गीत: पहाटे पहाटे जवळ तू ये ना
पहाटे पहाटे जवळ तू ये ना
पहाटे पहाटे जवळ तू ये ना
धुंदीत झोपतांना जागी तू हो ना
पहाटे पहाटे मिठीत तू ये ना ||धृ||
थंडी गुलाबी न सोसणारी
अशातच रात्र गेली न संपणारी
अनुभूती वेगळी सारी, आली माझीया तना
पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||१||
आठवणी सार्या डोळ्यात जाग्या होवोनी
झोप ही सुखाची डोळ्यात येवोनी
स्वप्नात माझ्या तू येशी का पुन्हा पुन्हा
पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||२||
आठवून सारी रात झोपलेली
उमगते गुढ काव्य मंतरल्या वेळी
रोम रोम फुलले अंगी सुखावी तना
पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||३||
मखमली त्या केसांत सारे
विश्व माझे मलाच फासणारे
गुंतवून माझे मला मी सोडवू कुणा
पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||४||
मोगर्याचा सुगंध वेड लावतो जीवा
माळलास तो तेव्हाचा, कुस्करला केव्हा?
समरसून अलिंगना नाही म्हणू नको ना
पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||५||
पहाटे पहाटे जवळ तू ये ना
धुंदीत झोपतांना जागी तू हो ना
पहाटे पहाटे मिठीत तू ये ना ||धृ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१५/०६/२०१० ( पहाटे ५:१७!)
वर्गीकरण
मोगर्याच
काय शाहीर?
प्रेम काव्य आवडल
भारीच... binaryband