Skip to main content

सोयाबीन मंचुरीयन (Soyabean manchurian)

लेखक Mrunalini यांनी मंगळवार, 01/03/2011 03:51 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः सोया चंक्स - १ कप अंडे - १ कांदा - १/२ कप बारीक चिरुन कोबी - १/४ कप बारीक चिरुन ढोबळी मिरची - १/४ कप बारीक चिरुन कांद्याची पात - १/४ कप बारीक चिरुन लसुण - १ मोठा चमचा बारीक चिरुन आले - १ मोठा चमचा बारीक चिरुन हिरवी मिरची - १ मोठा चमचा बारीक चिरुन काळी मिरी पावडर - १ मोठा चमचा सोया सॉस - १ मोठा चमचा व्हिनेगर - १ मोठा चमचा रेड चिली सॉस - १ मोठा चमचा कॉर्नफ्लोअर - २ मोठे चमचे साखर - १/२ चमचा तेल - १/२ कप मिठ चवीनुसार कॄती: १. पातेल्यामधे ३ कप पाणी उकळावे. त्यात सोयाबीन टाकुन २ मिनिटे उकळावे. हे सोया चंक्स गाळुन त्यातले पाणी पिळुन काढावे. २.

ग्रेट भेट-- उत्तुंग यश आणि किर्ती मिळवलेले मराठे

लेखक कापूसकोन्ड्या यांनी मंगळवार, 01/03/2011 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रेट भेट-- उत्तुंग यश आणि किर्ती मिळवलेले मराठे प्रख्यात पत्रकार आणि मराठी इ-पत्रकारितेमधील एक अत्यंत महत्वाची व्यक्ती म्हणून श्री. निखील वागळे यांची ओळख आहे. त्यांच्या आय बी एन लोकमत या वाहिनी वर प्रत्येक सप्ताहांतराला प्रसारीत होणाया ग्रेट भेट या कार्यक्रमाचा मी फ्यान आहे. हो अगदी अठ्ठेचाळीस इंची. भारतात असेन तेव्हा मी हा कार्यक्रम जरुर पाहतो, अन्यथा मिळाला तर तू नळी वर (काही भाग मिळतच नाहीयेत.) या मुलाखतीं मध्ये पाहुण्यांची निवड करताना त्यांचे मराठी असणे आणि वेगवेगळ्या विषयामध्ये किर्ती आणि स्वत:ची एक स्वतंत्र ओळख असणे हे सुत्र बहुदा असावे.

विदारक अनुभव

लेखक अप्पा जोगळेकर यांनी सोमवार, 28/02/2011 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
काल दुपारची गोष्ट. चार-साडेचार वाजले असतील. तेंडुलकर मस्तपैकी धुलाई करत होता. मॅच अगदी रंगात आली होती. बॅकग्राउंडला आमच्या तीर्थरूपांची कॉमेंट्रीसुद्धा चालू होती. मी चहा टाकायच्या विचारात होतो. म्हणजे भांड्यात पाणी घेतलं आणि बाहेरुन सिक्सर असा आवाज आला की धाव बाहेरच्या खोलीत. पाण्यात साखर घातली आणि 'अरेरे! जस्ट मिस झाला' असं ऐकलं की पळ बाहेर असा प्रकार चालू होता.तेवढ्यात बेल वाजली. मी जाउन दार उघडलं तर बाहेर एक उंच काळसर वर्णाचा तरुण मुलगा उभा होता. त्याला पाहिलंय असं वाटत होतं पण चटकन नाव आठवेना. 'अ....अ.... अ....अनुराधा आहे का ?' बोलताना त्याची जीभ अडखळत होती.

नावं

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी सोमवार, 28/02/2011 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
नात्यांची नावं शोधायची नसतात नात्यांना नावं ठेवायची नसतात नावांच्या पिंजा-याबाहेर सुद्धा एक सुंदर बन आहे त्यातल्या एकेक प्राण्यालाही एक सुंदर मन आहे ‘कोण आहे तो तुझा’ हे व्यवहाराला बर आहे ‘ओळख आहे आमची’ हेच उत्तर खर आहे ओळख असते दाट जुनी चेहर्यामागच्या माणसांशी जखमेवरच्या खपल्यांशी, भिजलेल्या दिवसांशी ओळख असते गाता गाता जुळलेल्या सुरांशी परसातल्या चाफ्याशी अन कुंपणाच्या तारांशी ओळख पटते आगंतुक डोळ्यामधल्या हसण्याशी आणि ओळख निघते गही-या लाघव डोळ्यामधल्या स्वप्नाशी नातीच ना हो हि सगळी कळत नकळत जोडलेली बहरलेल्या वेलीसारखी अंगा खांद्यावर वाढलेली नावं देवून सांगा त्यांना व्याख्येत कस बांधाय

मराठी भाषेचे सौंदर्य आणि अचूक उपयोग

लेखक इन्द्र्राज पवार यांनी सोमवार, 28/02/2011 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने विविध विषयावरील साहित्य इथे प्रकाशित करण्याचा मानस श्री.ध.मु. आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी व्यक्त केला आहे त्याला अनुलक्षून कोणत्या विषयावर लिहावे हा विचार डोक्यात असताना गेले तीन दिवस आकाशवाणीवरून शासनानेच राज्यातील शाळा-महाविद्यालयांना या निमित्ताने केलेले आवाहन ऐकण्यास मिळाले. शासनाने निबंध, वक्तृत्व, वादविवाद, चर्चा, माहिती आदींचे आयोजन तर करावे अशा सूचना संस्थांना दिलेल्या आहेत. हे 'मराठी दिना' निमित्त होईलच. पण या संदर्भात मी काही भाषातज्ज्ञांनी दिलेली व्याख्याने ऐकली आहेत.
विशेष

नगरी मोरूचा जामदि

लेखक नगरीनिरंजन यांनी सोमवार, 28/02/2011 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
कडक थंडीचे दिवस संपून वसंताच्या आगमनापूर्वीच्या उरल्यासुरल्या गुलाबी थंडीच्या गुदगुल्या सहन करीत कोवळ्या उन्हाची चादर घेऊन मोरू माळवदावर तोंड उघडे टाकून साखर झोपेत उताणा पडला होता.
विशेष

वो सांस हूं जो लबोंपे.....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 28/02/2011 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
रफीसाहेबांची अनेक गैरफिल्मी गाणी आपल्याला माहीत आहेत, असतील. त्याची मजा काही औरच आहे. मुख्य म्हणजे कमीत कमी संगीत व ह्रदयाला भिडणारा त्या गाण्यांचा अर्थ आणि सरळ ह्रदयात एखादी सुरी उतरावी तसा मनाला भिडणारा साहेबांचा आवाज...... त्यातच त्या गाण्यात भावनांची तडफड असेल तर ते गाणे खरच ह्रदय कापत जाते.

रविवारी भल्या सकाळी

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 28/02/2011 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ : सकाळी ७:०० वाजता स्थळ : एका तारांकित हॉटेलातील कॉफी शॉप वार : रविवार काचेच्या एका भल्या मोठ्या फ्रेंच विंडोजवळची दोन - तीन टेबले पकडून गुबगुबीत सोफ्याच्या आणि मखमली खुर्च्यांच्या आत रुतलेले अस्मादिक. आजूबाजूला स्वतःला आजही तरुण म्हणवून घेणार्‍या एके काळच्या सहाध्यायांचे नळकोंडाळे. बहुतेकांच्या चेहर्‍यावर रविवारी भल्या पारी उठायला लागल्याची उद्विग्नता. कोणी पालथ्या हाताने तोंड झाकून जांभई दडपतंय तर कोणी नाक चिमटीत पकडून बसलंय. अजून डोळ्यांवरची झापड गेली नसल्याने वातावरणात एक प्रकारचे चिंतनशील झोपाळू स्पंदन!