झोपडपट्टी ही
तोडावया हवी
झाली मज घाई
सौंदर्याची
उगारले हात
शेवटचे शस्त्र
विनाशाचे अस्त्र
कोसळले
रोडरोलर ते
खोपट्याशी नेले
शिव्याशाप दिले
जमावाने
पहिले खोपटे
तोडूनिया देता
होईल शांतता
कायमची
इतक्यात तिथे
मजला दिसली
उभी भांडीवाली
आमचीच
त्याच गर्दीत हो
माझा वॉचमन,
बघतो रोखून
माझ्याकडे
बायको मुलांच्या
उभा बरोबर
माझा ड्रायव्हर
घोळक्यात
माझ्या तान्ह्याला जी
आंघोळ घालते
आज ती रडते
घरासाठी
अचानक माझ्या
मनी काय आले
यंत्र बंद केले
शांतपणे
अर्थ श्रीमंतीचा
क्षणात बदले
मनात पसरे
संभ्रमच
ह्या झोपडपट्ट्या
कशा तोडायच्या
खूणा श्रीमंतीच्या
तिच्याकडे
माझ्या श्रीमंतीच्या
खूणाच पुसल्या
म्हणू कसा मला
श