बापाचा दिवस
जून महिन्याचा तिसरा रविवार अख्ख्या जगाने बापजाद्यांच्या उत्सवासाठी राखून ठेवलाय. एरव्ही बापाचा दिवस सहसा कोणताही पोट्टा 'साजरा' करतांना दिसत नाही. मात्र बापाचा 'दिवस घालायला' सगळी चिरंजीव मंडळी न चुकता हजर होतात. कारण त्याच दिवशी इस्टेटीच्या लॉटरीची सोडत असते!
असो. त्यामुळे काही फादर्स डे चं महत्व कमी झालेलं नाहीये. 'पप्पा वेडुल्या' मुली आजही मोठ्या उत्साहाने आपल्या डॅड करिता काहीतरी 'हटके' भेटवस्तू खरेदी करण्यासाठी गिफ्ट आर्टिकल्सची अनेक दुकाने या दिवशी पालथी घालतांना दिसतात.
मातृदिनाइतका प्रतिसाद पितृदिनाला मिळत नसतो हे मात्र खरे.
मिसळपाव