Skip to main content

सोपी उसळ [नाही तर मग मिसळ ;-)]

लेखक Pearl यांनी सोमवार, 07/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
सोपी उसळ (चवळी किंवा मसूर किंवा मूग किंवा मटकी किंवा मिक्स कडधान्ये यांची) साहित्यः २ वाट्या रात्रभर भिजवलेली चवळी किंवा रात्रभर भिजवलेले मसूर किंवा मोड आलेली मटकी किंवा मोड आलेले मूग (किंवा वरील पैकी काहीही कोणत्याही प्रमाणात मिक्स केलेली कडधान्ये) २ लसूण पाकळ्या, तिखट(लाल मिर्ची पावडर), मीठ, (केप्र किंवा कोणताही) गोडा मसाला, गूळ कृती: १.प्रथम वरीलपैकी ज्या कडधान्याची उसळ करायचे आपण ठरविले आहे ते कडधान्य कुकरला लावून (भात शिजवतो तसे) शिजवून घ्यावे. २.एका पॅन मध्ये फोडणी करून त्यात लसूण घालून चांगले परतून घ्या. मग त्यात शिजवलेले कडधान्य घाला. ढवळून घ्या. ३.मग त्यात उसळ जितकी पातळ हवी तेवढे पाणी, चवीपुरते मीठ, गोडा मसाला, तिखट आणि बर्‍यापैकी गूळ घाला. (ही उसळ थोडी गोडसर चांगली लागते.) ५ मिनिटे उकळून मग गॅस बंद करा. उसळ तयार :-) ----------------------------------------------------------------------------------------- नाही तर मग मिसळ ;-) [टीपः ही उसळ संध्याकाळी उरली (किंवा गोडसर असल्याने जर आवडली नाही) तर मग १.आले-लसूण फोडणी करून त्यात ही उसळ घाला. थोडे पाणी आणि थोडे तिखट-मीठ, कांदा-लसूण चटणी घाला. मग एक चमचा तेलात तिखट घालून ते या उसळीत घाला. त्यामुळे तेलाचा छान तवंग येतो. २.कांदा-कोथिंबीर-टोमॅटो बारीक चिरून घ्या. ३. मग एका बाउलमध्ये थोडे फरसाण घेउन त्यावर वरील उसळ घाला. वर बा.चि. कांदा-कोथिंबीर-टोमॅटो घाला. सोबत पाव घ्या. मस्त चटपटीत मिसळ तयार :-)] -----------------------------------------------------------------------------------------

वाचने 6514
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया


सकाळचा प्रहर, म्हणजे गडबड गोंधळ धावपळ | सहाला उठोनी कराव्या लागती, हालचाली अतिचपळ|| तेव्हा कुठे पाककृती होती पूर्ण करून, आणिक डबे भरून | अन्यथा खावे लागते काही बाही, कँटिनचे बिल भरून आणिक डोळे मिटून|| वेळ काढूनि कामामधूनी क्षणभर, पाककृती टाकली टंकून सत्वर| इतुके कष्ट करूनही, फटू नाही फटू नाही म्हणती जग हे निष्ठूर :-) ||

In reply to by Pearl

पाकृ आणि कविता दोन्ही उत्तम!

गुड्डु, धन्स. परी आणि म्रुणालिनी, धन्स. आणि आता तुम्ही तयार व्हा , माझी काव्यमौक्तिके झेलायला I mean कविता सोसायला :-) माझ्यातल्या सुप्त कवियत्री ला (प्रोत्साहन देउन) जागृत केल्याचे फळ भोगायला ;-)

In reply to by परिकथेतील राजकुमार

अहो ते दुसरे री आहे हो. (परिकथेत पहिली रि आहे. किती समजावून सांगावे लागते. हुश्श! ) विनाकारण सगळं आपल्यावर ओढवून घ्यायची सवयच असते काही काही लोकांना :-P तो संदेश "स्वैर परी" यांच्यासाठी आहे. उगा दुसर्‍यांना उद्देशिलेले संदेश वाचायचे आणि वर टोंबाटोंब करायची म्हणजे काय :-O