Skip to main content

२६/११/०९ ची संध्याकाळ

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 27/11/2009 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
२६/११ चा थरार आपल्या पैकी काही जणांनी प्रत्यक्ष अनुभवला असेल, तर बहुतेकंनी माझ्यासारखा टि.व्ही. समोर बसुन. कसाबा आणि साथीदारांनी मुंबईच नव्हे तर आख्खा देश हादरवला होता. मी देखिल ठरवल येत्या २६/११/०९ ला आपण पण शुटींग करायच. आठवडा भर आधी नियजन केलं होत, पण विरजण घालणारे काही फक्त मिपा वरच असतात असं नाही. माझ्या कार्यालयत देखिल आहेत.माझ्या साहेबांनी माजी रजा नामंजुर केली. मग काय?

हे घ्या थोडं मीठ... चोळा तुमच्या जखमांवर !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 27/11/2009 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्यापैकी अनेकांनी हे व्हीडिओज पाहिलेही असतील. पण पुन्हा बघा... अन आयुष्यभर लक्षात ठेवा. http://www.mumbaihangout.org/index.php?option=com_content&task=view&id=…

दे दे भाकर

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शुक्रवार, 27/11/2009 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
चार भिंती अन डोक्यावरती आहे छप्पर म्हणायला.. जीव जडु दे त्याला लागु आपण ही घर म्हणायला.. मदत घेतली नाही मित्रा इतक्यासाठीच तुझ्याकडुन लोक लागले मलाच असते तुझाच चाकर म्हणायला जेव्हा जातो त्याच्यापाशी ह्ट्टापाशी अडुन बसतो.. त्याला आता नकोच आहे कुणीच ईश्वर म्हणायला... दु:ख जरी तु देवुनि गेलीस हसतमुख मी असे सदा निमित्त झाले दुनियेला असते दिली तु ठोकर म्हणायला.. सभ्यपणाच्या वस्त्राआडुन मला दाविता पुच्छच त्यानी.. त्यांना देखील हवेच होते मी ही वाSSनर म्हणायला... क्षितिजावर मी धावुन गेलो लांघुन गेलो सर्व दिशा. जिथे मी गेलो तिथे लागले दे दे भाकर म्हणायला.. इथे तिथे मी विखरुन गेलो..मोडुन गेलो डाव

शुन्य प्रहर म्हणजे काय?

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 27/11/2009 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
शुन्य प्रहर म्हणजे काय? तो (की ती?) किती वाजता येतो (येते)? ही भानगड काये? लोकसभेसारखा विधानसभेत का नसतो? (की असतो पण त्या प्रहराला कोणीच उपस्थित नसतं?) विधानसभेत नसेल तर संबंधित अधिकारी इकडे लक्ष देतील काय?

ऐक धरित्रे!!

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 27/11/2009 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
ऐक धरित्रे, तव उदरातील गर्भांकुर ते नवे नव्हाळे उमलून येता अंगांगावरी बाहू तुझे गं लेकुरवाळे ग्रीष्माचा गं अफ़ाट वणवा थोडेसे तू सोस उन्हाळे तुझ्याच साठी घेऊन येईन मेघ अनोखे निळे सावळे सचैल घालेन स्नान तुजला बहरून येशिल राजस बाळे ! लेऊन घेशील साज आगळा माणिक, पाचू, मोती पोवळे तृप्त होऊनी, गीत तुझे मग कडेकपारीतूनी झुळझुळे इंद्रधनूच्या झुल्यावरी गं घेशिल हलके तू हिंदोळे आज लेऊनी घे गं तूही सुर्याचे हे लखलख वाळे उद्या पुन्हा मी बरसत येईन पुरवेन आणिक तुझे डोहाळे - प्राजु

व्हेजिटेबल पुलाव

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी शुक्रवार, 27/11/2009 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १/२ कि. बासमती तांदुळ्, साजूक तूप ३ चमचे , काजू . अख्खा मसाला ( लवंग,हि.वेलची,मसाला वेलची,दालचिनी,तमालपत्र ) मीठ , साखर , आलं लसूण पेस्ट , लिंबाचा रस , केशरी रंग , चेरी , संत्र , मोसंब , वेलची केळं. भाज्या : फ्लावर ( लहान फुले काढणे ) ,फरसबी ( उभी कापणे ), गाजर ( लांबट तुकडे ), बटाटा ( लांबट तुकडे ) मटार , कृती : तांदुळ धुवून चाळणीत निथळत ठेवावे. फ्लावर्,फरसबी,गाजर व मटार शिजवून घ्यावे. बटाटा व काजू तळून घ्यावा .

इतिहास घडवणे आणि इतिहास बनणे

लेखक chipatakhdumdum यांनी शुक्रवार, 27/11/2009 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
मा. राष्ट्रपतीन्च अभिनन्दन, त्यानी सुखोइ विमानातून भरारी मारली आणि इतिहास घडवला.. त्यानी मिग विमानातून भरारी मारली असती तर त्या इतिहास बनल्या असत्या..

चाइनिज मोबाइल होणार हद्दपार ?

लेखक विचित्र विर यांनी गुरुवार, 26/11/2009 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
भारत सरकारने भ्रमण्-ध्वनि सेवा पुरवणारयांना आदेश दिले आहेत कि त्यांनि ज्या ग्राहकांकडे अवैध "आंतर्-राष्ट्रिय भ्रमण्-ध्वनि संच ओळख क्रमांक" (आय्.एम्.इ.आय्.) आहेत किंवा असे क्रमांकच ज्यांकडे नाहित त्यांचि सेवा ३० नोवेंबर २००९ वेळ :- २४:०० नंतर तत्काळ बंद करावि. राष्ट्रिय सुरक्षिततेच्या द्रुष्टिने अतिशय महत्वाचे असे हे धोरण आहे असतो तरि काय हा आय्.एम्.इ.आय्.

नशीब हे शिकलो - भाग ४२

लेखक विनायक रानडे यांनी गुरुवार, 26/11/2009 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
मागील सगळे भाग मीपाकरांना वाचायचे असतील व व्यवस्थापकांची परवानगी असल्यास तीन भागांचा एक भाग करुन मी मीपा वर चढवू शकतो. माझ्या बायकोने त्या इजिप्शियन बाईला मदत न करण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण बायकोचा नववा महिना सुरू झाला होता. योजनाबद्ध पालक होण्या करता जी बंधने आम्ही पाळली त्यातलेच ते एक होते, तीच्या मनावर कोणत्याही प्रकारचा ताण पडू दिला नाही. त्या नऊ महिन्याच्या काळातील आहार, व्यायाम, वैद्यकीय मदत ह्या सगळ्याचा विचारा करून दैनंदिनीची आखणी केली होती.