ऐक धरित्रे!!
ऐक धरित्रे, तव उदरातील
गर्भांकुर ते नवे नव्हाळे
उमलून येता अंगांगावरी
बाहू तुझे गं लेकुरवाळे
ग्रीष्माचा गं अफ़ाट वणवा
थोडेसे तू सोस उन्हाळे
तुझ्याच साठी घेऊन येईन
मेघ अनोखे निळे सावळे
सचैल घालेन स्नान तुजला
बहरून येशिल राजस बाळे !
लेऊन घेशील साज आगळा
माणिक, पाचू, मोती पोवळे
तृप्त होऊनी, गीत तुझे मग
कडेकपारीतूनी झुळझुळे
इंद्रधनूच्या झुल्यावरी गं
घेशिल हलके तू हिंदोळे
आज लेऊनी घे गं तूही
सुर्याचे हे लखलख वाळे
उद्या पुन्हा मी बरसत येईन
पुरवेन आणिक तुझे डोहाळे
- प्राजु
लेखनविषय:
याद्या
3310
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
छान!
साधी सरळ
छान !
अक्षरशः
सुंदर
लयदार कविता
कवितेची
"उरात" च्या ऐवजी दुसरा समर्पक शब्द
In reply to कवितेची by अमृतांजन
ह्म्म,
In reply to "उरात" च्या ऐवजी दुसरा समर्पक शब्द by jaypal
बदल करते..
In reply to ह्म्म, by अमृतांजन
आता आम्ही
In reply to बदल करते.. by प्राजु
सर्वांचे
सुरेख!
असेच म्हणतो.
In reply to सुरेख! by क्रान्ति
सुंदर...
>>बाहू तुझे
ऐक धरित्रे !
ऐक धरित्रे !
छान..