णमस्कार्स लोक्स,
आपण टिव्हीवर चित्रपट पहात असालच. काही चित्रपट आवडतात, काही नाही आवडत, खरे की नाय ?
पण एखादा चित्रपट डोक्यात गेला , तर कधी तो पुन्हा पघायचा येडचापपणा टाळतो! खरे की नाय ?
पण केबल वर पण रोज नवनवे चित्रपट कुढनं दाखवणार ? मग आपण चॅणल चेंज करतो ..खरे की नाय ?
माझ्या ओळखीतल्या एका इसमाने त्याचं पोरगं अभ्यास करत नाही म्हणून , "लव्ह ष्टोरी २०५० " हा चित्रपट दररोज एकदा, ह्या दराने सलग तीस दिवस दाखवला होता, त्या पोराची जी दातखिळी बसली आणि ते जे अभ्यासाला बसलं ते डायरेक्ट १०वी बोर्डाची परिक्षा पाहिल्यावरंच उठलं .. शाळेत पैलं आलं हो ते ..