Skip to main content

विडंबन पुर्ण करा

लेखक निशिगंध यांनी शनिवार, 25/04/2009 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
गारवा माहीतच असेल ना...... पुन्हा तात्यांनाच सांगायचे.. पुन्हा तात्यांनाच सांगायचे.. कुणाचे कीती प्रतीसाद काटायचे..

एकमत

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 25/04/2009 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
जिंका हारा पाडा झोडा एकमताने सत्ता येता लोणी चापू एकमताने टांगायाची बाकी आहे वेशीवरती अब्रु लुटूया जत्रेनंतर एकमताने देश आमचा तरुणाईचा पहा झोपला म्हातारे पोलाद म्हणवती एकमताने सत्तेसाठी सोडले पहा कमरेचेही नागवा म्हणती समोरच्याला एकमताने सत्तेच्या सर्कशीत नाहि मजा राहिली विदुषकांनी केला गोंधळ एकमताने सारे लढती खुर्चीसाठी प्राणपणाने वार्‍यावरती देश सोडला एकमताने तरीही वेड्या आशेने मत देतो आहे राज्य स्वतःचे चालवेन या एक मताने -ऋषिकेश
Taxonomy upgrade extras

फिक्शन...

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 25/04/2009 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
वेगाने होणारे शहरीकरण , तन्त्रज्ञानातील बेसुमार प्रगती याचा परिणाम ५० वर्षांनी (कदाचित) असा झालेला असेल.. त्यावेळच्या बाप- लेकाचे संवाद या कवितेत व्यक्त करण्याचा प्रयत्न....

मराठी,...... पण इन्ग्रजाळलेले

लेखक रमण यांनी शनिवार, 25/04/2009 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. आजच्या म.टा. मधील एका दहावी इयत्तेतील विद्यार्थ्याने लिहिलेला मराठी भाषेविषयीचा लेख जरुर वाचा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4446591.cms#write (राधारमण कीर्तने)

सौजन्याची ऐशी तैशी. भाग-२

लेखक शितल यांनी शनिवार, 25/04/2009 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ कालच्याला आपण दिंडोरे आन यादव फॅमिलीला भेटलो.. आता त्या यादवाच्या उजव्या अंगाला राहतुया दावणे कुटुंब. तर ह्या दावण्याच्या फॅमिलीला आम्ही वाड्यातील समदी मंडळी "कोळसा फॅमिली" म्हणतुया. आता त्यासणी तसा का म्हणत्यात ते सांगायची गरज नाय हाये तुम्हासणी तवढं तुमासणी बुध्दी असलच. तर बघा पाव्हणं, ह्या कोळसा फॅमिलीत बी चार लोक हायेत. कोळसा-कोळसी आणि त्यांची दोन पोर, एक पोरग, आणि एक प्वॉर. तुम्हासणी म्हणुन सांगतो पाव्हण, ह्यो कोळसं खानदान त्यांच थोबाड गोरं व्हण्यासाठी काय काय करित न्हायती तेवढं इचारा.

कमिलिऑन

लेखक पॅपिलॉन यांनी शनिवार, 25/04/2009 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा ते मावळतीच्या शेजार्‍याघरीं बालेकिल्ला बांधत होते - तेव्हा ते होते पवित्रभूमिरक्षक! जेव्हा ते उगवतीच्या शेजार्‍याला रक्तबंबाळ करीत होते - तेव्हा ते होते शहीद व्हायला निघालेले स्वातंत्र्यसैनिक! आता त्यांच्या बंदुका रोखल्यात आमच्यावरच - हो, खरे आहे - ते आहेत दहशतवादी!!
Taxonomy upgrade extras

सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 24/04/2009 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या लाडक्या सचिन तेंडूलकरचा आज वाढदिवस ! यानिमित्याने आपण सर्व जण सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात ! क्रिकेट मधील जे काही विक्रम अजून शिल्लक राहिले असतील ते त्याच्या कडून पुर्ण होतील यात शंका नाही. ( सगळ्यात जास्त शुन्यावर बाद होण्याचा विक्रम अजुन बाकी आहे ना?

क्षितीज

लेखक निशिगंध यांनी शुक्रवार, 24/04/2009 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
क्षितीज दुरुन फार छान दिसते, म्हणुन त्याकडे नुसते पहायचे नसते. तर त्याला आपण गाठायचे असते.. सुर्य चंद्र जिथे रोज उगवतात, तिथे आपणलाही एक दिवस पोहचायचे असते. म्हणुन त्याला आपण गाठायचे असते.. जितके आपण पुढे पळू तितके तेही पळते, पण आपण मुळीच कंटाळायचे नसते. तर त्याला आपण गाठायचे असते.. खुप लोक असेही असतात जे मागे ओढतात, पण आपण क्षितीजाचेच ध्येय ठेवायचे असते.

दैवी दान

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 24/04/2009 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
वेदना ही आज माझी - अंतरीची साद आहे देह माझा चंदनी अन चित्ती तुझा नाद आहे । जगताना जगले असे मी ध्यास तुझा घेउनी उमगले अंती आता - श्वास माझा तूच आहे । दिवस चालती काळोखाला सांगाती घेउनी रवी-शशी नभी असता अंधाराचे नाव आहे । सतत वर्षती अमृतधारा परोपरी धरेवरी अंतरी स्मरणांचा धगधगणारा दाह आहे । वाटेवर चालता मिळे काटेरीच पखरण ही रंग गंधी फुलाफुलांचा गाव तर दूर आहे । चांदण्यांची शुभ्र फुले - वेचियली मी येथे भंगलेल्या स्वप्नांचा त्या आज मला शाप आहे । डोळ्यांनी माझीया आजही, घात माझा केला सांगितले सार्‍यांना की दुः खाचा हा घाव आहे । र्‍हुदयीच्या जखमा अशा अलवार मी त्या जपल्या ब