Skip to main content

अनंत माकड प्रमेय : एक विचार मंथन

लेखक मिसळभोक्ता यांनी शनिवार, 24/10/2009 05:24 या दिवशी प्रकाशित केले.
शक्याशक्यता प्रवादात (प्रॉबेबिलिटी थियरी), "अनंत माकड प्रमेय" नावाचे एक प्रमेय आहे. थोडक्यात सांगायचे तर हे प्रमेय असे: अनंत (म्हणजे इन्फायनाईट) माकडे टाईपरायटर बडवत बसलीत, तर शेक्सपीयरचे वाङ्मय टंकू शकतात. ह्याची सिद्धता तशी सोपी आहे. टाईपरायटरच्या कळा सांत (फायनाईट) आहेत, त्यामुळे माकडाने एक विशिष्ट कळ दाबण्याची शक्यता शून्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे शेक्सपियरच्या हॅम्लेट मधली अक्षरे एका माकडाने एकामागोमाग एक टंकित करण्याची शक्यता शून्यापेक्षा जास्त आहे.

विधानसभेचे "वैभव"

लेखक विकास यांनी शनिवार, 24/10/2009 04:45 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळमधली ही बातमी वाचून नि:शब्द होण्याची वेळ आली. खाली काही भाग देत आहे...
...असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस्‌ (एडीआर) आणि नॅशनल इलेक्‍शन वॉच या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या माहीतीप्रमाणे, निवडून आलेल्या तब्बल पन्नास टक्के आमदारांवर गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप आहेत आणि त्यांच्यावरील खटले सुरू आहेत अथवा प्रलंबित आहेत. शिवाय, निवडून आलेले तब्बल ६३ टक्के आमदार कोट्यधीश आहेत.

(रिमोट)

लेखक कौतुक शिरोडकर यांनी शुक्रवार, 23/10/2009 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
(क्रांतीजीं क्षमा करतील या अपेक्षेत) त्याला माझे आरवणे रुचलेच नसावे त्याना माझे बंड कधी पचलेच नसावे शब्दांचे ते घाव बोलके, उद्धटवाणी, नाते भावातील तिथे रुजलेच नसावे बडव्याने विठठला भजावे, असली माया, वेडे गण.. त्यांना दैवत पटलेच नसावे ! त्याच्या पाट्या कशा कोरड्या? बहुधा त्यांनी सेनानींचे सल्ले पण रटलेच नसावे वर्षांचे साथी सगळे अवचित फुटलेले, आदेशावर पुन्हा कुणी फिरलेच नसावे येता जाता भाजप त्यांना डिवचत होता, त्याचे 'जीना' भाटांना कळलेच नसावे ! त्या भात्यातुन काही शर हलकेच ढापले, मी तगलो तैसे कोणी तगलेच नसावे ! मनसे म्हणतो काकापरी रिमोट व्हावे, तिथे असावे तरी कधी त्यातलेच नसावे !
काव्यरस

हम है राही प्यार के

लेखक अनुप्रिया यांनी शुक्रवार, 23/10/2009 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, ११ नोव्हेंबर २००९ ला एक खास गोष्ट आहे, पुण्यात "निषाद" च्या १९व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केली आहे सदाबहार "देव आनंदच्या" गाण्यांची 'आनंद'यात्रा........" हम है राही प्यार के......". देवच्या या 'दिल के करीब' गाण्यांची महफिल घेऊन येणार आहेत....चंद्रशेखर महामुनी. यामधले विशेष म्हणजे सॅक्स सुप्रिमो श्री. मनोहरी सिंग यांचा सहभाग व ऑडीओ विज्युअल सादरीकरण. हा कार्यक्रम ११ नोव्हेंबर २००९ रोजी "यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे" येथे रात्री ८.३० वाजता आहे. तिकीट विक्री ८ नोव्हेबर २००९ पासून सुरू होईल. तिकीटाचे दर- रू २००/- रू १५०/- रू १००/- आणि रू.

निसर्ग... रेखाटन

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 23/10/2009 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मारुती चीतमपल्लींच "जंगलाचं देणं" हे पुस्तक वाचतोय... पुस्तक छानच आहे... त्यात काही निसर्गाची रेखाटनं आहेत...

संघटनापालट

लेखक अन्वय यांनी शुक्रवार, 23/10/2009 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे राजच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता. पण दिवसभर शुभेच्छांचे फोन, प्रत्यक्ष भेटी, पत्रकार परिषद यामुळे तो थोडा थकलेला होताच. रात्री साडेसातच्या सुमारास त्याने आपल्या सचिवाला बोलावले. "हे बघ, आता मला कोणाचे फोन देऊ नकोस. मी कुणालाही भेटणार नाहीये. आराम करतो जरासा. कळलं का?'' राजसाहेबांचा आदेश घेऊन सचिव मान डोलावून निघून गेला... राज दिवाणखाण्यात आला. त्यानं सोफ्यावर अंग टाकून दिलं. समोर वडील आणि काका यांचे फोटो होतेच. ते दोन्ही फोटो न्याहाळताना त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. "बाबा असते तर, त्यांना आज किती आनंद झाला असता.'' राज स्वत:शीच पुटपुटला.

<पचन>

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 23/10/2009 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
डीस्क्लेमर : नाही प्रेरणांचा तोटा जमेल तैसा हाणा गोटा पचन तू आणि तुझं पचन.... डीम-लॅम्पच्या प्रकाशात.. हॉटेलच्या जगात गाववर भटकणारा तू... एका हाताला वाफा येत असलेलं जेवण....
काव्यरस

आठवांच्या रांगेत

लेखक कौतुक शिरोडकर यांनी शुक्रवार, 23/10/2009 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
चपला बाकड्याखाली सरकवून पुजेचे ताट तिने हातात घेतले आणि ती मुख्य दरवाज्याकडे वळली. गेटच्या दोन्ही खांबाना असलेले नळ चालूच होते. आत शिरणारे सगळेच त्याखाली आपले हात-पाय धुवून पुढे सरकत होते. तिनेही तेच केले. पुढे चार पायर्‍या उतरलं की स्टीलच्या पाईपांनी तयार केलेले 'भुलभुलैय्या' होतं. त्यात शिरायचं आणि शेवटच्या टोकाला दर्शन. ते बालसदरात दाखवतात ना... या उंदराला चीजच्या तुकड्यापर्यंत नेणारा सरळ रस्ता कुठला ? मग हाती एखादी पेन्सिल वा पेन घेऊन सुरुवात करायची. हेही तसचं. हल्ली सगळ्या देवळात असते. जिथे असा प्रकार चालू ते देवस्थान जास्त गजबजतं. त्या देवळाची टीआरपी जास्त. आज दोन ऑक्टोबर.

वाचन

लेखक कौतुक शिरोडकर यांनी शुक्रवार, 23/10/2009 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
तू आणि तुझं वाचन.... टेबल-लॅम्पच्या प्रकाशात.. कॉम्पुटरच्या जगात नेटवर भटकणारा तू... एका हाताला थंड होत आलेलं जेवण.... दुसर्‍या हाताने पुस्तकाचा फडशा पाडणारा तू... शतपावली करताना मागे बांधलेल्या उजव्या हाताने डाव्या हातातल्या साप्ताहिकाशी सलगी करणारा तू... कधी उताणा तर कधी पोटावर झोपून हलत्या पायांच्या तालावर अंक चाळणारा तू... छातीवर उघडे मासिक वाचनखूण ठेवून वाचता-वाचता निद्रिस्त झालेला तू... प्रवासात मिळेल त्या जागेत अवघडून वर्तमानपत्र हाताळणारा तू....... जिभेच्या टोकाला अनामिकेचा स्पर्श करून पानं उलटवणारा तू... .... ..... नाना तर्‍हा.... नाना सवयी....
काव्यरस