Skip to main content

अवांतर

लेखक गोगोल यांनी शुक्रवार, 28/01/2011 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
या छोटेखानी लेखाच प्रयोजन म्हणजे खालील प्रतिक्रिया: http://www.misalpav.com/node/16488#comment-281900 मी केवळ छोटा डॉन या संपादाकानी ही प्रतीकिर्‍या लिहिली आहे म्हणून टार्गेट करत नाही. मी इथे बर्‍याच दिवसा पासून येत आहे आणि आधून मधून येणारी ही विनंती वजा धमकी बर्‍याच वेळेला पहिली आहे.

एका म्हातार्‍याची गोष्ट...

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 28/01/2011 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
मनुष्य का जगतो याचे उत्तर भल्याभल्यांना सापडत नाही, कितीही प्रयत्न केला तरी सर्वांना समाधानकारक उत्तर मिळेलच याची खात्री नाही. पण अशा स्थितीत कूणीतरी काहीतरी मनाशी करायचे ठरवुन त्याप्रमाणे आयुष्यभर वर्तन करतात. तोच त्यांचा जीवनाचा हेतु असतो. तेच त्यांच्या आयुष्याला त्यांच्या दृष्टीने सार्थकता देणारे असते. केलेले प्रयत्न यशस्वी होतातच असे नाही. ज्यांच्या भाळी आपल्या आयुष्यात केलेल्या प्रयत्नांना आलेले फळ पहाण्याचे भाग्य असते अशी माणसे दैवी मानली जातात. पण असा प्रयत्न अयशस्वी असलेले त्या त्या समाजाला वाटत असलेल्या आदर्शांप्रमाणे वर्तन करत असतील तर ते त्या समाजाचे आदर्श होतात.

कसे उदास नि बेचव वाटते हे आयुष्य ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 28/01/2011 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
कसे उदास नि बेचव वाटते हे आयुष्य हे क्षण ..! उत्साह संपून सारे गोठून जातात आनंदाचे क्षण नि ... कशे आठवत राहतात प्रेम तुटल्याचे क्षण सरळ नकार त्याच्या मर्दपणाची बेदम हार ..!! हातात हात घेऊन ते बसलेले ते निवांत क्षण कुठे गहाळ होतात ...? आणि त्या आणा भाका प्रेमाच्या क्षणभर मिठीत विरघळून गेलेले ते हळुवार क्षण तो स्पर्श ती बेहोष नजर मोहित होऊन स्वताला विसरून गेलेले क्षण कितीतरी काळ लोटला हरवून गेला आठवण आली की भळभळते जखम .... एक ओली तिची आठवण .... कालच ती स्वप्नात आली जशीच्या तशी नि मग तो विसरून गेला ते उदासपण क्षणभर.......
काव्यरस

केकलेस !

लेखक मराठे यांनी शुक्रवार, 28/01/2011 02:32 या दिवशी प्रकाशित केले.
च्यायला आज मिपा बर जो येतो तो केकच्या पा.कृ. टाकतोय! गणपाशेटने रचिला पाया स्वाती झालिसे कळस .. अर्र चुकलं.. गणपाशेटने रचिला बेस आणि स्वाती झालीसे क्रीम अशी अवस्था झाली आहे. हे सगळं कमी म्हणून कोणीतरी एगलेस केक आणि (गव्हाचं) पिठलेस केकची मागणी करतंय!!! आणि ते आव्हान मिपावरची शेफमंडळी अहमहमिकेने उचलतात काय! .. शेवटी आम्ही पण ठरवलं की ह्या सगळ्या केकाटण्यात आपला पण सहभाग असलाच पाहिजे! अर्थात ज्या माणसाला चहाचं आधण ठेवता येत नाही अशा म्या पामराने मिपावरच्या दिग्गज बल्लवांच्यां (आणि बल्लविणींच्या) लायनीत उभं राहायचं म्हणजे फक्त अशक्य!

ओळख

लेखक दादा बापट यांनी शुक्रवार, 28/01/2011 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , अखेर मिपा चे सदस्य झालो. १५ आठवडे लागले. तात्याने मिपा सुरु केले तेव्हा कोकणस्थ वर आवाहन केले होते त्याच वेळेस नोन्द्णी करायला हवी होती. असो. मी मिपा चे आणि सुधीर काळे यान्चे आभार मानतो. दादा बापट हे माझे खरे नाव. उगाच परा, शूची वगैरे टोपण नावे वापरून लेखण करायचा माझा प्रान्त नाही. लवकरच टी. बाळू चा सामना मधला लेख वाचून मला स्वरभास्करान्ची कीव का वाटली ते टाकायचा विचार आहे.

शार्दूल विक्रिडीत

लेखक कापूसकोन्ड्या यांनी शुक्रवार, 28/01/2011 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
सिंहांची मदत घ्या तोल साधण्यासाठी. भारत सरकारचे केन्द्रातील माननीय मंत्री महोदय श्री जयराम रमेश यांच्या मते गुजरात मधले गीर अभयारण्यातील सिंह सुरक्षीत नाहीत. या मता मगची काही कारणे सापडू शकतील का? माझ्यामते खालील १) लवासा आणि आदर्श मध्ये स्वत:च्या आणि मित्र पक्षाची गोची केल्यानंतर आता बॅलन्सींग करण्यासाठी ही आगळीक झाली असेल. २) इतर कुठल्याही गोष्टींवर चतूर मोदी सापडत नसल्यामुळे टीका करण्यासाठी काही तरी कारण हवेच होते. ३) मोदी गीर चे सिन्ह हे गुजरात राज्याचे म्हणून प्रोजेक्ट करतात, आणि त्याला अमिताभसारख्या दिग्ग्जांची मदत घेतात. कुणी कडून तरी नरेंद्र मोदींना बदनाम केले की झाले.

नारळाचे मॅकरुन्स्

लेखक गणपा यांनी गुरुवार, 27/01/2011 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
असहकार यांनी त्यांच्या मुलीसाठी बिन गव्हाच्या केकची रेसिपी सुचवण्या बद्दल धागा काढला होता. तिला गव्हाची अ‍ॅलर्जी असल्याने ती मैद्याचे/रव्याचे केक खाऊ शकत नाही हे वाचून वाईट वाटले. ही काही केकृ नाही.

ऑरेंज केक (बिनामैद्याचा)

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 27/01/2011 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
असहकार यांच्या मुलीला गव्हाची अ‍ॅलर्जी असल्याने ती मैद्याचे/रव्याचे केक खाऊ शकत नाही हे वाचून वाईट वाटले. खास तिच्यासाठी हा बिनामैद्याचा ऑरेंज केक.. साहित्य- ३ टेबल स्पून बटर, १/४ कप साखर,२ टीस्पून मध, १/४ कप सोअर क्रिम, १/४ कप ऑरेंज ज्यूस,२ टीस्पून संत्र्याची किसलेली साल, २ अंडी,३ कप बदाम पावडर, १ टी स्पून बेकिंग पावडर, १ चिमूट मीठ कृती- बटर पातळ करुन घ्या.त्यात साखर घाला व फेटा.अंडी वेगळी फेटून घ्या व ती त्यात घाला. मध ,सोअर क्रिम, संत्र्याच्या साली घाला व फेटा. ऑरेंज ज्यूस घाला व फेटा.

बिन मैदयाचा केक

लेखक असहकार यांनी गुरुवार, 27/01/2011 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपावरील सुगरणींना (सुगरणाना देखील) आवाहन आणि आव्हान !!!!! माझ्या मुलीला गव्हाची अलर्जी (CELIAC DISEASE) असल्याने गहू/ मैदा विरहीत रेसीपीच्या शोधात आहे, (तांदुळ/ ज्वारी/बाजरी/मका इ. घरी दळ्लेली पीठे चालतात. ) ड्रेसिंग करता (readymade आयसींग )चालत नाही (Risk of contamination). अटी अवघड असल्याने पाकक्रुती प्रयत्न करणार्यांचे आधीच आभार ! ------------------------------------------------------------- असहकार