Skip to main content

एका सुरेल व्यक्तिमत्वाचा अस्त ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 26/05/2010 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
मै हूं जयपूरकी बंजारन्...चंचल मेरा नाम .... स्व. रफीसाहेबांच्या अनेक गाण्यांपैकी एक सुरेल गीत. १९४७ साली, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्या वर्षी आलेल्या "साजन" मधील हे गीत. सी. रामचंद्र उर्फ आण्णांचे कर्णमधुर संगीत , कमर जलालाबादींचे शब्द आणि या गाण्यात रफीसाहेबांबरोबर गाणारी गायिका होती ललिता देऊळकर! याच चित्रपटातील अजुन एक गाजलेले गीत म्हणजे.... "संभल संभल के जैय्यो ओ बंजारे....

रातराणी ? ? ? अरे बाप रे ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 26/05/2010 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
रातराणी ? ? ? अरे बाप रे ! ! ! मोकळ्या केशसंभारांत पाठमोरी उभी ती मंद चांदण्यांत भासे रातराणी परी ती वाटे जणू बोलाविते साद देऊन मजला वाढली धडकन दिलाची पाहुनी एकान्ती तिजला विचारी मना “ काय आता करावे ” ? “ मुखचंद्रमा तरी आज पाहून यावे “. गेलो भेटण्या समीप लोक म्हणतील काय ? पाहुनी एकांती आम्हा जळतील हाय. जाऊन समीप हलकेच न्याहाळले, अन जाहला चंद्र तेजोमय नभीं s..s..s..s..s..s..s थरथरली मम काया भीतीने हाय रे दुर्दैव ! पाठमोरी सासूच् होति उभी निरंजन वहाळेकर
काव्यरस

भारतीय राज्यव्यवस्थेत राष्ट्रपती आणि राज्यसभेचे स्थान

लेखक क्लिंटन यांनी बुधवार, 26/05/2010 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मागच्या वर्षी लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत मी मिपावर बरेच लिखाण केले होते. त्यामध्ये 'भारतीय राज्यव्यवस्थेत राष्ट्रपती आणि राज्यसभेचे स्थान' हा लेख तयार केला होता. पण निवडणुक विषयक चर्चा आणि त्यानंतर पुण्यातून प्रस्थान आणि आय.आय.एम मध्ये गेलेले पहिले धावपळीचे वर्ष यात हा लेख मी लिहिला होता हेच विसरून गेलो. कालच अचानक त्याची आठवण झाली आणि संगणकावर शोधाशोध करून तो लेख मला मिळाला.

दास्तान एका (खरड) वहीची...

लेखक फटू यांनी बुधवार, 26/05/2010 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
हे लेखन पुर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवातल्या कुठल्याच गोष्टीशी कोणताही संबंध नाही. या लेखाचा शेवटचा बराचसा भाग वाचताना मिपाच्या कुणा सन्माननिय सभासदाची खरडवही जशीच्या तशी उचलून इथे चिकटवली आहे असे वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ही गोष्ट आहे आमच्या सोसायटीतल्या दोन लहान मुलांची. खरं तर एका लहान मुलाची आणि एका लहान मुलीची. मुलाचं नाव गणनायक आणि मुलीचं नाव सुखदा. गणनायक आमच्या सोसायटीच्या बी विंगमधल्या नातलग काकांचा मुलगा. तर सुखदा आमच्याच ए विंगमधल्या कुलकर्णी काकांची मुलगी. गणनायकला खरं तर सारी सोसायटी तसेच आमच्या शाळेतील मुलं गण्या म्हणूनच हाक मारतात.

किनारा

लेखक आनंदयात्री यांनी मंगळवार, 25/05/2010 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
उमललेले क्षण पसरलेल्या आठवणी दुर्दम्य ओढ आणि हिरवा चुडा ल्यायलेल्या भिंती श्वासांच्या जुड्या पिवळ्या तपकिरी लाल निळ्या जगवणारा काढा तुरट कडसर गोडा खारा माणसांच्या होड्या सडा .. वेल्हावणारा वेडा तिच्या आठवणींचे गलबत आक्रंदणारा वेडसर किनारा ..

फोनवरचे पोपट

लेखक टारझन यांनी मंगळवार, 25/05/2010 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , फोन हा आजच्या जिवनाचा अविभाज्य घटक आहे. फोन शिवाय हल्ली पान हलणे मुष्किल झाले आहे. फोन ही एक अतिशय उपयोगी वस्तु आहे. (च्यायचा घो ह्या "अगाध प्रतिभेच्या" ... भाषा कशी घसरलीच ... ) असो ... तर काय सांगतोय ? हंम्म्म. .. फोन ला आपण फार युज्ड टू झालोय नै ? कधी कधी काही असे विनोद होतात .... की आपण स्वतःच स्टंप्स वर बॅट मारुन घेतो आपली बोलतीच बंद होते .. एकदा काय झालं ... बर्‍याच वर्षांपुर्वी कॉलेजाच्या फायनल ईयर ला असताना नविन मोबाईल घेतला होता. तेंव्हा मोबाईल एक लग्जरी होती. पण फायनल इयर प्रोजेक्ट को-ऑर्डिनेशनसाठी गरज म्हणुन मोबाईल घेतला होता.

<>आपलं कसं जमणार<>

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 25/05/2010 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
तुला नेहमीच अवांतर आवडणार, आणि मी वांझोट्या चर्चांचा दिवाणा … माझ्या मनात सविताभाभीचे वेड.., तुझ्या मॉनिटरवर मुर्च्छा उघडणार, ......... आपलं कसं जमणार? तु कायम परदेशी अनिवासी माझे जगणे सदैव निवासी तु सारखा फोन करणार… मी मात्र नंबर बदलणार… .......... आपलं कसं जमणार? आज ना उद्या जमेल मला तुझ्या प्रतिसादावर संपादन आणण… तोपर्यंत मात्र मी असाच असणार… तुझ्याशी बोलताना "+१" स्मरणार… .......... आपलं कसं जमणार? चल, आपण एक करार करू या? तू माझ्या खोड्या काढायच्या नाहीस आणि मी तुझ्या! मी काही शांततेत रमणार नाही… बघू…! हा करार कितपत निभावणार…? ............आपलं कसं जमणार?
काव्यरस

ललिता फडके यांना श्रद्धांजली

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 25/05/2010 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या पिढीतील गायिका ललिता फडके यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांनी गायन कारकीर्द थांबवली होती. संगीतकार श्रीधर फडके यांच्या त्या मातोश्री! मला आठवणारं त्यांच एक गाणं: 'रंगू बाजारला जाते' ललिता फडके यांना श्रद्धांजली.

ओमान

लेखक शैलेन्द्र यांनी मंगळवार, 25/05/2010 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
एका सहकार्‍याला मस्कत- ओमान येथे नोकरीची संधी चालुन आली आहे, त्या संदर्भात काही माहीती हवी होती.
  1. या ठीकाणचे एकंदर सामाजीक वातावरण कसे आहे?
  1. दोन मुले व दोन वयस्क यांना मध्यम्वर्गीय सुखवस्तु जीवनासाठी दर महीना किती रियाल लागतात?
  1. कायदा- सुव्यवस्था कशी आहे?
  1. भारतीय समाज कीतपत आहे? शिक्षणाची सोय कशी आहे?
मीसळ्पाववरील कुणी तिथे असेल किंवा कुणाला या बाबत माहीती असेल तर क्रुपया मदत करावी.