नागाव, कोरलई: एक भटकंती
हा माझा मिसळपाव वरचा पहिलाच लेख तरी जुन्याजाणत्या मिपाकरांनी संभाळून घ्यावे. नुकताच २३/२४ ला नागाव, कोरलई ला जायचा योग आला. २३ ल पहाटे ५ वाजता पिंपरी वरुन निघालो ते ८.१५ ला नागाव ल पोहोचलो. कर्पेवाडी येथे अगोदरच बुकिंग करुन ठेवले होते.
९.३० ला न्याहारी करुन चौल, रेवदंडा मार्गे कोरलई किल्ल्यावर गेलो.
मिसळपाव
त्याक्षणी शरीरानं मनावर घातलेली सगळी बंधनं गळून पडली आणि मनाला काहीच अशक्य राहिलं नाही... मन एखाद्या पाखरा प्रमाणे कड्यावरुन दरीत झेप घेत होतं... कधी कड्यावर तर कधी झाडाच्या शेंड्यावर जावून बसत होतं... मी सुद्धा ह्या सृष्टीचाच अविभाज्य अंग आहे असं वाटलं...
साहित्य
१/४ किलो कोलंबी
१ टी स्पून तिखट
१/४ टी स्पून हळद
१/४ टी स्पून मेथी पावडर
१ टी स्पून मोहरीचे कुट
१/४ टी स्पून हिंग
२ टी स्पून आलं, किसून
१/२ टी स्पून मोहरी
२ टी स्पून विनेगर
१ टे. स्पून तेल
मीठ चवी प्रमाणे
कृती
कोलंबी साफ करुन त्याला हळद आणि तिखट लावून अर्धा तास मुरवत ठेवा. कोलंबी मुरली की एका भांड्यात तेल गरम करत ठेवा. तेल चांगले तापले की त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडली की त्यात आल्याचा किस घालुन १ मिनिट परता.