Skip to main content

सर्जरी १

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 14/07/2009 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
'अवलिया गेला "ह्या लेखावर सर्जरी झाली. १२ तासानंतर ५१ प्रतिसादानंतर. तो लवकर उडाला नाही ह्याचे मला आश्चर्य वाटले. मिभोभौ नी आपली ' अधिक माहीती साठी प्रभु मास्तरला भेटा' ही सिग्नेचर सुरु केल्यापासुन माझ्या व्य. नी वर ताण वाढला आहे. (विनंती नंतर आता ही सिग्नेचर मागे घेतली आहे) अर्थात आधी पण तसे येत होते. तसाच एक व्य. नी. आला होता.फोन नंबर ची विचारणा झाली.

काही क्षण...

लेखक दशानन यांनी सोमवार, 13/07/2009 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
काय हरवले ? कसे सांगू काय हरवले ते ! काही क्षण... तुझा स्पर्श.. तुझा गंध... व कोठे तरी तुला देखील.. * हे असेच असते माहीत असून देखील अनोळखी मार्गावर मी नेहमीच पाऊल टाकतो काय मिळते मला काय माहीत पण सुखाच्या काही क्षणासाठी मी माझे प्राण देखील टाकतो.. वाटेवर.. सरळ चालणे मला जमतच नाही.. काय करु जन्माची खोड.. आता सुटेल लवकरच.. असाच कुठला तरी क्षण मला ही घेऊन जाईल बरोबर जशी तु गेलीस.. कळत नकळत. * कधी तरी असाच ... ग्लास हाती घेऊन बसतो मी.. कुठले तरी गाणे पीसीवर चालू असते... व कळत न कळत आश्रु डोळ्यातून. सवय आहे आजकाल मला त्याची.. सुखाची सावली असो वा दुखःची झळ... माझ्यासाठी तूच..

महाराष्ट्रभूषण "श्री.मंगेश पाडगावकर"

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी सोमवार, 13/07/2009 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आपणांस कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की दि.१९ /०७ /२००९ रोजी दु. ४.०० ते रात्रौ ९.३० या वेळेत ठाणे येथे " लक्ष्मी केशव कार्यालयात " सुप्रसिद्ध कवी महाराष्ट्रभूषण "श्री.मंगेश पाडगावकर" यांचा ( स्वत: ) कवितावाचन आणि मुलाखत असा कार्यक्रम ’लोकमत सखी मंच’ तर्फ़े आयोजित करण्यात आला आहे. रसिकांनी जरूर याचा लाभ घ्यावा. कार्यक्रम विनामूल्य आहे. स्थळ : लक्ष्मी केशव कार्यालय , प्रताप सिनेमा समोर, कोलबाड रोड , खोपट . ठाणे (प).

जातपंचायत

लेखक प्रसन्न केसकर यांनी सोमवार, 13/07/2009 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
२००३च्या मे महिन्यातली दोन तारखेची ती दुपार. टळटळीत उन्हामुळे घराबाहेर पडुच नये असे वाटायला लावणारी. भरदुपारी मी मात्र बातम्या शोधत फिरत होतो. माझ्या धंद्याला अन संपादकाला शिव्या घालत अन अश्या उन्हात छानपैकी पंखा, एसी वगैरे लावुन एखाद्या थंड खोलीत बसुन काम करणार्‍या किंवा घरीच बसुन वामकुक्षी करणार्‍या सार्‍या जगाच्या नावाने मनोमन खडे फोडत. असाच फिरता फिरता गेलो क्राईम ब्रँच मधे अन समोर दिसली एसीपी शिंदेंची केबिन. एसीपी शिंदे बरोबर माझे तसे चांगले संबंध. त्यांनी कंजारभाट समाजातल्या लोकांना दारु गाळणे वगैरे बेकायदा धंदे सोडुन द्यावे म्हणुन त्यांनी केलेले काम मी पाहिले होतेच.

निशाणी..! :)

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 13/07/2009 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मायबाप मिपाकरांनो, राम राम! आपण सगळे राजकारणी नसून सामान्य कष्टकरी जनता आहोत हे किती छान आहे! पण समजा आपण एक अपक्ष राजकीय उमेदवार आहोत आणि निवडणुकीला उभे आहोत तर आपली निशाणी काय असेल बरे? :) त्या करताच हा धागा. इथे प्रत्येकाने आपापली आवडती निवडणूक निशाणी सांगायची आहे, जमल्यास तिचे चित्रही द्यायचे आहे. मिपाकरी जनता निवडणुकीला उभी असती तर तिची काय निशाणी असती हे समजून घ्यायची मला उत्सुकता आहे म्हणून हा धागा. तेवढीच जरा गम्माडीजंमत! :) हम्म, आता माझी निशाणी - चपला!

राजा शिव छत्रपती शिर्षक गीत

लेखक नानबा यांनी सोमवार, 13/07/2009 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
स्टार प्रवाह वाहिनीवर "राजा शिव छत्रपति" मालिका लागते, त्याच्या शिर्षक गीताचे शब्द हवे आहेत.... ही रचना माझ्या माहितीत कवि भुषण यांची आहे..... त्याचे शब्द अतिशय सुंदर आहेत पण जलद संगीतामुळे शब्द समजून घेण्यात अडचण होते.

(काणा)

लेखक पॅपिलॉन यांनी सोमवार, 13/07/2009 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा काण्याचं बघणं सगळीच गंमत छावीला पटवताना थेरडीची फसगत!
काव्यरस

सखा

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 13/07/2009 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
मत्त मी, मदमस्त मी आषाढीचा जलद मी साद घालतो उधाणवारा ...........पाऊस माझा सखा ! धुंद मी, मृदगंध मी वरुणाचा वर्षाव मी वळवाचा तो थेंब साजीरा ...........पाऊस माझा सखा ! मी धरा, दंवाचा थेंब मी घनगंभीर आकाश मी बेधुंद बरसती वर्षा धारा ...........पाऊस माझा सखा ! तृप्त मी, आश्वस्त मी पाऊसवेडा चातक मी मनमोराचा फुले पिसारा ............पाऊस माझा सखा ! विशाल.
काव्यरस