पाईल्स कुठे आहेत?
मी सध्या कामानिमित्ते इंदोनेशियात जाकार्ताला रहातो. रोजच्या संभाशणासाठी इंग्लिशचा इतका प्रॉब्लेम येत नाही पण काही काही गोष्टीत मात्र फारच पंचाईत होते. त्याचाच हा एक छोटासा विनोदी किस्सा.
इथे येऊन २ महिने झाले आणि अचानकच मूळव्याधीचा त्रास चालू झाला. *** "मोड" येणे म्हणजे काय त्रास असतो ते जो या अनुभवातून गेला आहे त्यालाच समजेल. आणि मी तर "पहिलटकरीण" होतो! आधी खरेतर असा त्रास कधी झाला नव्हता. इथल्या खाण्या मुळे असेल (*** साठी पु. ल. - रावसाहेब वाचा अथवा ऐका).
भरपूर हिरव्या मिरच्या, लसूण असतो इथल्या भाज्यांमध्ये आणि ८-१० दिवसातून एकदा फणसा ची भाजी! यामुळे असावे.
मिसळपाव