[रोजचीच गोष्ट.]
मित्रः काय रे काय गोंधळ चाललाय आज जंगलात?
मी: काय नाय रे कोणी तरी श्वापद परत आलंय म्हणे.
मित्रः च्यायला! मग एवढी पळापळ कसली? जंगलात काय श्वापदं कमी आहेत काय?
मी: मुर्ख आहेस! अरे निम्मे बुरखा पांघरलेले, काही नुसतेच खाजगीत गुरकावणारे. काही उगाच गरीब सश्यांवर वगैरे फोक उगारणारे, काही नुसत्याच जंगलनीतीच्या सभा घेणारे, काही नखांची धार गेलेले अन काही दात पडलेले. मग आता फुकटात काही लचके तोडायला मिळताहेत तर कोण सोडील?
मित्रः काय कळलं नाय राव!
मी: कीती दिवस झाले तुला जंगलात येउन? तु फक्त तमाशा बघायचा अन हा ला हा जोडायचा, काय समजलास?
मित्र: अरे पण साला कोणाला हा जोडायचा हे कसे कळणार?
मिसळपाव
