गुढीपाडवा, आणि सामाजिक जबाबदारी
आपण सर्व गुढीपाडवा, दिवाळी, होळी अशा एक ना अनेक सणांच्या वेळांना शुभेच्छापर पत्र, एस.एम.एस. पाठवीत असतो.
माझ्या मते, अशा संदेश सोबतच, आपला संदेश्याच्या शेवटी एक तळटीप म्हणून आपण:
१. 'विजेचा काटकसरीने वापर करा.',
२. 'वाहन चालविताना फोनचा वापर करू नका.',
३. 'अंधविश्वासाला बळी पडू नका.'
४. 'हुंड्याची मागणी करणे बेकायदा आहे.'
अश स्वरूपाचे सामाजिक संदेश टाकल्यास, दीर्घ कालावधीने का होईना, निदान काही लोकांच्या वागण्यात अंशतः तरी फरक पडेल.
माझ्या आशावादाला समर्थन मिळते कारण, बहुतांश लोक असे शुभेच्छापर संदेश आल्यावर तेच पुढे पाठवत असतात. त्यामुळे आपण जरी असे संदेश मर्यादित लोकांना पाठविले तरी त्याचा प्रसार वेगाने होईल.
मी स्वतः असे करतो व असे संधेश वारंवार पाठविल्या मुले निदान काही लोकांच्या मानसिकतेत तरी फरक पडेल असे वाटते.
कृपया याबाबतीत सर्वांनी मते मांडावीत.
--
इंटरनेटप्रेमी,
मुंबई, महाराष्ट्र.
वाचने
2855
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
सूचना
१. 'विजेचा
ही वाक्यं चालतील का?
In reply to १. 'विजेचा by विसोबा खेचर
(विषय दिलेला नाही)
In reply to ही वाक्यं चालतील का? by बिपिन कार्यकर्ते
वीजेचा
In reply to १. 'विजेचा by विसोबा खेचर
अशा
हेतू
शुची ताई...
असं करुन .....