Skip to main content

सुरेश भट यांची अप्रतिम कविता 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी' : शब्द हवे आहेत

लेखक दिपोटी यांनी सोमवार, 08/03/2010 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, मला श्री सुरेश भट यांची 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी' ही अप्रतिम कविता पूर्ण व लिखित स्वरुपात हवी आहे. मला आवडलेल्या या कवितेच्या बर्‍याचशा ओळी मला माहित आहेत / पाठ आहेत पण तरीही पूर्ण कविता तिच्या मूळ स्वरुपात मला अद्याप तरी कोठेही मिळलेली नाही. तेव्हा या कवितेचे अचूक शब्द / ओळी कोणी देऊ शकेल काय किंवा निदान ही माहिती कोठे मिळेल हे सांगू शकेल काय ? मिळणार्‍या माहितीसाठी आधीच धन्यवाद देतो. - दिपोटी

तिखटी

लेखक अस्मी यांनी सोमवार, 08/03/2010 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
तिखटी हा कोकणात केला जाणारा तोंडीलावण्याचा प्रकार आहे...मोस्टली मुगाच्या डाळीच्या खिचडी बरोबर खाल्ला जातो... साहित्य : १ वाटी दही २-३ हिरव्या मिरच्या कोथिंबीर ३-४ लसूण पाकळ्या मीठ कृती : १.आधी मिरच्या भाजून घ्याव्यात आणि ठेचून घ्याव्यात. २.दही घुसळून घ्यावे. ३.लसूण सोलून ठेचून घ्यावी. ४.कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. ५.आता दह्यात ठेचलेली लसूण, मिरची, आणि कोथिंबीर घालावी. ६.चवीनुसार मीठ घालावे आणि चांगले मिक्स करुन घ्यावे. ७.तय्यार आहे एक चटकदार तोंडीलावणे.... :)

मदनगड

लेखक बज्जु यांनी सोमवार, 08/03/2010 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
मदनगड या वर्षी थर्टी फस्ट्ला मदनगडावर जाऊया असा नुसता विषय काढ्ला आणि नाक्यावरच्या काही लोकांचे चेहरे सुतकी झाले. थर्टी फस्ट्ला गडावर ? आणि ते सुध्दा मदनगडावर ?? ~X( तिथे काय ठेवलयं ? :''( वेड**च आहेत मस्त एन्जॉय करायचं सोडून शरीराचे हाल करुन घ्यायला चाललेत #:S वगैरे वगैरे चर्चा झाल्या. मन का राजा (म्हणजे आपण आप्ल्याला हवं तेच करायचं) ही आमच्या नाक्यावरची पॉलीसी असल्याने ही अशा प्रकारची बोलणी आम्ही गडप्रेमी मंड्ळींनी अर्थातच मनावर घेतली नाहीत.

न्युड पोर्ट्रेट

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 08/03/2010 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
*********************************************************************************** ती आजकाल माझ्याशी बोलतच नाही. कधी कधी माझ्याबद्दल मात्र बोलते... काल विचारलंच तिला... माझी कविता वाचलीस? ................... .......................... तर..... तिच्या कपाळावर या एवढ्या आठ्या..... कपाळावर आलेली बट तिने मागे सारली... जवळ जवळ ओरडलीच..... "आजकाल कसली कसली न्युड पोर्ट्रेट्स काढतोस रे?" मानवाच्या फसकलेल्या नितीमत्तेची... टरकलेल्या चारित्र्याची....

स्वच्छतेच्या बैलाला...

लेखक नीधप यांनी सोमवार, 08/03/2010 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
२००८ च्या हितगुजच्या दिवाळी अंकासाठी लिहिलेला हा लेख. दिवाळी अंकाचा म्हणून इथे टाकला नव्हता. तो आज कुणीतरी वेगळ्या शीर्षकाने इथे टाकला. प्रकरण मिटले पण लेखातली समस्या मिटलेली नाही. तेव्हा महिलादिनाच्या निमित्ताने परत तोच लेख इथे टाकतेय. ------------------------------------------------------- "इथे लेडीज टॉयलेटची सोय कुठेय?" प्रॉडक्शन मॅनेजर जयंतला मी विचारलं. एका आडगावात शूट होतं. संपूर्ण दिवस आम्ही त्या एकाच जागी शूट करणार होतो. अश्या वेळी पर्याय नसल्यामुळे हे विचारण्याचा निर्लज्जपणा मी अंगी बाणवून घेतला होता.

रातराणी

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 08/03/2010 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
रातराणी सूर्य अस्ताला गेल्यावर, अंधाराच्या साम्राज्यात, प्राणिमात्र विसावतात आपापल्या खुराड्यात ! राऊळे होतात रीती, अस्तित्व नाकारुन परमेशाचे. तुझ्या लालदिव्याच्या माडीचा आसमंत मात्र उजळतो लख्ख, अन रस्ते ओसंडून वाहू लागतात
काव्यरस

(तेंडुलकर आणि गांगुली फालतु क्रिकेटर -मायकेल कॅस्प्रोविचचे मत)

लेखक चेतन यांनी सोमवार, 08/03/2010 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
रावसाहेबांचा हा लेख वाचला आणि बाष्कळ चर्चा करणार्‍या फोर्थ अंपायरची आठवण झाली. (रण ही पाहिला होताच म्हणा) ;) असो... इंडिया २४/७ वर राजपाल यादवांनी घेतलेल्या मुलाखतीत मायकेल कॅस्प्रोविचचे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या भारतातील दोन बुजुर्ग क्रिकेटरांविषयीचे सडेतोड विचार ऍकले/पाहिले त्यांच्या मते: १. सचिन तेंडुलकरने गेली २० वर्षे फक्त रेकॉर्ड बनवण्यापलीकडे काहीही केले नाही.

शाल्मली...

लेखक विमुक्त यांनी सोमवार, 08/03/2010 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
शाल्मली म्हणजेच काटेसावर... ह्याची फुलं फारच सुंदर असतात... लाल-नारंगी झुंबरं अंगाखांद्यावर सजवून, त्यातला मध खाण्यासाठी काटेसावरीचं झाड अनेक प्क्ष्यांना आमंत्रण देतं... उन्हाळ्याच्या सुरुवातीला हे झाड फुलांनी बहरतं... बहरलेल्या काटेसावरीच रुप केवळ मनाला वेड लावतं... भर दुपारच्या उन्हात निळ्या आकाशाच्या पार्श्वभुमीवर तर हे रुप अजूनच निखरतं... "शाल्मली" हे नाव काटेसावरीच्या फुलांना फार साजेसं आहे आणि तितकच गोड देखील आहे...

श्रेष्ठ मराठी कादंबर्‍या

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 08/03/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतील काही श्रेष्ठ कादंबर्‍याची माहिती कुणी देउ शकेल काय? जसे-- पडघवली-गोनीदा तुंबाडचे खोत- श्री. ना. पेंडसे मुखवटा-अरुण साधू ययाती- वि. स. खांडेकर ---- (वाचनप्रेमी) वल्ली