मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नारळाचे मॅकरुन्स्

गणपा · · पाककृती
असहकार यांनी त्यांच्या मुलीसाठी बिन गव्हाच्या केकची रेसिपी सुचवण्या बद्दल धागा काढला होता. तिला गव्हाची अ‍ॅलर्जी असल्याने ती मैद्याचे/रव्याचे केक खाऊ शकत नाही हे वाचून वाईट वाटले. ही काही केकृ नाही. पण केक सदृष्य आहे म्हणुन देण्याचा मोह आवरता येत नाही. साहित्यः एक बाऊल नारळाचा चव. १/३ कप साखर/पिठीसाखर. ३-४ मोठे चमचे मैदा. व्हॅनिला इसेंस. २ अंड्यांतला पांढरा भाग. चिमुटभर मीठ. कृती: एका भांड्यात अंड्यांमधला फक्त पांढरा भाग वेगळा करुन थोडासा फेटुन घ्यावा. मग त्यात बाकीचे जिन्नस घालुन चांगले एकजीव करुन घ्याव. तयार मिश्रण साच्यामध्ये ओतुन घ्याव. ओव्हन २०० ते २२५ °C वर ठेवुन, २०-२५ मिनिटे बेक करत ठेवाव.

वाचने 5817 वाचनखूण प्रतिक्रिया 12

कच्ची कैरी गुरुवार, 01/27/2011 - 23:35
गणपा तुम्ही ग्रेटच आहात ,आता मला पाककलेत काही अडचण आली तर मी तुम्हालाच विचारनार हं!