटकंती करायला सिध्द झालो. लोहगड, राजमाची असे सोपे किल्ले सुरवातीला केल्यावर जरा अवघड म्हणुन "भीमाशंकर" करायचे ठरले. आमच्या पैकी बरेच जण आधी गाडीनी जाउन आल्यामुळे तसे फार काही अवघड नसल्याच्या भ्रमात होते.

सागर किनारी...

लेखक उमेश कोठीकर यांनी सोमवार, 13/04/2009 05:22 या दिवशी प्रकाशित केले.
सागर किनारी दोघेच असावे बोलता बोलता मिठीत शिरावे मिठीत शिरून लटके रुसावे प्रेमाच्या आर्जवी खुदकन हसावे खुदकन हसूनी भुलावे झुलावे रुपेरी वाळूत पाउल नाचावे नाचत हळूच हात हे गुंफावे स्पंदन प्रेमाचे हृदयी ऐकावे हृदयी ऐकावे डोळ्यांत बघावे निळुल्या पाण्यात डुंबुनी यावे डुंबता डुंबता श्वास हे दुणावे ओठांचे अमृत ओठांत शिरावे ओठांत शिरूनी गुलाबी जगावे स्वप्नांच्या गर्भाचे बीज तू व्हावे!
Taxonomy upgrade extras

बस इतकंच सांगायचंय

लेखक धनंजय यांनी सोमवार, 13/04/2009 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
बस इतकंच सांगायचंय . फ्रीजमधे होते ते दही मी खाऊन टाकले - संपवले . बहुधा तू ते होतेस जपले विरजणासाठी उद्याच्या . मला माफ कर, ते मस्त होते किती मलईदार अन् किती गार . --- हे पुढील कवितेचे रूपांतर आहे : --- This Is Just To Say . I have eaten the plums that were in the icebox . and which you were probably savin
Taxonomy upgrade extras

एग बिर्याणी

लेखक मितालि यांनी सोमवार, 13/04/2009 02:36 या दिवशी प्रकाशित केले.
एग बिर्याणी वरळी मुम्बईला कुठेतरी एका लहानश्या होटेल मधे ५५ रु. ला ही एग बिर्याणि उत्कृष्ट मिळते. तशी बनवण्याचा प्रयत्न केलाय. छान बनली म्हणुन पाककृती देतेय.. पाककृती: २ उकडलेली अंडी चिरून दोन दोन तुकडे करून घ्या. १ वाटी बासमती तान्दळाचा जीरे, शाहिजीरे, लवंग, मिरी, दालचीनी, मसाला वेलची, साधी वेलची, तमालपत्र, हळद, मीठ , तुप घालून मोकळा भात शिजवून घ्या. १ मोठा कांदा बारीक़ चिरून तेलावर परतून घ्या.

मनातला चैत्रं...!!!

लेखक स्मिता श्रीपाद यांनी रविवार, 12/04/2009 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळा सुरु झाला...कडक उन्हं पडायला लागली..मोगर्‍याचे गजरे...कैरीची डाळं-पन्हं या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली की माझं मन १०-१२ वर्ष मागं धावतं...दरवर्षी एप्रिल मे च्या सुमारास मला माझी उन्हाळ्याची सुट्टी आठवते..माझं कर्‍हाड आठवतं..कृष्णाबाईचं देउळ आठवतं...आमचा लाडका घाट आठवतो..आणि सगळ्यात तीव्रतेने आठवतो,तो म्हणजे चैत्रातला कृष्णाबाईचा उत्सव...!!! आमचं कर्‍हाड हे तसं छोटंसच गाव....(म्हणजे आता पुण्यात रहायला लागल्यापासुन मला कर्‍हाड छोटं वाटतं...:-) ) दोनचं मुख्य बाजारपेठा....आणि त्याच्या आजुबाजुला पसरलेली वसाहत

प्रवीण महाजनचा "माझा अल्बम'

लेखक अन्वय यांनी रविवार, 12/04/2009 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत प्रवीण महाजन याच्या पुस्तकातील अंश लोकसत्तात वाचायला मिळाले. वाचून धक्का बसला. ही वस्तुस्थिती असेल काय, अशी शंकाही आली. सत्य काय ते प्रमोद आणि प्रवीण महाजन यांनाच माहिती असेल. आता प्रमोद महाजन नाहीत; पण प्रवीण आहे. त्याने आपली कैफियत मांडली आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4391117.cms http://beta.esakal.com/2009/04/12113323/Home-Pravin-Mahajans-biograp.ht…

कोणास ठाउक...!

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 11/04/2009 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाचाही जयघोष करावा इताका मी लहान नाही.. कुणाचाही उपमर्द कारावा इतकाही मी महान नाही..! मी असा एक पांथस्त आहे , जो शोधतो आहे मार्ग , अंतःस्थ होण्याचा.. कधी पासुन.. ? कोणास ठाउक..! कारण... मला कधीच नाही सापडलं या गर्दीत माझ अस्तित्व.. अन तरी ही मी सामिल होतो त्या गर्दीत अधुन मधुन.. का .. ? कोणास ठाउक..! मी सापडलो आहे द्वंद्वात जीवन मरणाच्या.. कारण मला वाटते आदर्शां बद्दल आदरयुक्त भीती.. पण कळत नाही कशी रोखु माझी नैतिक अवनती.. हीणकस स्वार्थपरता.. हि लालसा खदखदती... मला वाटतं हा लढा मी हारणार.... मी लढता लढता असाच मरणार.. कधी..? कोणास ठाउक..!!!
Taxonomy upgrade extras

*जालिंदर जलालाबादी :- आरती महास्पर्धा*

लेखक बाकरवडी यांनी शनिवार, 11/04/2009 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
*जालिंदर जलालाबादी :- आरती महास्पर्धा* आजकाल जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, अंतर्जाली, मनोमनी (आणि मिसळपाव वर)सगळीकडे जालिंदर बाबा यांची चर्चा चालू आहे. याकाळात लोकांना आलेले अनुभव आणि वाढत जाणारी भक्तसंख्या आपण सर्व जाणताच ! त्यामुळे आम्ही जालिंदर जलालाबादी बाबा यांची आरती लिहीण्याची स्पर्धा जाहीर करत आहे. तरी सर्व कवींनी , विडंबनकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.
Taxonomy upgrade extras

मृत्योर्मां अमृतं गमय !

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 11/04/2009 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
सुर्य उगवताना खुप सुंदर दिसतो , पण त्याही पेक्षा सुंदर दिसतो मावळताना , कारण तो देतो दशदिशांना... उद्याच्या सुर्योदयाची ग्वाही...! सरणावर मरण जळतांना , कुणीतरी नाजुक ढुश्या देत असतं मातेच्या गर्भालाही...!! मृत्योर्मा अंमृतं गमय .. याचा अर्थ हाच असावा बहुधा...!!!!
Taxonomy upgrade extras