लेखकअजय भागवतयांनी रविवार, 24/01/2010 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
कबुतराच्या अचूकतेने घरी परतण्याच्या कुशलतेची माहिती मानवाला खूप आधी पासुन होती असे दिसते. ह्या कुशलतेचा वापर मानवाने लगेचच केला. ज्यांना हे कळाले की, कबुतरांमधेच असे काहीतरी विषेश आहे त्यांची स्तुती केलीच पाहिजे. इजिप्त्शियन संस्कृतीत कबुतरांचा वापर झाल्याचे दाखले आहेत. भारतीय पुराणात काही दाखले आहेत की नाही माहीत नाही.
दुसऱ्या विश्वव्यापक युद्धात जर्मनीने कबुतरांचा वापर निरोप्या म्हणून तर केलाच पण त्यांच्या मानेखाली बटू-क्यामेरे लावून चित्रफित मिळवली व युद्धात ह्या माहितीचा वापर केला.
लेखकबट्ट्याबोळयांनी शनिवार, 23/01/2010 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
गूगल क्रोम वर मिपा नीट चालत नाही
कमेंट देताना विचित्र क्रोम विचित्र वागतो. विषेशतः बॅकस्पेस दाबल्यावर!
तुमचा काय अनुभव?
काही वर्क अराउन्ड ??
संबंधीत व्यक्ती अॅक्शन घेऊ शकतील का ??
लेखकदिनेश५७यांनी शनिवार, 23/01/2010 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
राजभाषेचा साज असलेला मुकुट डोक्यावर लेऊन मंत्रालयासमोर ताटकळणाऱ्या माय मराठीचे गेल्या आठवड्यात चहूदिशांनी धिंडवडे निघाल्याने मराठीचा अवस्था आणखीनच केविलवाणी झाली आहे. शेकडो निरपराधांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी अजमल कसाब न्यायालयात मराठीतून बोलला, याचा अभिमान वाटावा, की महाराष्ट्राच्या राजधानीतदेखील मराठीचे केवळ कामचलाऊ ज्ञान पुरेसे आहे, असा घूमजाव पवित्रा घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांची कीव करावी, अशा दुहेरी संकटात महाराष्ट्राची माय मराठी सापडली आहे.
लेखकनिमिष सोनारयांनी शनिवार, 23/01/2010 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज स्त्री पुरुष समानतेचे जरा जास्तच स्तोम माजवले जात आहे. समानतेचा मूळ विधायक उद्देश मागे पडून फक्त पैसे आणि वाटणी (हक्क) मिळवण्यासाठीच त्याचा फक्त वापर केला जातो.
मुलगी मुलाच्या बरोबरीने वडीलांच्या संपत्तीत वाटा मागते -- हक्क!
पण आई-वडीलांची आजारपणं, त्यांना सांभाळणं, त्यावारचा खर्च हा सगळा "वाटा" फक्त मुलगाच उचलतो. --कर्तव्य !
तेव्हा कुठे जाते ही समानता?
मुलींना संपत्तीत वाटा असतो तसाच आई-वडीलांच्या आजारपणाचाही, त्याला लागणाऱ्या खर्चाचाही "वाटा" त्यांनी उचलावा, असा कायदा आहे का? नसल्यास तो करायला हवा.
मध्यंतरी एक कायदा आला की, आई-वडीलांना मुलांनी सांभाळले पाहिजे. बरोबरच आहे.
लेखकjaypalयांनी शनिवार, 23/01/2010 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी,
आज दि.२३ जानेवारी "आझाद हिंद सेनेचे" संस्थापक वंदनिय नेताजी बोस यांची जयंती.
या विस्मृतीत गेलेल्या महान नेत्यास माझा मानाचा मुजरा.
जय हिंद, जय हिंद, जय हिंद,
लेखकसागरलहरीयांनी शनिवार, 23/01/2010 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
असे सखे तू रुसू नको ना ,
मोती डोळां सांडू नको ना ,
फुला फुला रे माझ्यासाठी,
असे उगा तू रुसू नको ना .. |१|
असे कोणते दु:ख तुला गे ,
कुणी बोलले काय तुला गे,
कटू बोल ते स्मरू नको ना,
असे सखे तू रुसू नको ना.. |२|
चंद्र कोर बघ अर्धी झाली,
कळी उमलता तशी थांबली,
अशी पापणी मिटू नको ना,
असे सखे तू रुसू नको ना..|३|
हसशी जर तू जग हे हासे,
तयासाठी तर हास जरासे,
मला दूर तू करू नको ना,
असे सखे तू रुसू नको ना..|४|
-- सागर लहरी १७.१.२०१०