Skip to main content

महाराष्ट्रभूषण "श्री.मंगेश पाडगावकर"

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी सोमवार, 13/07/2009 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आपणांस कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की दि.१९ /०७ /२००९ रोजी दु. ४.०० ते रात्रौ ९.३० या वेळेत ठाणे येथे " लक्ष्मी केशव कार्यालयात " सुप्रसिद्ध कवी महाराष्ट्रभूषण "श्री.मंगेश पाडगावकर" यांचा ( स्वत: ) कवितावाचन आणि मुलाखत असा कार्यक्रम ’लोकमत सखी मंच’ तर्फ़े आयोजित करण्यात आला आहे. रसिकांनी जरूर याचा लाभ घ्यावा. कार्यक्रम विनामूल्य आहे. स्थळ : लक्ष्मी केशव कार्यालय , प्रताप सिनेमा समोर, कोलबाड रोड , खोपट . ठाणे (प).

वाचने 3350
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

कार्यक्रम उत्तमच शिवाय ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिपाकट्टादेखिल भरवता येईल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

वा वा हे तर एकदम भारी होईल. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

मंगेश पाडगावकर यांचे काव्यवाचन म्हणजे एक जिवंत अनुभवअसतो. ते बोलतात ते सुद्धा एक काव्यच असते. रसीकांनी याचा जरुर लाभ घ्यावा. अवांतर: एका वेळी एकच कार्यक्रम करावा. भेसळ झाली तर आस्वाद घेता येत नाही. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

In reply to by पाषाणभेद

पण सखी च्या सख्यांनी यावे की न यावे ? आल्यास दंड होईल का? मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

नक्की येणार..! या निमित्ताने मिसळपाव परिवारातर्फे पाडगावकरांना एखादी छानशी भेटवस्तू किंवा शाल-श्रीफळ देण्यास मला आवडेल! :) त्यानंतर लहानशी मद्यपार्टी करू. पाडगावकरसाहेब त्याही पार्टीला अवश्य उपस्थित राहतील अशी त्यांना विनंती करू.. :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

फस्स्क्लास प्लॅन!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आम्ही पोलिस बिनतारी विभागाला सलाम ठोकला तेव्हा पाडगावकरांची सलाम आठवली. ऐका प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.