मी काही वर्षांपूर्वी(२००६ पर्यंत) डोंबिवलीला राहत होतो आणि मी माझ्या पॅन कार्डवर तिथलाच पत्ता आहे.
२००६ पर्यंत इन्कम टॅक्स मी नियमित पणे कल्याणच्या ऑफिसात भरत होतो.
२००६ पासुन मी बेंगलोर मध्ये आहे आणि त्यानंतरचा इन्कम टॅक्स मी सी.ए. करवी बेन्गलोर ओफिसातच भरत आलेलो आहे.(नक्की कुठे ते सी.ए च जाणे पण माझ्या कडे आय.टी.आर पावत्या आहेत.)
परंतु काल मला डोंबिवलीहुन फोन आला की माझ्या नावे इन्कम टॅक्सचे समन्स आलेले आहे आणि मला २७ ऑगस्ट ला इन्कम टॅक्स ऑफिसात २००६-२००९ दरम्यानचे फॉर्म १६,आय.टी.आर,सॅलरी डिटेल्स घेवुन हजर राहायला सांगितले आहे.(ते पत्र बेंगलोरच्या पत्त्यावर पाठवायला सांगितले आहे.अजुन मिळाले नाही.मिळाल्यावर त्यातील डिटेल्स कळवेन.)
इथल्या सहकार्यांना विचारल्यावर असे कळाले की मी पॅन कार्डावर पत्ता अपडेट न केल्याने असे झाले आहे.
मी पहीला टॅक्स जिथे भरला त्या इन्कम टॅक्स वॉर्ड ऑफिसरला २००६-२००९ पर्यंत माझ्या पॅनकार्डसंबंधी काहीच हालचाल (टॅक्स भरणे) न दिसल्याने त्याने असे समन्स बजावले असेल.
मला काहीच कळेनासे झाले आहे.
ह्यावर कुणी काही मदत करु शकेल का? अथवा सल्ला देवु शकेल का?
(२७ ऑगस्ट ला मुंबईत येणे सध्यातरी अशक्य दिसत आहे.)
-(चिंतीत) योगेश
वाचने
3110
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
इनकम टॅक्स समन्स
समन्स की नोटीस?
समन्स ?
धन्यवाद
इन्कम टॅक्स मी सी.ए. करवी बेन्गलोर ओफिसातच
कंपनीला
In reply to इन्कम टॅक्स मी सी.ए. करवी बेन्गलोर ओफिसातच by कुंदन
टीडीएस
In reply to कंपनीला by कानडाऊ योगेशु