Skip to main content

इन्कम टॅक्स समन्स..मदत/सल्ला हवा आहे.

लेखक कानडाऊ योगेशु यांनी सोमवार, 24/08/2009 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
मी काही वर्षांपूर्वी(२००६ पर्यंत) डोंबिवलीला राहत होतो आणि मी माझ्या पॅन कार्डवर तिथलाच पत्ता आहे. २००६ पर्यंत इन्कम टॅक्स मी नियमित पणे कल्याणच्या ऑफिसात भरत होतो. २००६ पासुन मी बेंगलोर मध्ये आहे आणि त्यानंतरचा इन्कम टॅक्स मी सी.ए.

नारळी पेढा

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 24/08/2009 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : एक वाटी ओले खोबरे ( खवलेले) ,एक वाटी गूळ ( पिवळा) , वेलदोडा , जायफळ. कृती : एक वाटी ओले खोबरे घ्यावे. फ्रायपॅनमध्ये ते गरम करण्यास ठेवावे . त्यापेक्षा किंचीत कमी गुळ खवून घ्यावा. हा फ्राय पॅन मध्ये खवलेल्या खोबर्‍यात मिसळावा. गॅस मध्यम आचे वर ठेवून थोड्या थोड्या वेळाने मिश्रण हलवावे. थोड्यावेळाने मिश्रण घट्ट होण्यास सुरवात होईल. गुळाचा रंग नारळास लागून मिश्रण गुलाबी केसरी होईल. घट्ट झाले की त्याचे त्यात किंचीत जायफळ पावडर घालावी. व पेढ्यासारखे गोळे बनवावे. थाळीत ते वाळत घालावेत. त्यावर वेलदोडा पूड पसरावे. जायफळा ऐवजी व्हॅनीला इसेन्स वापरला तरी चालतो.

गणपती चे नैवेद्य....

लेखक दिपाली पाटिल यांनी सोमवार, 24/08/2009 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
आता गणेश चतुर्थी निमित्त घरोघरी मोदक बनत असतील पण गणपती ला फक्त मोदकांचाच नैवेद्य दाखवतात की अजुन ही काही असतं,?? आणि इच्छुकांनी आपापली पाकृ सगळ्यांसोबत शेअर केली तर माझ्यासारख्यांना मदत ही होईल आणि नविन काहीतरी बनवुन ही पाहता येईल... :) मी बर्‍याचदा असे मोदक करते ,मोदक हे मोदक लगेच बनतात फक्त मोदकांचा साचा भारतातुन आणावा लागतो आणि बाकी आपले ओल्या नारळाचे सारण भरुन उकडीचे मोदक किंवा सुक्या नारळाचे सारण भरुन तळणीचे मोदक.मी एकदा आंब्याच्या रसातले मोदक पाहीले होते पण खाल्ले नव्ह्ते , तसे नक्कीच चांगले लागत असावेत... :)

चंद्रदर्शन?

लेखक नम्रता राणे यांनी सोमवार, 24/08/2009 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश चतुर्थी दिवशी चंद्रदर्शन करु नये असा समज आहे. सदर चंद्रदर्शन हे चुकुन टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील छायाचित्रात झाले तर त्रास होतो का? जाणकार यावर मार्गदर्शन करतील का?

जिवाचा मोहम्मद अली रस्ता...!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 24/08/2009 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, तसे आम्ही उत्सवप्रेमी. सध्या गणेशोत्सवाचा आनंद साजरा करतो आहोत. गणेश हा आमचा माता, पिता, सखा, बंधू, सर्व काही..! आज भल्या पहाटे आमच्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, छानशी पूजा केली, आणि मोदकांच्या प्रसादाचं जेवण यथेच्छ जेवलो... परंतु तसे आम्ही सर्वच धर्मांवर, त्यातील सणा-उत्सवांवर, खाण्यापिण्यावर मनापासून पिरेम करणारे एक हौशी रसिक! आज सायंकाळी काही कामानिमित्त मुंबैच्या मोहम्मद अली रस्त्यावर जाणं झालं आणि आम्ही त्या रस्त्यावर साजर्‍या होणार्‍या मुस्सुलमानांच्या रमझान सणात रमलो आणि तेथेच काही काळ रेगाळलो.

डार्वीन चा सिद्धान्त असाही

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 23/08/2009 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा असेच सहज चिन्तन करताना आपली संस्कृती आणि अर्वाचिन विज्ञान असा विचार करत होतो. विचारामागून विचार अशी गाडी चालली होती. कशाची कशास लाहीच लिंक नव्हती. अचानकच सुचत गेले डार्वीन चा सिद्धान्त आपल्या पुराणात कोठे सांगितला आहे? मग नीट संगती लागत गेली. आपल्या पुरानात सांगितलेले सर्व अवतार हे डार्वीनच्या सिद्धान्तानुसार आहेत. सर्वप्रथम पृथ्वीवर केवळ पाणीच होते भगवन्ताचा प्रथम अवतार फक्त पाण्यात रहाणारा मत्स्य अवतार आहे त्यानन्तर प्लवक शैवाल अशा छोट्या वनस्प्पती निर्मान झाल्या . प्लवक शैवाल खाणारा प्राणी कासव .

असंच, सहजंच....

लेखक प्रभाकर पेठकर यांनी रविवार, 23/08/2009 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाईन फ्ल्यू मुळे 'यज्ञकर्म' बंद ठेवावं लागलं आणि हाती आलेला मोकळा वेळ सत्कारणी कसा लाववा ह्यावर मित्रांसमवेत खलबत सुरू झालं. एक मतानं ठरलं की कोल्हापूरला जाऊया. झालं ठरलं. दुसर्‍याच दिवशी सकाळी साडेसातला कोल्हापुरास प्रयाण केले आणि ठिक साडे-अकराच्या सुमारास कोल्हापुरात पोहोचलो.
आता कोल्हापुरची सुरुवात कुठून करणार? अर्थात 'फडतरे मिसळ'.

टॅलेंट सर्च कंटिन्यूज.. मॅसेच्युसेट्स मधली दाक्षिणात्य अनुषा

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 23/08/2009 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
या वेळी सापडलीय मॅसेच्युसेट्सची एक बहुतेक कानडी सात-एक वर्षांची चिमुरडी, अनुषा (ती कदाचित तामीळही असू शकेल, इथली 'विकास' वगैरे मंडळी बहुतेक खात्री करू शकतील). मला ती सापडली, ते लता मंगेशकरांचं मोगरा फुलला यू ट्यूब वर load होत नव्हतं म्हणून 'दुधाची तहान ताकावर' या न्यायाने समोर आलेल्या व्हिडिओवर क्लिक केल्यावर.

II राजे II

लेखक प्रभो यांनी रविवार, 23/08/2009 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वेतिहास : दि. २१.०८.२००९ . श्रावण कालच संपलेला....विकांताचा बेत असा ठरलेला की राजेंच्या राजधानीस भेट द्यावी. थोडक्यात ठरलेला बेत असा....भाड्याने रथ (पक्षी चारचाकी) घेउन सकाळ सकाळ (पहाटेचे ५.३०) राजेंच्या राजधानी साठी कूच करायचे. राजेंचे दर्शन घेउन संध्याकाळी घरी परत. पुर्वेतिहास समाप्त दि.