मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तीन प्रकारचे डेव्हलपर्स

शुचि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
व्यवस्थापनाबद्दलचा विशेसषतः संगणक क्षेत्रातील व्यवस्थापनाबद्दल खूप मस्त लेख वाचनात आला. यामध्ये कोणत्याही आय टी कंपनीमधील डेव्हलपर्स ची प्रमुख ३ व्यक्तीमत्वे अधोरेखित केलेली आहेत. त्यांचा कंपनीवर होणारा परीणाम आणि दुष्परीणाम टाळण्याचे उपाय सुचविले आहेत. लेख मूळातून वाचण्यासारखा आणि उल्लेखनिय आहे. प्रथम व्यक्तीमत्व - वेठीस धरणारे डेव्हलपर्स या पठडीत येणारे डेव्हलपर्स हे बरेचदा स्ट्रॅटेजिक प्रॉड्क्टवरती अनेक मुख्य निर्णय स्वतःचे स्वतः घेतात मग भलेही त्यांना परवानगी असो वा नसो. स्वतःच्या चूकीच्या निर्णयांनी ते कंपनीला तसेच ग्राहकाला वेठीस धरतात. जॉनचच उदाहरण घ्यायचं तर जॉनला एक अतिशय दोषपूर्ण (डिफेक्टीव्ह) असे वेब टेस्टींग टूल दिले होते. हे टूल जुन्या परिभाषेत होते आणि जॉनला यातील दोष दूर करण्याचे काम सोपविले होते. पण जॉनच्या मते या टूलमधील दोष (डिफेक्टस) ही वरवर दिसणारी कणकण होती, मूळात रोग अतिशय गंभीर होता. आणि या रोगावर एकच उपाय होता तो म्हणजे संपूर्ण प्रॉडक्टच्या प्रॉडक्ट नव्या परिभाषेत लिहून काढणे. आता समजा जॉनचे म्हणने खरे असले तरी ते व्यवहार्य नव्हते कारण ग्राहक हे टूल वापरत होता आणि त्यांच्याकडे तितका वेळ नव्हता. पण जॉन आता एक वेगळीच खेळी खेळू लागला ती म्हणजे तो दोष दूर करण्यात मुद्दाम विलंब लावू लागला. कंपनीचे वेळापत्रक ढासळू लागले, कंपनीने ग्राहकाचा रोष ओढावून घेतला आणि सरतेशेवटी जॉनची हकालपट्टी झाली. तर मूळातच अशा वेठीस धरणार्‍या डेव्हलपर्स ना कसे ताळ्यावर आणायचे त्या परामर्ष या लेखात येतो. द्वितिय व्यक्तीमत्व - महाराजे/महाराण्या डेव्हलपर्स हे डेव्हलपर्स ज्यांना नवनवीन कोड लिहीण्याची दांडगी हौस असते परंतु तोच् स्वतः लिहीलेला कोड पुढे राखण्याची (मेंटेन) तितकीच नावड असते.हे लोक एकामागे एक निर्मीतीक्षम प्रकल्प (क्रिएटीव्ह असाइनमेन्ट्स) स्वतःपुरते निर्माण करत जातात, शोधत जातात पण नंतर अपेक्षा ही की उरल्या सुरल्या प्रकल्पाची जबाबदारी अन्य कोणीतरी खांद्यावर घ्यावी. आरंभशूर!!! अशा लोकांचे सहकारी या लोकांवर खार खाऊनच असतात कारण यांचे प्रकल्प नंतर बिचारे सहकारीच राखत (मेंटेन) बसलेले असतात. अशा डेव्हलपर्स बरोबर कसे वागायचे याचा उहापोह या लेखात छानच केला आहे. तृतिय व्यक्तीमत्व - झडप घालणारे डेव्हलपर्स हे डेव्हलपर्स बहुसंख्य वेळा एखाद्या प्रॉडक्टवर नवशिके असल्यापासून लागतात, नंतर त्याच प्रॉडक्टबद्दल स्वमेहनतीवर एकूण एक शिकून घेतात. त्यातील खाचाखोचा, गुण-दोष यांचे पूर्ण द्न्यान मिळवतात. पण मुख्य म्हणजे स्वतः कमावलेलं द्न्यान नंतर दुसर्‍या कोणालाही देत नाहीत. याबद्दल समर्थन काय तर- दुसर्‍याला शिकवण्यात जास्त वेळ जाईल त्यापेक्षा मी चुटकीसरशी समस्या सोडवेन. अशा रीतीने त्या प्रॉडक्टचा संपूर्ण ताबाच हे लोक घेऊन टाकतात. आणि मग यांचे पद अढळ पद बनते. ना यांना कोणी काढू शकते ना या लोकांना हलायचे असते.कंपनीत अशी स्वतःची जागा बनवली की व्यवस्थापन यांच्यापुढे दात आणि नखं काढलेल्या सिंहासारखे हतबल होऊन जाते.अशी वाईट परिस्थितीच येऊ नये म्हणून काय करावे हे या लेखात आले आहे. मला हा लेख खूप आवडला. अशी व्यक्तीमत्व आजूबाजूला पाहीली आहेत. कंपनी आणि व्यवस्थापनाला त्रास होताना पाहीला आहे. त्या दृष्टीने हा लेख वास्तववादीच आहे. लेखिकेला अनेक दशकांचा मौल्यवान अनुभव आहेच.

वाचने 3544 वाचनखूण प्रतिक्रिया 14

मीली गुरुवार, 01/20/2011 - 02:54
छान लेख आहे. तिसर्या प्रकारचे डेव्हलपर्स जास्त अवघड प्रकारात येतात .कंपनी ला व इतरांना ह्यांचा जास्त त्रास होतो.हे लोक दुसर्याला पुढे जावू देत नाहीत

In reply to by मीली

शुचि गुरुवार, 01/20/2011 - 03:07
बरोबर आहे तुमचं मिली, कंपनीने कंट्रोल देण्यावर आहे सगळा मामला. जर डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असेल तर अशा लोकांची चलती चालू शकत नाही. "सिक्स सिग्मा" बद्दल मला फार माहीती नाही पण जेवढं वाचलं आहे त्यावरून "हिरोसेंट्रीक अ‍ॅप्रोच" हा जाऊन त्याची जागा "प्रोसेसेस आणि व्यवस्थित लिहीलेलं डॉक्युमेंटेशन" घेतात आणि मग एखादा हिरो कंपनीच्या नाकदुर्‍या ओढू शकत नाही, ज्ञानाचे समान वाटप होते, ज्ञान सर्वांसाठी खुले होते. हे फायदे होतात.

In reply to by शुचि

स्वानन्द गुरुवार, 01/20/2011 - 10:38
तुमचे म्हणणे चूक नाही. पण याची दुसरी बाजूही तितकीच विचारात घेण्यासारखी नाही का? मला सांगा.. जर असे स्मान ज्ञानवाटप करायचे असेल, तर मग एम्प्लोयीची किंमत फारच नगण्य होते. शिवाय आज ज्या ज्ञानाच्या जोरावर तो प्रगती करू इच्छितो त्याची किंमत ही कमी होते. फार चांगले काम करून्देखील कंपन्या जेव्हा फारसं चांगलं अपरेझल देत नाहीत, तेव्हा मग हेच ज्ञान ( किंवा त्याची मोनोपोली )तो शस्त्र म्हणून वापरतो. अर्थात... असे मोनोपॉली निर्माण करणारे ज्ञानवाटप करण्यास नकार न देता, अर्धवट ज्ञानवाटप करतात आणि महत्वाची माहिती स्वतःजवळ ठेवतात असं काहीसं चित्र जास्त करून दिसतं. टीपः मी डेव्हेलपर नाही :) अवांतरः असंच जरा मॅनेजर लोकांबद्दल पण लिहा की राव. आणि त्यांच्या मुसक्या कशा बांधायच्या ते ही ;)

In reply to by शुचि

आदिजोशी गुरुवार, 01/20/2011 - 11:12
मग एखादा हिरो कंपनीच्या नाकदुर्‍या ओढू शकत नाही, ज्ञानाचे समान वाटप होते, ज्ञान सर्वांसाठी खुले होते. म्हणजे थोडक्यात कंपनी कधीही कुणालाही हाकलू शकते. त्यामुळे कुणी एक व्यक्ती हिरो न रहाता व्यवस्थापनच हिरो होते. लोकांची पिळवणूक करणे सोपे जाते.

कानडाऊ योगेशु गुरुवार, 01/20/2011 - 11:45
शुचितैंचे आभार. १)हा तसा एकोळी धागा होऊ शकला असता.अमुक अमुक ठिकाणी तमुक तमुक माहीती आहे ती वाचा आणि ज्या काय त्या प्रतिर्किया आहेत त्या इथे लिहा अश्या स्वरुपाचा. पण तुम्ही व्यवस्थित भाषांतर करुन वाचकांची जिज्ञासा जागृत केली.धन्यवाद. अश्या धाग्यांचे स्वागत करायला हवे. २)मी स्वतः डेव्हलपर असल्याने तुमचा धागा आणि त्यात नमुद केलेली वेबसाईट आवडली. - योगोबा कोडर.

In reply to by कानडाऊ योगेशु

योगी९०० गुरुवार, 01/20/2011 - 13:20
अगदी हेच मनात आले होते की एकोळी धागा न काढता शुची यांनी भाषांतर करून जिज्ञासा जागृत केली.. नाहीतर काय होते की पहिल्यांदा प्रतिक्रिया वाचल्या जातात आणि त्यातच मुळ लेख वाचायचा उत्साह निघून जातो.. शुची : मस्त लिंक पाठवलीत तुम्ही...मी स्वतः कोठल्या प्रकारच्या डेव्हलपर मध्ये येत आहे तेच पहात आहे..(मला कळले आहे ते...आता स्वतःला सुधारीन.. (कंपनीने मला सुधारण्याअगोदर)) -योगोबा डोकर..

ऋषिकेश गुरुवार, 01/20/2011 - 13:27
केवळ एकोळी किंवा फक्त लिंकवलेला धागा काढण्यापेक्षा त्याचा इतका उत्तम आढावा घेणे स्वागतार्ह आहे. लेख अजून वाचलेला नाही. जरा वेळ मिळाला की वाचून कळवेन कसा वाटला ते

चिरोटा गुरुवार, 01/20/2011 - 13:27
छान लेख. भारतात सर्विस कंपन्यांमध्ये ज्ञानाचे समान वाटप करण्यामागे कल असतो जेणे करुन मुख्य दोर्‍या व्यवस्थापनाच्या हातात राहतील.ऑफशोअर प्रोजेक्ट मॅनेज करताना अनेकदा महाराजा डेवलपर्स्/कंसल्टंटचा अनुभव येतो. हे लोक सहसा ऑनसाईट असतात्.किती माहिती ऑफशोअरला द्यायची आणि किती दडवायची ह्यात हे लोक कुशल असतात्.युकेत असाच महाराजा डेवलपर होता ओळखीचा.कॉनफरन्समध्ये एकेक शब्द अगदी मोजून मापून बोलणार.पाच वर्षे गुळाला मुंगळा चिकटल्यासारख्या प्रोजेक्टला चिकटून होता.मॅनेजर बदलला,सी.ई.ओ.बदलला,आर्थिक स्थिती बदलली पण हा आहे तेथेच.शेवटी प्रोजेक्ट दुसर्‍या कंपनीला गेल्यावरच साहेब निघाले!

सूर्यपुत्र गुरुवार, 01/20/2011 - 20:28
या लोकांचा कंपनीवर होणारा परीणाम आणि दुष्परीणाम टाळण्याचे उपाय यांवर अजून लिहिलेत, तर अजूनच छान. ते एवढं इंग्रजी कळत नाही. (सगळं आयतं हवं असतं..... इंग्रजी वाचण्याचे जरासुद्धा कष्ट नको...)

आनंदयात्री गुरुवार, 01/20/2011 - 20:42
मस्त लेख आवडला. तिसर्‍या प्रकारच्या डेवलपर्सला ताळ्यावर आणण्यासाठी नॉलेज शेअरिंगचे केआरए सेट करावेत तसेच इगो मसाजिंग सुद्धा त्यांना नरमाईत आणु शकते असा वैयक्तिक अनुभव आहे.