Skip to main content

तुमच्या आवडीचं हेरगिरीचं पुस्तक कुठलं?

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 25/11/2009 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, हेरगिरीवरचे तुमचे आवडते पुस्तक/के कुठलं? तुम्हाला ते सर्वात जास्त का आवडलं ते सांगता येईल का? एखाद्या लेखकाचा या विषयात हातखंडा आहे का? हे पुस्तक मराठी किंवा इंग्रजीतील असावं. मी अश्या तर्‍हेची पुस्तके कधीच वाचलेली नाहीत मात्र आता एक चौकशी झाली तेव्हा मी काहीच बोलू शकलो नाही. मग म्हटलं मिपाकरांकडून मदत घ्यावी. तर तुम्हाला आवडलेलं हेरगीरीवरचं सर्वात चांगलं पुस्तक कुठलं? तसेच याच विषयावरचा उत्तम चित्रपट सुध्दा सुचवू शकता. -- नीलकांत

बुधवारची कविता: (प्रतिसाद का टिकेना)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी बुधवार, 25/11/2009 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कवितेची प्रेरणा टंकतानाही का ना टीकेना शब्द आता सांग ना तेच सारे ताव आणि त्याच सार्‍या वल्गना हाणामार्‍या त्याच त्या की, वारही हो तेच ते तेच ते धमकाविणे अन मिर्‍या वाटणे पुन्हा भांडताना हाणतो मी त्यासहो पुन्हा पुन्हा असते तेथेही नित्य संपादकीय निर्भत्सना घाव तेही वर्मीचे, 'भुर्र' झाले नेमके तेच ते निषेध आणि त्याच शरमेच्या भावना तीच संस्थळे आणि तीच संपादकीय धोरणे तेच ते लोचट करती लुभ्रा निलाजरेपणा जा कुठेही मिळती तेच फासलेले रंगही भुर्र होई वेगळीशी मांडलेली भावना.. सर्वत्र जा तीच वृत्ती दिसतसे या लोचना एक नागोबाच वसतो वेगवेगळाल्या
काव्यरस

अहो पाहुणे हळुहळू होवू द्या, घाई करू नका, असं लाजू नका

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 25/11/2009 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
अहो पाहुणे हळुहळू होवू द्या अहो पाहुणे हळुहळू होवू द्या घाई करू नका, असं लाजू नका || धृ || लई दिसानं आलेत आज जेवण केलयं पुरणपोळीचा थाट स्वस्थ होवूद्या काय लागलं तर मागून घ्या जेवण निवांत होवूद्या ||१|| घाई करू नका, आसं लाजू नका || धृ || पुढ्यात ठेवलीय वाटी आन ताट त्याखाली दिलाय चंदनी पाट वरणभात कालवूनी करा सुरूवात आजच्या दिवस रहा जा हो उद्या ||२|| घाई करू नका, आसं लाजू नका || धृ || कुरडई पापड भजी अन पुरी ओरपा की जरा सार, गुळवणी तुप लावूनी घ्या एकदा पुरणपोळी पोटभर जेवा हात मारा आडवा |||३|| घाई करू नका, आसं लाजू नका || धृ || भरीत झालय झकास आज तुमच्या वहिनीन केलय खास ठ

बदलती शिल्पे, बदलता समाज

लेखक चित्रा यांनी बुधवार, 25/11/2009 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
बॉस्टनच्या म्युझियम ऑफ फाईन आर्टस (कला संग्रहालया) मध्ये आम्ही काय खाल्ले सारखे (अजूनच) रटाळ डिटेल्स कोणाला नको असतील असे धरून पुढे चालू करते... आर्ट म्युझियम म्हटले की खरे तर आपल्या डोळ्यांसमोर शिल्पे, भिंतीवर अडकवलेली चित्रे, फारतर कलात्मक गालिचे अशा वस्तू येतात, पण बहुदा टीव्ही येत नाहीत/नसावेत. पण आम्ही खाणे आटपून मधल्या चौकातून जिन्याकडे जायला निघालो तो काही लोक भिंतीला टेकून समोर पाहत हसत असल्याचे दिसले. तर त्यांच्यासमोर भिंतीवर एकत्र जोडलेल्या पंधरा-वीस लहान टीव्हींचा एक संच होता.

२६/११/२००९

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 24/11/2009 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
अहवाल, समित्यांमागे वास्तव थंड केले मेणबत्तीआड डोळ्यांतील विस्तव थंड केले पाहुनी रण जेव्हा वळल्या मुठी जनांच्या निषेध खलिता थोपवूनी हातांस थंड केले जेव्हा उभे राहिले प्रश्नांमागूनी प्रश्न एका कसाबमागे इतर प्रश्नांस थंड केले रोखलेली बोटे होतील मुठी म्हणूनी राजीनामे फेकून त्या बोटांस थंड केले जेव्हा प्रयत्न केला त्या रात्रीच्या स्मरणाचा मराठीच्या गदारोळात मेंदूस थंड केले नव्या सरकारच्या आड 'ते'च जुने मंत्री 'मनसे' देऊन हाती मिडीयास थंड केले धग चितेची आता उरली आहे स्मशानी जन पेटणार कसे? त्यांच्या मनांस थंड केले
काव्यरस

शिवनेरिची वारी

लेखक झकासराव यांनी मंगळवार, 24/11/2009 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी शिवनेरीला जाउन आलो. आपल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जिथे झाला त्या ठिकाणी जायचं ह्या कल्पनेनच सॉल्लिड्ड मस्त वाटत होतं. काय करणार. ज्यावेळी पुण्यात येवुन पहिल्यांदाच लाल महाल पाहिला होता त्यावेळी तिथली माती कपाळाला लावणारी आम्ही येडी. त्यामुळे असं गडावर जायच म्हणल की स्फुरण चढतचं. :) मग काय माहिती गोळा करुन चार टाळकी जमवुन निघालो. फोटो टाकतोच पण आधी थोडासा इतिहास टाकतो गडाचा. हा गड छत्रपतींच्या काळात स्वराज्यात नव्हता. वाचुन विश्वास नाही ना बसला.

मदत हवीये- project साठी

लेखक बाकरवडी यांनी मंगळवार, 24/11/2009 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
मदत हवीये- project साठी नमस्कार, मी संगणकशास्त्राच्या द्वितीय वर्षाला (S.Y. BCS) शिकत आहे. आम्हाला 2nd semester ला Software engineering हा विषय आहे.आणि ह्या विषयात आम्हाला project करायचाय. :( तरी कृपया मला कोणी मदत करेल का ? live project करायचाय, ह्या वर्षी coding नाहीये फक्त designing आहे पण पुढच्या वर्षी त्याच विषयावर कोड लिहायचा आहे. त्यामुळे चांगला विषय घेणे गरजेचे आहे. :SS :SS :SS :SS येथे मिपावर बरेच संगणक अभियंते व या विषयी ज्ञान असलेले लोक असतील, प्लीज मला मदत करा. projects ची नावे सांगा, एखादी वेबसाईटची लिंक दिली तरी चालेल.

नशीब हे शिकलो - भाग ४१

लेखक विनायक रानडे यांनी मंगळवार, 24/11/2009 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
त्या इजिप्शियन जोडप्याचे पहिले मूल असून सुद्धा दुसर्‍या मुलाच्या जन्माचा हा घोळ त्यांनी का घातला ? तो एक वेगळाच अनुभव होता. म्हणूनच अपघाताने, कोणतेही नियोजन न करता देवाची कृपा समजून, बेजबाबदार रित्या बाळाला जन्म देणारे ९० टक्के पालक असतात असे संवेदनक्षम (१/११/२००९) ह्या लेखात लिहिले होते त्याचा हा एक धक्कादायक पुरावा. दोन दिवस जोडून आलेल्या सुट्टीचा तो दिवस होता, माझे जेवण संपत आले होते, बायकोचे अर्धेच झाले होते. तेवढ्यात माझ्या दारावर जोरात हात मारत इजिप्शियन मित्र ओरडून माझ्या बायकोला बोलवीत होता. त्याची बायको विचित्र अवस्थेत आहे व ति माझ्या बायकोची मदत मागते आहे.