मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विश्वचषकाचा थरार ... फोटोफिनिश !

छोटा डॉन · · विशेष
विशेष
ह्या धाग्यात फिफाच्या मुखपृष्ठावर टाकण्यात येणारे रोजचे फोटो साठवले जातील. मिपाकरांना ह्यात अजुन भर घालायची असेल त स्वागत आहे. मात्र प्रत्येक फोटोबरोबर त्यावर "कमेंट किंवा कॅचलाईन" आवश्यक आहे असे सांगतो. वाचकांनी टिप्पणीसोबत दिलेल्या एखाद्या फोटोला मिपाच्या फिफापानाच्या मुखपॄष्ठावर त्या सदस्याच्या नावासह स्थान दिले जाईल. जास्तीत जास्त सदस्यांनी ह्यात सहभागी व्हावे असे आम्ही इथे आवाहन करतो. तुर्तास इथे गेल्या काही दिवसात मिपाच्या फिफापानाच्या मुखपृष्ठावर आलेले फोटो देत आहे .... १. ११ जुन २०१०
वेविंग फ्लॅग .. वेव युवर फ्लॅग ... वेव युवर फ्लॅग !!! २. १७ जुन २०१०
धक्कादायक : ह्या वेळच्या विश्वचषकाचे एक प्रमुख दावेदार आणि ह्या विश्वचषकातील कागदावरील सर्वात मजबुत संघ असलेल्या "स्पेन" स्विसकडुन झालेला पराभव हा त्यांच्या चाहत्यांसाठी आणि विश्वचषक पंडितांसाठी 'धक्कादायकच' होता/ ३. १८ जुन २०१०
निराश आणि हतबल : गतविजेत्या 'फ्रान्सचे' ह्या स्पर्धेतले सुमार प्रदर्शन कालही कायम राहिले. कालच्या त्यांच्या मेक्सिकोबरोबरच्या लाजिरवाण्या पराभवानंतर "निराश" पाठिराखे आणि "हतबल" प्रशिक्षक रेमंड डॉमनिक

वाचने 11934 वाचनखूण प्रतिक्रिया 47

घ्या मुलांनो असा फुटबॉल खेळायचा मी करतो हेडर्ने गोल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल शिका आमच्याकडुन अस तर म्हणत नसतील ना जर्मन जर्मनी विरुध्द ऑस्ट्रेलिया ४-० ______________________________ संपादक घाश्या कोतवाल भुर्जीपाव डॉट कॉम

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

मेघवेडा Fri, 06/18/2010 - 19:09
फोटो या विश्वचषकातला नाहीये पण तरी आमच्या लाडक्या जर्मन खेळाडूंचा असल्याने मी तरी फाऊल धरत नाहीये! हा उडी मारलेला आहे नं.. हा आमचा बॅस्टियन (श्वाईनश्टायगर)!

In reply to by गणपा

छोटा डॉन Fri, 06/18/2010 - 20:09
बरं का मि. गणपा म्युलर आनि मेघ्या क्लोस्जे. आजच्या दिवसापुरतं खास तुम्हाला खिजवायचं म्हणुन आम्ही बाकी आमचं हे आहेच. असो. ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by प्रभो

हारले हो जर्मन ०-१ नी आज.....क्लोस रेड कार्ड घेउन गेला... डॉन्रावाच्या शब्दात एक डाव भुताचा बाकि आम्ही कट्टर ब्राझिल समर्थक ब्राझिलल्ललाललललालालाला सौजन्य वंन्गाबॉईज ;) ______________________________ संपादक घाश्या कोतवाल भुर्जीपाव डॉट कॉम

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

मेघवेडा Fri, 06/18/2010 - 19:58
हेच म्हणतो डॉन्याची स्पेन हरणार ब्या? आपला सपोर्ट जर्मनी आणि ब्राझिल साठी हे धम्याच्या खवत लिवणारे तुम्हीच नाय का? :? एक मॅच हारल्यानंतर लगेच सपोर्ट काढून घेतला? आँ? अरेरे! ;)

In reply to by मेघवेडा

जल्ला आधी काय म्हणला कट्टर सपोर्ट ब्राझिल दुसर मत जर्मनी आणि एक डाव भुताला म्हणालाव ना मंग! ______________________________ संपादक घाश्या कोतवाल भुर्जीपाव डॉट कॉम

In reply to by प्रभो

छोटा डॉन Fri, 06/18/2010 - 20:04
काय रे प्रभ्या, काय झाले नाचायला ? काय ? काय म्हणलास ? जर्मनी हरली ? १-० ने ? जर्मनीने १ पण गोल नाय केला ? काय ? सर्बियाबरोबर हरली ? काय सांगतोस ? क्लोसला रेडकार्ड ?

बरं बरं ... इथुन पुढचा प्रतिसाद श्री. श्री. श्री. गणपा म्युलर आणि मेघ्या क्लोस्जे ह्यांना समर्पित : काय झालं ? जर्मनी हरली म्हणे ? ------ ( स्पॅनिश )छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

गणपा Fri, 06/18/2010 - 20:19
आगागागा गा पार आग आग ओतलीस की रे ;) एकदम नख काढुन काढुन पार सालटीच काढली की वो मालक मेवे म्हणतो तस "अजून टॉपलाच आहोत म्हटलं आम्ही " हे महत्वाच ;) ( गिरे तोभी टांग उप्परीच )

In reply to by गणपा

मेघवेडा Fri, 06/18/2010 - 20:30
हो ना राव! काही काळजी नै सध्यातरी! बाकी हा डान्या इतका तडतडतोय फोडणीतल्या जिर्‍यासारखा? =)) हे म्हणजे "आम्ही खपलोच, तुम्हीबी खपून आमच्यासंगं आलात, आम्हाला लै आनंद झाला" असं झालं! ;)

In reply to by मेघवेडा

प्रभो Fri, 06/18/2010 - 20:32
शेवटी आम्हीच पहिले म्हणत म्हणत आम्ही खपलो हे मान्य केलत तरं... असो ....चालू द्या तुमचे पालथे धंदे.... ;)

In reply to by प्रभो

मेघवेडा Fri, 06/18/2010 - 20:38
सामना हरणे = खपणे या अर्थी वापरला मी! स्पेन हरल्यावर मी असंही नव्हतो म्हणालो की स्पेन स्पर्धेबाहेर गेली! :D

In reply to by मेघवेडा

छोटा डॉन Fri, 06/18/2010 - 20:45
>>सामना हरणे = खपणे या अर्थी वापरला मी! बरं बरं. ह्यावरुन "आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कार्टे" ही म्हण आठवली. जर्मनी सामना हरली = जर्मनी 'फक्त सामना' हरली स्पेन सामना हरले = बाजार उठला, स्पर्धेबाहेर गेले, मॅटर खतम झाला वगैरे वगैरे .... असो. ------ छोटा डॉन

In reply to by ब्रिटिश टिंग्या

छोटा डॉन Fri, 06/18/2010 - 20:37
टिंग्याशी अर्धवट ( च्यायला गडबडीत आधी अर्धवट टिंग्याशी लिहले होते ) सहमत ... "आता स्पेन वि. सर्बिया अशी सेमीफायनल होऊ नये म्हणजे मिळवलं" असे म्हणतो. ------ छोटा डॉन

In reply to by मेघवेडा

छोटा डॉन Fri, 06/18/2010 - 20:52
>>लोल! पराभूतांचा भाबडा आशावाद पाहून ड्वाले पानावले! +१, "पराभूतांचा भाबडा आशावाद पाहून ड्वाले पानावले!" कट टु कट असेच म्हणतो. ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

प्रभो Fri, 06/18/2010 - 20:55
२-२ "पराभूतांचा भाबडा आशावाद पाहून ड्वाले पानावले!" कट टु कट असेच म्हणतो. ;)

In reply to by प्रभो

मेघवेडा Fri, 06/18/2010 - 20:57
तुमचा भविष्याकडे पाहण्याचा उदात्त दृष्टिकोन पाहून ड्वाले परत पानावले! ;)

In reply to by प्रभो

गणपा Fri, 06/18/2010 - 21:11
डॉन्याने नाडी न पहाताही करेक्ट भविष्य वर्तवल होत अस म्हणायची पाळी येउ नये ;) भल्या भल्या संघांसमोर आधीच फुल्या मारुन ठेवल्यात.

Nile Fri, 06/18/2010 - 21:37
काय खुळे पण लावलाल रे? च्यायला नीट अभ्यास करत नाहीत काही नाहीत. म्हणजे जर्मनी काय इग्लंड काय अन स्पेन काय?? हगरे मेले सगळे. -Nile

मदनबाण Fri, 06/18/2010 - 23:33
हा कप नक्की कोणाला मिळणार ? रंग दे मुझे !!! यू नीड ए फुटबॉल व्हिजन... ;) कलर फुल हेयर स्टाईल... मदनबाण..... A truly strong person does not need the approval of others any more than a lion needs the approval of sheep. Vernon Howard

छोटा डॉन Sat, 06/19/2010 - 18:13
------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

शानबा५१२ Sun, 06/20/2010 - 07:55
जाम मजा आली प्रतिसाद व लेख वाचायला,असेच फोटो टाकत रहा,लेखातले फोटो खुप छान आहेत्,बोलके आहेत. पण भारत नाही(कधीतरी असेल का??) म्हणून आम्ही ह्या सामन्यांच्या highlights बघतो.

In reply to by शानबा५१२

डाव्या हातात कसलं तरी लक्की (?) लॉकेट घेवून संघाच्या विजयाची अपेक्षा करणारा माजी गोलसम्राट maradona सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

छोटा डॉन Mon, 06/21/2010 - 13:52
ब्राझिल आणि आयव्हरी कोस्टा सामन्याची क्षणचित्रे ... सामना ब्राझिलने ३-१ असा सफाईदारपणे जिंकला. सामन्यात "काका"ला दाखवल्या गेलेल्या 'रेड कार्ड' मुळे आणि फॅबियानोच्या हँडबॉल असलेल्या गोलच्या चर्चेमुळे गालबोट ...
------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

स्वप्निल.. Tue, 06/22/2010 - 00:34
ब्राझील - आयवरी कोस्ट सामना उत्तम झाला. बघायला मजा आली :) आज पोर्तुगल ने नॉर्थ कोरीयाला ७-० ने हरवले .. हा बघता आला नाही :( हायलाईट्स वर समाधान मानावं लागणार