Skip to main content

चला सिंहगडावर...

लेखक श्रीराजे यांनी शुक्रवार, 18/06/2010 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो... पावसाळा सुरु झाला पण अजुन कोणी सिंहगडला गेलेले दिसत नाही... तोपर्यंत...या फोटोंवरच समाधान मानुया... १. उकलेल्या शेंगा... Shenga २. मस्त काकडी... Kakadi ३.

भेजा फ्राय

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 18/06/2010 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, काल चा उपवास सुटला की नाही? आज शुक्रवार म्हणजे आज नॉनव्हेजला मरण नाही. तस मी वार वगैरे पाळतो (एक संकष्टी सोडुन) अश्यातला भाग नाही. पण कायेना की आपल्याकडे काही अंधश्रद्धा आहेत;) की अमुक वारी मांसाहार करु नये. मी लहान असताना, आमच्या घरी सोम, मंगळ, गुरु, शनी हे मोळे/उपवासाचे वार. आणि जर का एखाद्या महिन्यात संकष्टी रैवारी आली मी मी खुप कष्टी होत असे. मग काय, माझ्या सारख्या पट्टीच्या मांसाहार्‍याला चार सलग दिवस मोळं खायच म्हणजे काय खायचा काम नाय. लहान असताना मला भेजा मुळीच आवडायचा नाही, पण आमची तै मिटक्या मारुन खायची तिची देखादेखी मी पण थोडाफार भेजा खाऊ लागलो.

विश्वचषकाचा थरार ... फोटोफिनिश !

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 18/06/2010 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या धाग्यात फिफाच्या मुखपृष्ठावर टाकण्यात येणारे रोजचे फोटो साठवले जातील. मिपाकरांना ह्यात अजुन भर घालायची असेल त स्वागत आहे. मात्र प्रत्येक फोटोबरोबर त्यावर "कमेंट किंवा कॅचलाईन" आवश्यक आहे असे सांगतो. वाचकांनी टिप्पणीसोबत दिलेल्या एखाद्या फोटोला मिपाच्या फिफापानाच्या मुखपॄष्ठावर त्या सदस्याच्या नावासह स्थान दिले जाईल. जास्तीत जास्त सदस्यांनी ह्यात सहभागी व्हावे असे आम्ही इथे आवाहन करतो. तुर्तास इथे गेल्या काही दिवसात मिपाच्या फिफापानाच्या मुखपृष्ठावर आलेले फोटो देत आहे .... १.
विशेष

उधवणीची चिवनी (पावसाळ्यातील मच्छी)

लेखक जागु यांनी शुक्रवार, 18/06/2010 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
चिवनी ही मच्छी सुरवातीचा जोरदार पाउस पडून जेंव्हा पाणी वाहू लागत तेंव्हा येतात. ही चिवनी ह्या दिवसात गबोळीने भरलेली असतात. उधाण आल्यावर अंडी घालण्यासाठि ही वर आलेली असतात. म्हणुन ह्यांना उधवणीची चिवनी म्हणतात. ही समुद्रातुन वाहत खाडीत, विर्‍यात शेतात जातात. ह्या दिवसात हे चिवने पकडण्यासाठी सगळे मच्छीप्रेमी आसु घेऊन जागोजागी दिसतात. चिवनी साफ करण्यासाठी राखाडी घ्यावी लागते. ती नसेल तर तांदळाचे पीठ थोडे थोडे बोटांना लावुन साफ करावी लागतात. कारण ती बुळबूळीत असतात. हातात घेतल्यावर हातातुन सटकतात.

निक्काल

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 18/06/2010 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
#%^#&$%((&&#((##(%*&^#%###)(#*#&#&#*#(#(#(#(#( ञृ$^%*।़फ्((ॠ#*#((&^^#*ऊ़*$&*($($*़ड्फ*#((#(#(#(#(#(#(" अहो एवढ झाले तरी काय? "%&**" सीबीएस्सी च्या मुलाला ९९%. माय्ला ते पोरग स्वतः म्हणतय. ९५% वर अपेक्षा नव्हती म्हणुन. वरचे मार्क देवाची कृपा असे मुलाखतीत म्हणाला" म्हणजे बोर्ड म्हणजे देव का? "अहो चेष्टा काय करताय मास्तर? एस्.एस्.सी वाले पण खुळावले की हो" आता काय झाले? " आयला १४००० मुलांना ९०%+" १३५०० "अहो ३ वर्षाअलिकडे ही संख्या सुमारे ३००० असायची" म्हणजे खिरापती वाटताहेत असे म्हणायचे आहे तुम्हाला. " म्हणुनच आम्ही कोर्टात गेलो आहोत.

तैलचित्र

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 18/06/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
तैलचित्र! आदला दिवस पुर्ण आणि आज दुपार पर्यंत गाडी चालवून चालवून जीव अगदी मेटाकुटीस आला होता. कधी एकदा गादीला पाठ टेकवतोय असे झाले होते. गरम तर इतके होत होते की मुक्कामाला पोहोचल्या पोहोचल्या दोन बीअरच्या बाट्ल्या मागवून घेतल्या आणि त्याचा आस्वाद घेत बगिच्यातील खुर्चीवर निवांत बसलो. बसल्या बसल्या केव्हा डोळा लागला तेच कळले नाही. हवेतल्या गारव्याने जाग आली आणि डोळे किलकिले करुन जरा बघितले आणि खोलीत धाव घेतली - कॅमेरा घ्यायला. कॅमेरा चालू केला आणि बाहेर आलो तर साक्षात "त्याने" हातात कुंचला धरला होता. समोर डोंगराच्या मधे पाण्याचे मस्त व्यासपीठ उभारले होते.

हे कधी झाडावर पाहीलेय का??

लेखक शानबा५१२ यांनी शुक्रवार, 18/06/2010 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
खारकुंडीने अर्धवट खाल्लेला पेरु!! 15052010013" alt="" /> शिशुवर्ग धागा काढणार्,बाकी बागा बघणार! काही प्रतिसाद देणार्,सर्वच पकणार हे निश्चित! - विक्षिप्त शानबा

अगा लेखकांनो

लेखक सन्जोप राव यांनी शुक्रवार, 18/06/2010 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
हे तुमचं लिखाणबिखाण गोष्टीबिष्टी, लेखबिख, कविताबिविता हे सगळं ठीक आहे चांगलंच आहे उदाहरणार्थ चंद्र, नद्या, पक्षी, फुले, निसर्ग पहिला पाऊस, आईची माया, माणुसकी फुटपाथवरची म्हातारी, प्रेयसीची आठवण, फाटका झगा जन्म, मृत्यू, प्रेम, स्वार्थ, मैथुनही गडकर्‍यांपासून कोलटकरांपर्यंत दासू वैद्य, वर्जेश इश्वरलाल सोळंकी मध्ये विंदाबिंदा, बाकीबाब, पाडगावकर आणि कुसुमाग्रज सगळे झाडून कवी झाले बघा गाडगीळ, गोखले, माडगूळकरांपासून गवस पेठ्यांपर्यंतच्या कथा घ्या आपट्यांपासून महाजनांपर्यंत कादंबर्‍या घ्या दोस्तोवस्की घ्या, टॉलस्टॉय घ्या, स्ट्रिंडबर्ग घ्या लोकांना माहिती असलेले तर घ्याच, पण माहिती नसलेले आधी घ्या वैच
काव्यरस

हे वारिस शाह! - अमृता प्रीतमच्या काव्याचा अनुवाद

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 17/06/2010 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेले कितीतरी दिवस तिची ती कविता मनात ठाण मांडून बसली आहे. त्या कवितेवर लिहिण्यासाठी अनेकदा सुरुवात केली.... पण त्या अभिजात कवयित्रीच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या त्या काव्याचा अनुवाद मांडताना ''लिहू की नको'' अशी संभ्रमावस्था व्हायची... लिहिताना माझे हात उगाचच थबकायचे!
काव्यरस