आणिबाणी
या लेखाचा उद्देश स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या कालखंडाविषयी माहिती देणे हा आहे. त्यानिमित्ताने लोकशाहीला असलेले धोके आणि धोक्यांची लक्षणे आणि त्यांपासून बचाव करण्याची गरज यांवर चर्चा करण्याचा आहे.
१९७१ च्या मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीत "गरीबी हटाओ" या घोषणेच्या जोरावर काँग्रेस पक्षाने मोठे यश मिळवले. निवडणुकीनंतर थोड्याच काळात पूर्व पाकिस्तानचा प्रश्न निर्माण झाला. डिसेंबरात पाकिस्तानबरोबर युद्ध होऊन बांगला देशाची मुक्तता होऊन हा प्रश्न निकालात निघाला.
युद्धातल्या यशामुळे इंदिरा गांधींची लोकप्रियता शिगेला पोचली.
मिसळपाव