Skip to main content

छान

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी मंगळवार, 09/06/2009 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
नाव माहिती नाही पण चेहर्‍यातला गोडवा खूपच भावला म्हणून टाकला फोटो.

अंतराळ

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 09/06/2009 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
अंतराळ हा तुझाच, पंख तुला स्वप्नांचे चंद्रबिंब प्रतिभेचे, तारांगण शब्दांचे या विशाल अंबरात उंच उंच विहरत जा साद देतसे दुरून आमंत्रण पक्ष्यांचे वाजते दिशांमधून मंद धून वा-याची, इंद्रधनू गुणगुणते भावगीत रंगांचे शांत या जलाशयात नाव बुडे किरणांची, भांडारच जणु लुटले कुणि सुंदर रत्नांचे पंखांवर नभ तोलुन मानस वाचत फिरते, बंधमुक्त पाखरू तुझ्या ऋणानुबंधांचे मनकवड्या पाखरास गुपित मुळी सांगु नको, अवघ्या काही क्षणांत होईल ते विश्वाचे!
Taxonomy upgrade extras

स्वप्न

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 09/06/2009 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
(ॠणनिर्देशः हिंदीत,मराठीत,आणि इंग्रजीत लिहिणारे कवी आणि "वाचून बघा" ह्या ब्लॉगचे लेखक श्री.

एंजल्स & डेमन्स ...

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 08/06/2009 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
डॅन ब्राऊनच्या गाजलेल्या व अत्यंत आवडलेल्या "दा विंची कोड" ह्या चित्रपटानंतर ज्याची आतुरतेने वाट पहात होतो तो "एंजल्स & डेमन्स" काल चित्रपटगॄहात जाऊन पाहिला, त्याच्या आधीच पुस्तक मिळवुन पुर्वाभ्यास केला होता त्यामुळे चित्रपट पहाताना जास्त मज्जा आली ... जरुर आणि जरुर पहावा असा हा चित्रपट आहे. टीप : स्पॉयलर्स नाहीत, बिनधास्त वाचा ...

आंतरराष्ट्रीय सौजन्य!!!

लेखक प्राजु यांनी सोमवार, 08/06/2009 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
गाडी चालवणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. अमेरिकेत आल्यावर गाडीशिवाय पर्याय नाही हे लक्षात येताच मी परवाना मिळवला आणि गाडी चालवायला लागले. गेलं दिड वर्ष मी कुठेही न धडपडता लोकांना सुखाने गाडी चालवू देते आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या तुळतुळीत रस्त्यांवरून. सांगायचा मुद्दा असा की इतके दिवस माझ्या गाडी चालवण्याबद्दल कोणीही आक्षेप घेतला नाही.. मात्र चालवून झाल्यानंतर गाडी लॉक करण्याबद्दल मात्र एका चायनीज माणसाने सॉल्लीड आक्षेप घेतला (त्याला आपण 'ली' म्हणू). सांगते ... त्याने माझ्या कार लॉक करण्यावर आक्षेप घेतला कारण सेकंदाचा १० वा भाग इतका वेळ वाजणार माझ्या गाडीचा लॉक होतानाच हॉर्न.

हबीब तन्वीर

लेखक मुक्तसुनीत यांनी सोमवार, 08/06/2009 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
ख्यातनाम हिंदी नाटककार , दिग्दर्शक , आणि अभिनेते हबीब तन्वीर यांचे सोमवारी भोपाळ येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. "आग्रा बझार", "चरणदास चोर" इत्यादि प्रसिद्ध हिंदी नाटके त्यांनी लिहिली आणि केली. स्वातंत्र्यपूर्व काळात मार्क्सिस्ट विचारांनी प्रभावित असलेल्या पीढीचे ते महत्त्वाचे साक्षीदार असे म्हणता येईल. त्यांनी "नाटक" हाच एक ध्यास घेतल्यासारखे संपूर्ण आयुष्य काढले. त्याना अनेक पुरस्कार मिळाले. - १९६९ सालचा "संगीत नाटक अकादेमी पुरस्कार" - १९८३ साली पद्मश्री - २००२ साली पद्मभूषण याशिवाय अन्य अनेक विदेशी पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला होता.

तुझा हळवा पाऊस

लेखक जयवी यांनी सोमवार, 08/06/2009 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ह्या कवितेला देवकी पंडितांचा स्वरसाज लाभलाय "सारे तुझ्यात आहे" ह्या अल्बम मधलं हे गाणं !
Taxonomy upgrade extras

शाळेचा पहिला दिवस

लेखक जागु यांनी सोमवार, 08/06/2009 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासुन माझ्या मुलीची शाळा चालू झाली त्यावरुन सुचलेल्या ह्या ओळी. मुलीचा शाळेचा पहिला दिवस सुखदशी धावपळ आणि गोंधळ तिचं शाळेसाठी उत्सुक मन डबा दप्तर नविन मित्रगण देवापाशी वाकून केलेला नमस्कार अन थोरा-मोठ्यांचा मिळालेला आशिर्वाद आई-बाबांचं बोट अन काळजाची साथ विद्यामंदीरात भवितव्याची ही पहीली पहाट
Taxonomy upgrade extras