Skip to main content

I bet तुम्ही कधी हे पाहीले नसेल - भाग ४

लेखक शानबा५१२ यांनी गुरुवार, 21/10/2010 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
फोटोत कैद झालेले भुत/आत्मा. विशेष नोंद : १) मुळ छायाचित्र प्राप्त झाले त्याच अवस्थेत ईथे प्रकाशित करण्यात आले आहे.त्यात तसुभरही बदल केला गेला नाही. २) हा लेख लिहण्या मागच्या उद्देशाबद्दल साशंक असलेल्या सदस्यांनी 'ते काय आहे?' ह्यावर भाष्य करावे. ३) हा काय प्रकार आहे हे कळण्यात आपली मदत अपेक्षित आहे,तेव्हा प्रतिसाद लेखासंबंधीतच असावेत. ४) आम्हाला कल्पना आहे की लेख थोडा करेशाटम आहे,पण आपण आपले मत सांगावे ही माफक अपेक्षा ठेवत आहे.

हे काय आहे??

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी बुधवार, 20/10/2010 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
या शब्दांच्या मागे नसते पुढेही नसते आतही नसते काही कोण कुठला वेडा सर्किट का ते टंकीत राही? खाज जीवाची शब्द निपजवी अर्थ भोगण्या सच्चा अर्थाचा बापूस टंकतो तो-तो राही कच्चा कसे काय की माहित नाही नकार उरतो सच्चा नकार घेतो हो ही नाही कुशीत अपुल्या बच्चा (प्राचिन कवि ) यशवंतकुलकर्णी
काव्यरस

देव देव्हार्‍यात नाही!

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 20/10/2010 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी ऑफिसातून कधी नव्हे ते लवकर घरी आलो होतो. मनस्वीला देवी दाखवायला नेण्याचं कबूल केलं होतं. रात्री नऊला घरातून बाहेर पडलो. ती थोडीशी झोपाळली होती, पण देवी बघायला जाण्याचं सोडवत नव्हतं. सर्वांत आधी बंगाली दुर्गा पाहण्यासाठी कॉंग्रेस भवन गाठलं. तुफान गर्दी होती, पण देवी पाहता आली. माझ्यासमोर डझनभर तरुण-तरुणी, प्रौढ-प्रौढा हातातले मोबाईल सरसावून देवीची छबी आणि शूटिंग टिपण्यात गुंतले होते. फ्रेम ऍडजस्ट करून देवीचा चेहरा बरोबर मध्यभागी कसा येईल, याचे प्रयत्न सुरू होते. मला हसावं की रडावं कळेना. गणपतीतही हेच दृृश्‍य सगळीकडे पाहायला मिळतं. लोक उठसूट कसलेही फोटो मोबाईलमध्ये घेऊन काय साध्य करतात?

काजू कतली-------

लेखक निवेदिता-ताई यांनी बुधवार, 20/10/2010 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:- एक वाटी काजू, साखर अर्धी वाटी, साय एक चमचा,पाकासाठी पाणी दोन चमचे. कॄती:- प्रथम काजूची पूड करुन घ्या.त्याला साय लावा, साखरेमधे पाणी घालून दोन तारी पाक तयार करा. त्यात काजूची पूड घालून चांगले घोटत रहा, लगेच गोळा तयार होतो, तो गोळा पसरुन एकाच दिशेने लाटा. व लगेच वड्या पाडा. मस्त काजू कतली तय्यार.

झुक्किनी पराठे आणि शेंगदाणा चटणी

लेखक रतन यांनी बुधवार, 20/10/2010 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. आजचा बेत झुक्किनी पराठे आणि शेंगदाणा चटणी. झिंगालाला देशामधे काय खावे हा मोठा प्रश्न पडतो. एकतर ईथे पालेभाजी दिसत नाही. कधितरी पालकासारखी कोणतीतरी दिसते पण घेण्याची हिम्मत झाली नाही. भात किंवा ब्रेड खावून कन्टाळलो आणि वीकांताला पराठे करायचे असा बेत केला. झुक्किनी पराठे आणि शेंगदाणा चटणी. आपला दोन नंबरचा आवडता मेनु .

अक्षता.....भाग २

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 20/10/2010 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
3

अक्षता.. भाग १

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 20/10/2010 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
3

सदाशिवपेठेतल्या कॅफेतुन नाहिशा झालेल्या तीस लाख नीलचित्रपट सीडीज आपल्या घराघरांत घुसणार?!

लेखक अवलिया यांनी बुधवार, 20/10/2010 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी घरी जायला गाडीत बसलो कीं सेलफोनवर मी 'गॉन' हे सासवडहून प्रकाशित होणारे वृत्तपत्र वाचतो. काल "पुण्यातल्या सर्वात जास्त सुसंस्कृत लोकसंख्या असलेल्या सदाशिवपेठेतल्या सायबर कॅफेमधुन तीस लाख नीलचित्रपट सीडीज चोरीस गेल्या आहेत" ही धक्कादायक बातमी वाचायला मिळाली. आजकाल अशा कुठल्याच बातमीबद्दल आश्चर्य वाटेनासे झाले आहे. पण ज्या घटनेमुळे आपल्यावर थेट आपत्ती कोसळू शकते अशी एकादी बातमी वाचली कीं खूप काळजी वाटू लागते! अशा बातम्या वाचल्यावर "पुण्याची संस्कृती पहिल्यासारखी राहिली नसावी" या पहिल्यापासूनच आपल्या मनात असलेल्या शंकेची ’चुकचुकणारी पाल’ आणखीच जोरात चुकचुकू लागते.