भांडा सौख्यभरे!!
गोष्ट जरा नाजुक आहे. अडचणीची आहे. खासगीतली आहे. पण सांगणं मनोरंजक आहे. शेअरिंगनं दुःख हलकंच होणार आहे. मनावरचा ताण कमी होणार आहे. खटके कमी होण्याची संधी मिळणार आहे.
घरात भांड्याला भांडं लागण्याचे प्रसंग काही नवे नाहीत. नव्याची नवलाई संपल्यानंतर, कधी संपायच्या आधीच, तर कधी सुरूही व्हायच्या आधी घरात या वाक्युद्धाला सुरवात होते. चूक कोण, बरोबर कोण, याला अर्थ नसतो. भांडण्याची खुमखुमी जिरवणं महत्त्वाचं असतं. आपल्या भांडण्याच्या मुद्द्याला काही विशेष अर्थ नाही हे कळत असतं, पण आयत्या वेळी माघार घेणं परवडणारं नसतं. मग कधीतरी टिपलेली निरीक्षणांची हुकमी अस्त्रं बाहेर काढली जातात.
मिसळपाव
