Skip to main content

!!!!!!! पहिला नंबर असा हि , तसा ही !!!!!!!

लेखक jaydip.kulkarni यांनी गुरुवार, 20/01/2011 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वीच बातमी वाचली कि कॅट च्या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थी अव्वल ठरले , वाचून खूप आनंद झाला . पिढ्यानपिढ्या नोकरी हेच सर्वस्व मानणारा मराठी समाज आता कात टाकतोय असं वाटू लागलं . पण या बातमीचा आनंद व्यक्त करतो तेवढ्यात आणखी एक बातमी आली कि सलग दहाव्या वर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्यात महाराष्ट्र अव्वल ........ ! नकळत जाणवले कि उंच भरारी मारताना आपण आपली जमीन विसरतोय ! क्षणात मन विषण्ण झालं . ज्या राज्याचा कृषिमंत्री केंद्रात आहे त्याच राज्यावर ही वेळ यावी यापेक्षा दुर्दैव ते काय .

तीन प्रकारचे डेव्हलपर्स

लेखक शुचि यांनी गुरुवार, 20/01/2011 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
व्यवस्थापनाबद्दलचा विशेसषतः संगणक क्षेत्रातील व्यवस्थापनाबद्दल खूप मस्त लेख वाचनात आला. यामध्ये कोणत्याही आय टी कंपनीमधील डेव्हलपर्स ची प्रमुख ३ व्यक्तीमत्वे अधोरेखित केलेली आहेत. त्यांचा कंपनीवर होणारा परीणाम आणि दुष्परीणाम टाळण्याचे उपाय सुचविले आहेत. लेख मूळातून वाचण्यासारखा आणि उल्लेखनिय आहे. प्रथम व्यक्तीमत्व - वेठीस धरणारे डेव्हलपर्स या पठडीत येणारे डेव्हलपर्स हे बरेचदा स्ट्रॅटेजिक प्रॉड्क्टवरती अनेक मुख्य निर्णय स्वतःचे स्वतः घेतात मग भलेही त्यांना परवानगी असो वा नसो.

शेवयांचा उपमा

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 20/01/2011 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- २ वाट्या शेवया, १ लहान कांदा, २ हिरव्या मिरच्या,मीठ चवीनुसार, १लहान चमचा साखर २ लवंगा, एक दालचिनीचा तुकडा,काजूचे तुकडे,२ वाट्यांना थोडे कमी गरम पाणी ,लिंबू,नारळ, कोथिंबिर, फोडणीसाठी- तेल,कढिलिंब, जिरं, मोहरी, उडदाची डाळ कृती- शेवया कुस्करा आणि तांबूस भाजून घ्या व एका ताटलीत काढून ठेवा. तेल गरम करुन जिरं, मोहरी, हिरव्या मिरच्या, कढिलिंबाची पाने,उडदाची डाळ, लवंगा, दालचिनी अशी खमंग फोडणी करा. नंतर त्यात कांदा तांबूस होईपर्यंत परता.काजूचे तुकडे घालून परता. आता त्यात गरम पाणी घाला.मीठ व साखर घाला व उकळू द्या. चांगली उकळी आली की त्यात भाजलेल्या शेवया घाला.

नार देखणी..(लावणी)

लेखक प्राजु यांनी बुधवार, 19/01/2011 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
नार देखणी, जणू मोरनी, थिरके हिरव्या रानी नजर कट्यारी, टंच उभारी, मुसमुसलेली ज्वानी अहो राजसा, जवळी बसा, ऐकून घ्या मागणी माझी... ऐकून घ्या मागणी.. मान वळविते, जरा झटकते, डौल हंसापरी असा शिणगार, नव रत्नहार, गोर्‍या कांतीवरी विशाल भाळी, आणा बिंदली, लखलख चंद्रावाणी माझी... ऐकून घ्या मागणी.. गर्भ रेशमी, रंग कांचनी, शालू हा भरजरी मखमल चोळी, निळी जांभळी, नक्षी काठावरी कमर साजिरी, बंद चंदेरी, घाला मज आणुनी माझी... ऐकून घ्या मागणी.. धुंद गारवा, मनी काजवा, लुकलुक करतो भारी विडा केशरी, रंगतो परी, मैफ़िल सजते न्यारी बसा पळभरी, देह कस्तुरी, लुटेल दुजा कुणी माझी... ऐकून घ्या मागणी.. - प्राजु
काव्यरस

थीम चांगली असूनही फसलेलं पुस्तक

लेखक सूर्यपुत्र यांनी बुधवार, 19/01/2011 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच एक पुस्तक वाचलं : द अवेकनिंग. ले. : संजय सोनवणी. कथेची नायिका शिबा राणी.. प्रचंड सुंदर.... आणी तेवढीच सामर्थ्यशाली, तिच्यासाठी समस्त सम्राट लोकं झुरतात.. पण ती कुणालाही भीक घालत नाही. दररोज रात्री एका गुलामाबरोबर रत होणारी, आणी सकाळी त्याच्याच रक्ताने स्नान करणारी शिबा राणी... तिचा हा दिनक्रम (की रात्रक्रम) काही वर्षे सतत चालू अस्तो. एका रात्री एका टोळीचा भूतपूर्व राजा शिबाच्या प्रेमापोटी तिच्याकडे गुलाम म्हणून येतो....

मौलाना गुलाम मोह्म्मद वस्तानी

लेखक कापूसकोन्ड्या यांनी बुधवार, 19/01/2011 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
विकास आणि प्रगती/ देवबंद ची साधक बाधक चर्चा व्हावी या उद्देशाने हा धागा काढला आहे. कोणताही उद्देश नाही तेंव्हा धागा उड्वू नये अशी नम्र विनंती. भारताची जनता खरेच वि कासासाठी आसुसली आहे का? गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे चे कौतुक केले देवबन्द ने हे काय चालले आहे! न्यू दिल्ली दारूल ऊलूम व्हाइस चान्सलर मौलाना गुलाम मोह्म्मद वस्तानी म्हणाले " दंग्यानंतर झालेले रिलिफ़ वर्क हे अत्यंत चांगल्या प्रकारे गुजरात सरकार आणि लोकांनी केले आहे." वस्तानी स्वत: एक एमबीबीए आहेत. ते स्वत: गुजरातचे आहेत. जातियवादींच्या गोटात त्यामुळे आनंदीआनंदी झाला असेलच.

शेवयाची खिचडी

लेखक मुलूखावेगळी यांनी बुधवार, 19/01/2011 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
शेवयाची खिचडी ही पौष्टीक, डायट फुड आनि वन डिश मील आहे. साहित्य- १ वाटी शेवया १ कान्दा बारिक चिरललीला २-३ मिरच्या मूठभर शेन्गदाणे १/४ वाटी मुगाची डाळ भिजवलेली (असल्यास) तेल्,जिरे,मोहरी,मीठ्,ह्ळद क्रुती- गॅस ऑन करुन त्यावर कढइ ठेवा. त्यात शेवया टाकुन त्यात थोडेसे तेल टाकुन त्या भाजा.रन्ग ब्राउन येइपर्यन्त भाजा. आता ताटात काढुन ठेवा कढइमधे तेल टाका आनि तापल्यावर मोहरी-जिरे टाका. आता मिरची आनि कान्दा टाका. कान्दा परतत आल्यावर त्यात मुगाची डाळ भ

प्रार्थना किटक

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 19/01/2011 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारी सकाळी येऊरच्या डोंगरात भटकताना हे महाशय दिसले. प्राणी नुसता धीटच नाही तर हौशी निघाला. बेट्याने स्वतःचे मनसोक्त चित्रण करुन घेतले. पायवाटेने जाताना लक्ष गेले तर हा मस्त कोवळे उन खात बसला होता.

मॅट पेंटिंग

लेखक स्पा यांनी बुधवार, 19/01/2011 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हाला "animation " शिकताना 'matt painting ' नावच प्रकार शिकवलेला होता. baryach इंग्लिश si - fi चित्रपटात असे प्रकार... चलत चित्रणा द्वारे जिवंत केले जातात मागे येऊन गेलेला "३००" हा चित्रपट संपूर्ण पण matt painting चा वापर करून बनवलेला होता मी पण एक प्रयत्न केलेला होता एक झलक पेश करतोय अनेक इमेजेस एकत्र केल्या जातात..