Skip to main content

गणपतीपुळे आणि आंबोलीचे फोटो

लेखक क्लिंटन यांनी मंगळवार, 15/06/2010 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, अनेक मिपाकरांनी कोकणातील फोटो मिपावर टाकले आहेत त्यात माझीही थोडीशी भर. ठिकाणे आहेत गणपतीपुळे आणि आंबोली. गणेश मंदिराचे मिपावर किमान तीन वेगवेगळ्या सदस्यांनी दिलेले फोटो आहेत.

एस्पेरान्तो : एक वैश्विक भाषा

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 15/06/2010 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
''एस्पेरांतो? ही कसली भाषा? ही तर एखादी इटालियन किंवा स्पॅनिश रेसिपीच वाटते बघ!'' माझी मैत्रीण मला हसून म्हणाली. खरेच, तिचा तरी काय दोष म्हणा.... १२५ वर्षांपूर्वी निर्माण झालेली ही भाषा भारतात येऊन गेली ३० वर्षे झाली तरी अद्याप भारतातील लोकांना तिच्याबद्दल फारशी माहिती नाही. ह्या लेखाचा उद्देश एस्पेरांतो या आगळ्यावेगळ्या भाषेची तोंडओळख करून देणे हा आहे. कधी काळी ह्या भाषेचे प्राथमिक, अगदीच जुजबी ज्ञान मिळविण्याचा योग मला प्राप्त झाला आणि एका नव्याच भाषाविश्वात प्रवेश करण्याची संधी त्याद्वारे खुली झाली. (मी ह्या भाषेचा अगदीच प्राथमिक अभ्यास केला आहे ही नोंद जाणकारांनी कृपया घ्यावी.

सुकं मटण / (व्हेज व्हर्जन)

लेखक गणपा यांनी मंगळवार, 15/06/2010 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात छोट्याश्या सुट्टीत घरी जाउन आलो. नेहमी जायच्या आधी माझं आणि बहीणचही आठवडाभर प्लॅनिंग असत की आईच्या हातच काय काय खाउन घ्यायच. शक्यतो इथे परदेशात न मिळणारे मासे आणि भाज्या. (शक्यतो मासेच. कोंबडी / मटण टाळतो , ते काय इथेही खातोच नेहमी) वर्षभर वजन कमी करण्याचे प्रयत्न करणारे आम्ही दर सुट्टीत हटकुन १-२ किलो वजन वाढवुन येतो. यावेळी काही दिवस गावालाही जायला मिळाल. तिकडे बोंबील, निवट्या, घोळीच/दाढ्याचं खार(काटा), काटेरी, पापलेटं मनसोक्त खाल्ले. दोन दिवस सासुरवाडीला ही भेट देउन आलो.

गीत: पहाटे पहाटे जवळ तू ये ना

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 15/06/2010 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटे पहाटे जवळ तू ये ना
पहाटे पहाटे जवळ तू ये ना धुंदीत झोपतांना जागी तू हो ना पहाटे पहाटे मिठीत तू ये ना ||धृ|| थंडी गुलाबी न सोसणारी अशातच रात्र गेली न संपणारी अनुभूती वेगळी सारी, आली माझीया तना पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||१|| आठवणी सार्‍या डोळ्यात जाग्या होवोनी झोप ही सुखाची डोळ्यात येवोनी स्वप्नात माझ्या तू येशी का पुन्हा पुन्हा पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||२|| आठवून सारी रात झोपलेली उमगते गुढ काव्य मंतरल्या वेळी रोम रोम फुलले अंगी सुखावी तना पहाटे पहाटे जवळ तू
काव्यरस

(माडीवरचा तो हात!)

लेखक टारझन यांनी मंगळवार, 15/06/2010 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या लेखाची प्रेरणा ही विकासरावांचा "(गाडीवरचा तो हात!)" हा खर्‍या अर्थाने हृद्य (म्हणजे कसा ते मी डोक्यावरी बरीच केसं उपटली तरी कळलं नाही असा माझा कयास आहे ) अनुभव आहे. त्यावरून जरी खालील अनुभव लिहीत असलो आणि म्हणून कंसात शिर्षक दिले असले तरी, ते विकासरावांच्या लेखाचे हे कृपया विडंबन समजू नये ही धमकी.

इंटर व्ह्यु

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 14/06/2010 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
"येउ का आत सर?" या. बसा. "पंधरा दिवसांनी येतेय" चौदा. "आज तुमचे एच. आर. नाहीत का"? नाही. "भेटायची उत्सुकता होती". ते खंडाळ्याला गेले आहेत. "परत केंव्हा भेटतील". सांगता येणार नाही. एका खाजगी कंपनी ने 'रेन फॉरेस्ट' कापुन रिसॉर्ट बनवला. हे गेलेत झाडे लावायला. पंधरा दिवसात १०००० झाडे लावायचा संकल्प सोडला आहे त्यांनी. खंडाळ्याच्यावर सुमारे २००० फुटावर. "हम्म" तुम्ही इंटरव्ह्यु नंतर मला न भेटताच निघुन गेलात. "I was not myself. मॅरॅथॉन धावल्यासारखे झाले." असे काय झाले? मला पण खुप उत्सुकता आहे. "तुम्हाला रिपोर्ट आला नाही." He reports to none. फक्त जाताना एक बंद एनवलप देउन गेले.

आवडती English गाणी.

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 14/06/2010 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
जरी आपण मराठी असलो तरी दुस-या भाषेतील कलेतला,गाण्यातला वरचढपणा (superior ह्या अर्थाने) हा आपल्या मनाला भावतोच!!

असाही असतो 'अभिमान'?

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 14/06/2010 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात अनेक वळणांवर काही मजेशीर लोक भेटतात. कित्येकदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही गमतीशीर गोष्टी आपले लक्ष वेधून घेतात, तर काही वेळा त्यांच्या वागण्या-बोलण्यातून आपली निखालस करमणूक होत राहते. आणि सर्वात मजेची गोष्ट म्हणजे अश्या व्यक्तींच्या गावीही नसते की त्यांच्या वागण्यातून उत्तम विनोदनिर्मिती होत आहे! असाच एका कुटुंबातील हा खराखुरा किस्सा. थोडा आंबटगोड आहे आणि थोडा कडूपण! तर हे पुण्याच्या मध्यवर्ती भागात राहाणारे कुटुंब म्हणायला पाचजणांचे.... पण त्यांच्या घरात, दहा बाय बाराच्या दोन खोल्यांमध्ये साधारण आठ ते दहा माणसे नांदत. शिवाय गावाकडून येणारा पै पाहुणाही असायचा सोबत.