Skip to main content

एका चर्चासत्राच्या निमित्ताने...

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 29/08/2009 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
एका चर्चासत्राच्या निमित्ताने... परवाच(*) पुण्यातल्या एका नामवन्त वधूवर-सूचक मंडळाने आयोजित केलेल्या एका चर्चासत्राला उपस्थित राहिलो होतो. चर्चासत्रासाठी एक ज्योतिषी व एक डॉक्टरीण बाई आमंत्रित म्हणून उपस्थित होते. या चर्चेत आयोजकांनी विवाह जुळवणे ही सामाजिक समस्या कशी बनते ही बाजू मांडली. विवाहाच्या आरोग्यविषयक शंकांचे समाधान डॉक्टरीणबाईनी केले. याशिवाय लग्न जुळण्यात पत्रिकेचे असलेले अनन्यसाधारण साधारण स्थान लक्षात घेता, त्याविषयीचे संभ्रम दूर करण्याचे काम ज्योतिषीमहोदयांनी केले. एकंदर चर्चा अतिशय उद्बोधक झाली.

तिखट विषय, बोथट शब्द

लेखक धनंजय यांनी शनिवार, 29/08/2009 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
मागे इथल्या पुस्तकांच्या जत्रेत नगरसेविका जॅकी स्मिथ यांचे नांव कवितावाचनाच्या फलकावर पाहिले, आणि कुतूहल वाटले. आमच्या या नगरसेविका गेल्याच वर्षी पुन्हा निवडून आल्या होत्या. वाटले, "वा! बाई कविता सुद्धा करतात तर." म्हणून नवकवींचे कवितावाचन ऐकायला तिथेच थांबलो. नवकवींच्या कविता वाचण्यापेक्षा त्या ऐकाव्यात. कवीला गल्लीतल्या बारीकसारीक गोष्टींबद्दल वाटणारी खरीखुरी आपुलकी छापील पानावर क्षुल्लक वाटू शकते. पण कोरड्या शब्दांत नसतो तो गहिरा भाव आवेशातून जाणवू शकतो. अशाच एकदोन कवींनी कविता म्हटल्या, मला त्या खूप आवडल्या. जॅकीबाईंची पाळी आली. सभेतली धिटाई, आत्मविश्वास हा राजकारणपटूच्या ठायी असतोच.

त्रंबकेश्चर

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 29/08/2009 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
या श्रावणातील चौथ्या सोमवारी त्रंबकेश्चर ला गेलो होतो. गावात मंदिराजवळ पाऊस होता व मंदिरात कॅमेरा नेता येत नव्हता. बाहेर गर्दीचे काय फोटो काढणार? ती तर सगळीकडेच आहे. दुपारी आम्ही गंगाद्वार या डोंगरावरील ठिकाणी गेलो होतो. तेथेही सतत पाऊस चालू होता म्हणून काही फोटो काढता आले नाही. जे काही तिन चार फोटो काढले ते खाली देत आहे. गंगाद्वार च्या पायर्‍या चढतांना दिसणारा ब्रम्हगीरी चा पर्वत. याच पर्वतावर गोदावरी नदी उगम पावली आहे. श्रावणातील तिसर्‍या सोमवारी या पर्वताला सुमारे ३० ते ६० किमी ची फेरी मारतात.

कान्होजी आंग्रे

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 29/08/2009 04:49 या दिवशी प्रकाशित केले.
पुलंचे कान्होजी आंग्रे यांच्यावरचे पुस्तक वाचतांना नोट्स काढत असतांना सहज चाळा म्हणून कान्होजी आंग्रे यांचे चित्र वहीवरच रेखाटले आहे. KanhojI Aangre छाया.१ KanhojI Aangre Pic2 छाया.२

२००९ सार्वजनीक गणेशोत्सव

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 29/08/2009 04:37 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या सार्वजनीक गणपतीची आरास आम्ही अशी केली. Tukaraam Mahaaraj Sadeh Swargaat jaataat छाया. १ तुकाराम महाराज सदेह स्वर्गात जात आहेत. साधीशीच आहे. मागे तुकाराम महाराज सदेह स्वर्गात जात आहेत असा हलता देखावा आहे. गरूडाचे पंख, तुकारामांचे हात व मान हालते आहे. आजुबाजूला तुकाराम महाराजांचे केलेले अभंग, चित्रे पेंटरने (चित्रे हे पेंटरचे आडनाव नव्हे, ते बनकर आहे) काढलेले आहेत, समोर प्रसन्न श्री गणेश मूर्ती आहे. Tukaaraam Abhaang छाया.

नावडतीचे फूल

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 28/08/2009 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
गणपतीला दोन बायका होत्या. आता प्रथेप्रमाणे त्यातील एक आवडती आणि दुसरी नावडती, हे ओघाने आलेच! लालभडक जास्वंद हे गणपतीचे आवडते फूल. अगदी लाल जरी नसले तरी फिक्क्ट गुलाबी जास्वंददेखिल गणपतीला चालते. पण पिवळे? छे छे! पिवळा जास्वंद हा नावडतीचा! त्यातून हा पिवळा जास्वंदही तर्‍हेवाईक!

कुटुंब गेले कुणीकडे?...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 28/08/2009 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिकीकरणामुळे बदललेल्या विकासाच्या प्राधान्यक्रमाचा मोठा फटका महिलांनाच बसत असून, जागतिक मंदीची सर्वाधिक झळही त्यांनाच सहन करावी लागत आहे. कुटुंबाचे भविष्य निर्भर करण्याची शक्ती असलेल्या महिलांच्या सबलीकरणासाठी जगाने प्रामाणिक इच्छाशक्तीने पुढे यावे, अशी साद संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधीने जगाला घातली आहे. जागतिकीकरणामुळे विकासाचे प्राधान्यक्रम झपाट्याने बदलत असून, कुटुंबकल्याण आणि माता-बालकांच्या आरोग्याचा प्रश्‍न मागे पडत आहे. हा प्रश्‍न हाताळण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव भविष्यात आणखी गंभीर समस्या निर्माण करू शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधीने दिलाय.

पांढर्‍याचं काळं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 28/08/2009 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
त्याला खूप दिवस होऊन गेले.मी एकदा गिरगावात गेलो होतो.पॉप्युलर बूकडेपोत काही पुस्तकं चाळत होतो.विं.दा.करंदिकरांचं कवितेचं एक पुस्तक आवडलं.आलो होतो चिं.त्र्यं.च्या चानी ह्या कादंबरीसाठी.मिना साठे आणि तिचे यजमान बुकडेपोतच भेटले.माझी त्यांची फार पुर्वीची ओळख आहे.त्यानंतर आज आमची भेट झाली ती योगायोगानेच.माझी पत्नी मला म्हणाली खूप दिवस आपण खडप्यांच्या अनंताश्रमात जेवायला गेलो नाही.म्हणून आज आम्ही जायचं ठरवून आलो होतो.बाजूच्या फॅमेलीरूम मधे साठे पतीपत्नी बसली होती.साठ्यांना मासे खूप आवडतात.मीच त्यांना अनंताश्रमाची माहिती दिली होती.पापलेटची आमटी आणि तळलेल्या सरंग्याचं काप हे समीकरण त्यांना खूप आवडायच