Skip to main content

शर्यत रे जिंकली!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 07/03/2011 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
"कासव' हा काही उत्साहानं पाहायला जाण्याजोगा प्राणी नाही. मुलांनाही ससा आणि हत्ती-वाघाची जेवढी क्रेझ वाटते, तेवढी कासवाबद्दल वाटण्याची काहीच गरज नाही. एवीतेवी पडला हळू चालणारा, सगळ्यांच्या मागे असलेला आणि कुणाच्या अध्यात-मध्यात न येणारा प्राणी. पण वेळासच्या महोत्सवानं कासव ही सुद्धा पाहण्याची गोष्ट असते, हे सिद्ध केलं. आम्ही वेळासला गेलो, तर किनाऱ्यावर नुसती कासवाची पिल्लं पाहायला दीड-दोनशे पर्यटक मुंबई-पुणे, अन्य कुठल्या कुठल्या शहरांतून आले होते! एका सहकाऱ्यानं ही टूम काढली होती. मलाही बऱ्याच दिवसांत कुठेतरी उलथायचं होतंच. त्यामुळं सहकुटुंब जायचं ठरवलं. मंडणगडला आधी कधी गेलो नव्हतो.

वेज प्लॅटर

लेखक पर्नल नेने मराठे यांनी सोमवार, 07/03/2011 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
veg वर दिलेल्या भाज्या वापरुन मला वेज प्लॅटर करुन हवय. माझ्यामते ऑलिव्ह ऑइलात भाज्या फ्राय करुन त्यावर त्यावर मिठ व काळी मिरी भुरभुरावी मग बटर सोडावे. पण भाज्या एवढ्याने शिजतिल कश्या हा माझा प्रश्न आहे. जाणकारांनी क्रुपया मर्गदर्शन करावे.

श्रीशिवरायाचा जयकार

लेखक जातीवंत भटका यांनी सोमवार, 07/03/2011 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीशिवरायाचा जयकार सह्याद्रीवर घुमतो अजून तुझ्या शौर्याचा हुंकार ... श्वासाश्वासातून निघतो श्रीशिवरायाचा जयकार ... म्लेंच्छांनी घातले घाव घाव मातृभूमी वरी .. परदास्याच्या अंधःकारातून पेटला स्वातंत्र्याचा रवी ... घेऊनी रामदासी मंत्र गर्जला हा नृसिंह असा ... दुमदूमला आसमंत सारा थरथरल्या दाही दिशा ... मावळे मराठे मर्द झुंजले अर्पुनी प्राण ... रोवले छातीत मोघलांच्या तेजस्वी भगवे निशाण ... तासिले कडे अभेद्य घडविले दुर्ग बेलाग ... सळसळती मनगटे मराठी अन् समशेर ओकते आग ... हिंदवी स्वराज्याचा ज्यानी थाटला सं
काव्यरस

धुक्यात हरवलेला तैलबैला

लेखक जातीवंत भटका यांनी सोमवार, 07/03/2011 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
धुक्यात हरवलेला तैलबैला
पावसाळ्यातला एकही विकएन्ड घरी बसायचे नाही असा विडाच उचलला असल्याने येत्या शनिवार-रविवार तैलबैल-घनगड असा बेत आखला होता. कमी जास्त होत होत अखेरीस ९ शिलेदार तयार झाले. आमच्या कुठल्या ट्रेकमधे व्यत्यय आला नाही, असे झाले तर शपथ !! ५ जुलैच्या भारत बंदचा वचपा आमच्या कंपनीने शनिवारी "वर्कींग" ठेऊन काढला होता.

अन्तर्नाद

लेखक पूनम १ यांनी सोमवार, 07/03/2011 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
रातीच्या अंधारात, खुणावती वेणुची साद, सुरांनी तिच्या जागला , जागला अन्तर्नाद, धुक्याची ही वाट नेते, कालिंदीच्या तीरी, वाट पाहतो ग तिथे , माझा श्रीहरी तो श्याम सावळा, मी बावरी ग राधा, पाहण्या श्रुन्गार चोरुन, चांद उगवला आधा, गळले देहाचे बन्धन, खुण अंतरीची पटे, श्याम झाला राधा, राधा श्यामच वाटे, माझी गोरी ही काया, श्याम रंगात न्हाली, सावळ्या हरीच्या स्पर्शाने, राधा सावळी झाली.

.... उचल ना फोन..

लेखक ५० फक्त यांनी सोमवार, 07/03/2011 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसात जाताना असं होतं, कधी कधी माझा आणि बायकोचा वाद झालेला असतो, आम्ही तसेच ऑफिसला जातो, चेहरा लगेच कार्पोरेट झालेला असतो, पण आत काहीतरी बोलायचं राहिलेलं असतं, काहीतरी ऐकलेलं डोक्याच्या बाहेर निघायला तयार नसतं. टेबलवर फोन वाजत असतो, टॅण टॅ धॅन टॅ . voice call from **** टॅण टॅ धॅन टॅ .. मी फोन उचलत नाही तर सायलेंट करुन ठेवतो, पुन्हा ४-५ मिनिटांनी फोन टॅण टॅ धॅन टॅ . voice call f******* टॅण टॅ धॅन टॅ , आता चिडणारा दुसरा कोणितरी असतो पण डायलॉग तोच -'अरे उचल ना फोन ' . मी तरी ही फोन उचलत नाही.

सोपी उसळ [नाही तर मग मिसळ ;-)]

लेखक Pearl यांनी सोमवार, 07/03/2011 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
सोपी उसळ (चवळी किंवा मसूर किंवा मूग किंवा मटकी किंवा मिक्स कडधान्ये यांची) साहित्यः २ वाट्या रात्रभर भिजवलेली चवळी किंवा रात्रभर भिजवलेले मसूर किंवा मोड आलेली मटकी किंवा मोड आलेले मूग (किंवा वरील पैकी काहीही कोणत्याही प्रमाणात मिक्स केलेली कडधान्ये) २ लसूण पाकळ्या, तिखट(लाल मिर्ची पावडर), मीठ, (केप्र किंवा कोणताही) गोडा मसाला, गूळ कृती: १.प्रथम वरीलपैकी ज्या कडधान्याची उसळ करायचे आपण ठरविले आहे ते कडधान्य कुकरला लावून (भात शिजवतो तसे) शिजवून घ्यावे. २.एका पॅन मध्ये फोडणी करून त्यात लसूण घालून चांगले परतून घ्या. मग त्यात शिजवलेले कडधान्य घाला.

"माफ कर, अरुणा.....पण नाही तुला दयामरण !"

लेखक इन्द्र्राज पवार यांनी सोमवार, 07/03/2011 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
कायद्यातील तरतुदीपुढे न्याय पीठासनदेखील हतबल होते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आणि गेली ३७ वर्षे जिवंतपणीच 'मरण' भोगत असलेल्या अरुणा शानबाग यांच्यावतीने लेखिका पिंकी विराणी आणि अनेक वकिलांनी केलेल्या "दयामरण" अर्जातील विनंती सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू आणि ग्यान मिश्रा यांच्या खंडपीठाने "कायद्यात तरतूद नाही" या मुद्द्यावर फेटाळून लावली. "दयामरण" हा भारतातच नव्हे तर जगात अनेक देशात वारंवार चर्चेला येणारा विषय आहे. त्याची कारणमीमांसा करण्याअगोदर आपल्या कायद्यातील एका तरतुदीकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे.