(पारध)
प्रेरणा... भर बाजारात पाध्यांनी फोडलेले थोबाड.
वस्ती लेखकांची स्थिरावलेली होती
हाव पाध्यांची उफाळलेली होती
नशा हो सत्तेची नित्य चढत होती
भूक जुगाडाची चाळवलेली होती
प्रतिसादांत त्या मैथुनी क्लांतता* नव्हती
तरी लाईन तिरकी सर्वच उडवली होती
प्रतिसाद डिलीट ही चाल धूर्त होती
मैत्रीमधेच "त्या" त्यांची मने गुंतली होती
नव्या पाध्यांचे चाळे पुन्हा बहरती
जुन्या नानाची ओळख त्यांना नव्हती
* असे शब्द असलेले लेख प्रतिसाद उडवले जात नाहीत असे समजल्यावरुन.
काव्यरस
दक्षिणायन..
तो अविष्कार आता माझा नव्हे
तो पुरस्कार आता माझा नव्हे..
मी मस्त मजेत गायलो, भिजलो
तो पाऊस आता माझा नव्हे..
घेतली होती रम्य, हळुवार चुंबने
तो किनारा आता माझा नव्हे..
मोप मिळविल्या टाळ्या अन् शिट्ट्या
तो रंगमंच आता माझा नव्हे..
मी स्त्रीलंपट काहीसा, सभ्य बुरख्यातला!
तो स्वभाव आता माझा नव्हे..
घुसविली मी काळजात कट्यार
तो तेजिनिधी आता माझा नव्हे..
उपाध्या, पद्व्या करतो अता अर्पण
तो सन्मान आता माझा नव्हे..
-- तात्या अभ्यंकर.
डॉक्टर जगो..
डॉक्टरलोक पेशंटला नेहमीच कापतात, पैशांत मापतात किंवा टाळूवरचं लोणी चापतात... असे अनेक गैरसमज जनमाणसांत पसरलेले असतील. परंतु डॉक्टरांची कथा अन् व्यथा निराळीच आहे.
मूळात हा व्यवसाय/ पेशा रांत्रंदिन युद्धाचा प्रसंग असा असतो. डोळ्यात तेल घालून रुग्ण तपासणे, योग्य निदान करणे, उपचार पुरवणे हे काही सोपे काम नाहीये मित्रांनो.
पेशंटचा आजार वा पिडा कशी दूर करता येईल याच विचारांत डॉक्टर गढलेले असतात. रुग्ण बरा झाल्याशिवाय बिल घेतले जात नाही किंबहुना तसे उद्दिष्ट त्यांच्यापुढे मुळीच नसते.
समाजसेवा अन् सेवाभाव डॉक्टरकीत दडलेला असला तरी मेवा लाटणारे लुटारू डॉक्टरही आढळतात.
हाती माझ्या शुन्यच उरले
हाती माझ्या शुन्यच उरले
हाती माझ्या शुन्यच उरले
खिसा फाटकाच, हाती न काही लागले ||धृ||
कोणास माझा म्हणू मी, कोण कोणाचा होतो मी
दैवगतीने सारे मी पण जळले, रक्ताचेही नाते तुटले
हाती माझ्या शुन्यच उरले ||१||
कोठूनी आणावा पैसा आता, कशा बांधू इमले माड्या
काळाबरोबरी काळच आला, जवळचे सारे काही नुरले
हाती माझ्या शुन्यच उरले ||२||
ओळख आता विस
काव्यरस
पारध
वस्ती पाखरांची स्थिरावलेली होती
हाव पारध्याची उफाळलेली होती
नशा हो सत्तेची नित्य चढत होती
भूक जुगार्याची चाळवलेली होती
गात्रे पाखरांची फुलली देखील नव्हती
तरी पसरुनी जाळी सर्वत्र टाकली होती
पिसे कापण्याची ही चाल धूर्त होती
बहेलियानेच त्यांची तोंडे बांधली होती
नव्या पाखरांच्या शाळा पुन्हा बहरती
जुन्या पारध्याची ओळख त्यांना नव्हती
काव्यरस
प्राचार्य गेले - सरस्वतीपुत्र हरवला
एका महाविद्यालयाचं आवार. प्राचार्य गाडीतुन उतरतात, पांढरा शर्ट, लेंगा आणि काळं जाकीट, सुरकुतलेला पण उत्साही प्रसन्न चेहेरा, आणि त्यांचे पेटंट मिश्कील हास्य, इमारतीच्या पायर्या चढुन येताना, त्यांच्याच व्याख्यानाचा बोर्ड समोर लावला आहे, त्याकडे क्षणभर कटाक्ष टाकुन पुन्हा त्यांच्या नेहेमीच्या पद्धतीने तरातरा चालत, हॉल मधे येतात. हॉल काठोकाठ भरलेला. समोरच्या तांब्याभंड्यातुन थोडे पाणी पीउन प्राचार्य सुरुवात करतात.
"आत्ताच येताना खाली मी व्याख्यानाचा बोर्ड बघितला. त्यावर विषय लिहीलेला नाही. तो लिहायचा राहायलाय असं नव्हे.
वस्ती..!
मी जी दुनिया पाहिली, ज्या दुनियेत राहिलो त्या 'वस्ती'त मला रौशनी नावाची एक घरवाली मावशी भेटली.. त्या वस्तीला, त्या रौशनीला या काही ओळी समर्पित..
वस्ती पाखरांची झळाललेली होती
मस्ती कामांधांची उफाळलेली होती!
मद्याचे प्याले नाचत होते
भूक विश्वामित्राची चाळवलेली होती!
गेलो कराया सांत्वन पाखरांचे
गात्रे तयांची जळालेली होती!
दिले धडे मी शुचिर्भूततेचे
यौवंने पाखरांची पोळलेली होती!
आला थवा हा नवा पाखरांचा
सात्त्विकता तेथे हारलेली होती!
--तात्या अभ्यंकर.
मिसळपाव