अनंत माकड प्रमेय : एक विचार मंथन
शक्याशक्यता प्रवादात (प्रॉबेबिलिटी थियरी), "अनंत माकड प्रमेय" नावाचे एक प्रमेय आहे.
थोडक्यात सांगायचे तर हे प्रमेय असे:
अनंत (म्हणजे इन्फायनाईट) माकडे टाईपरायटर बडवत बसलीत, तर शेक्सपीयरचे वाङ्मय टंकू शकतात.
ह्याची सिद्धता तशी सोपी आहे. टाईपरायटरच्या कळा सांत (फायनाईट) आहेत, त्यामुळे माकडाने एक विशिष्ट कळ दाबण्याची शक्यता शून्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे शेक्सपियरच्या हॅम्लेट मधली अक्षरे एका माकडाने एकामागोमाग एक टंकित करण्याची शक्यता शून्यापेक्षा जास्त आहे.
मिसळपाव