Skip to main content

किस्सा पटवारी का...

लेखक चिगो यांनी बुधवार, 30/03/2011 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
धागा प्रेरणा : http://www.misalpav.com/node/17449 गुजरातच्या "भु-खंड संगणकीकरण" बद्दल माहीती देतांना एका अधिकार्‍याने सांगितलेला हा किस्सा :
एकदा चिफ सेक्रेटरी (राज्यातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी) कुठल्याशा दौर्‍यासाठी एका गावातून जात होते. रस्त्यात काही गाई-म्हशी आडव्या आल्या आणि चुकून एका गाईला त्यांच्या गाडीचा पुसटसा धक्का लागला. झालं, गुराखी लोकांनी गाडीभोवती कोंडाळं केलं आणि भांडायला लागले. ड्रायव्हरने खुप समजावून सांगितलं, की अरे बाबांनो, मोठे साहेब आहेत. अमुक नी तमुक...

विश्वचषक २०११ भारत वि. पाक दुसरे सेमिफायनल

लेखक प्रशांत यांनी बुधवार, 30/03/2011 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
भारत वि. पाक हा सामना बघण्याची उत्सुकता सर्वांना असते त्यात आजचा सामना म्हणजे विश्वचषक २०११ चे दुसरे सेमिफायनल त्यामुळे प्रत्येकाने सामना बघण्यासाठी विषेश तयारी केली असेलच.. आपल्या पंतप्रधानांनी तर हा सामना बघण्यासाठी फारच विषेश तयारी करत त्याच्या खास......... आमंत्रण दिलेले आहे.. तर आजचा सामना बघ्याण्यासाठी तुम्ही काय काय आणि कशी तयारी केली... सामना चालु झाल्यानंतर सामन्याचे धावते वर्णन आपण आपल्या मिपाच्या खास शैलित करुच..

भिऊ नकोस ...

लेखक विश्वेश यांनी बुधवार, 30/03/2011 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतापुरते लढायचे बळ तेवढे आता गाठीशी आहे ... आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..." तुझ्या ह्या आश्वासनाने केले होते भितीना दफन ... अन उभा ठाकलो लढाया जगाशी बांधून डोईवर कफन माहित नव्हते माझी लढाई नशिबाच्या काठीशी आहे .... आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..." लढलो अनेक समरे काही जिंकलो काही हरलो लढता लढता लोटली वर्षे, परंतु मागे नाही फिरलो ... हरलो शेवटी वयाकडून, माहित नव्हते गाठ साठीशी आहे ... आठवते म्हणाला होतास "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ..." गळाले सगळे बळ, अन गळाल्या सगळ्या आशा आलास समोरून चालत अन दिलास पुन्हा दिलासा ... दाखवलास मज आरसा माझ्याच भ

सैयॉ निकस गये

लेखक शरद यांनी बुधवार, 30/03/2011 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
सैयॉं निकस गये नवरा-बायकेतील भांडणे तर आदि काळापासून चालत आलेली आहेत. कधी बायको रुसून बसते तर कधी नवरा घराबाहेर चालता होतो. बर्‍याच वेळी हे कपातले वादळ असते. काही वेळाने मिटते; दिलजमाई होते. पण दरवेळी हा तिढा सहजपणे सुटतोच असे नाही. तो नाहीच आला तर मग घरातील नातेवाईक, आजूबाजूच्या आयाबाया जमा होतात आणि.... आणि दोष तिचाच असणार हे गृहीत धरले जाते. तिला जीव तोडून पटवावयाचा प्रयत्न करावा लागतो .... " प्रियकर गेला खरा पण मी काही भांडण काढले नव्हते.

"ग्रेट सोल..." आणि "दि बुक ऑफ मॉर्मन"

लेखक विकास यांनी बुधवार, 30/03/2011 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज अनेक वृत्तपत्रांमध्ये आलेली "Great Soul: Mahatma Gandhi And His Struggle With India" या पुलीट्झर पुरस्कार विजेत्या लेखकाच्या पुस्तकाबद्दल बातमी वाचली आणि त्याच वेळेस गेल्या आठवड्यात वाचलेले ब्रॉडवे थिएटर मधील "दि बुक ऑफ मॉर्मन" या ख्रिश्चनांमधील मॉर्मन नामक पंथाच्या पुस्तकाबद्दलचे विडंबन आठवले.

मी आहे एक सामना

लेखक मुक्तसुनीत यांनी बुधवार, 30/03/2011 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी आहे मी आहे एक सट्टा पाच हजार कोटींचा (सगळे खेळाडू नि बुकी मिळून) मी आहे एक कमांडो स्क्वाड काही डझनांचा (पोलीस बिलिस चिल्लर सोडून ) मी आहे एक खेळ बावीस जणांचा (बदनाम झालो युद्ध युद्ध म्हणून) मी आहे एक झिंग मी आहे शिव्यांचा पाऊस मी आहे टाळ्यांचा कडकडाट मी आहे एक ईर्षा मी आहे चढलेला त्वेष मी आहे दडपलेला द्वेष मी आहे एक भोळसट प्रार्थना मी आहे एक करोडोंची संधी मी आहे एक जिंकल्यावर मारलेली आरोळी मी आहे एक हरल्यावर केलेली आत्महत्या मी आहे एक दिवस काल आणि आजसारखाच. मी आहे एक सामना. एकशे चाळीस कोटी लोकांनी पाहिलेला (कामधाम बाजूला ठेवून )

प्रतिबिंब

लेखक मूकवाचक यांनी बुधवार, 30/03/2011 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या छोट्याश्या कौलारू घराच्या एका कोपर्यात धुनीवर टांगलेला आरसा तेजाळला आहे. नितळ आणि रिक्त आरशात तळ्यातल्या तरंगांचे प्रतिबिंब उमटते आहे. --- माझ्या पादुका दरवाजाजवळच्या कोनाड्यात धीरोदात्तपणे प्रतीक्षा करत आहेत. हे घर जिथे मी सारे जीवन व्यतीत केले. जिथे काही क्षणांपुर्वीच प्रखर सूर्यप्रकाशात सचेतन मी भलत्याच खोड्या काढत खळखळून हसायचो. --- आज इथे संतजन लोटले आहेत. एकतारी छेडत निर्गुणी भजने गात आहेत. त्यांचा आनंद...
काव्यरस

महसूल वार्ता!

लेखक आळश्यांचा राजा यांनी मंगळवार, 29/03/2011 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - येऊ द्या आणखी महसूल वार्ता !! - (भाऊसाहेब) रामदास) एकदा इंद्राने सगळ्या सरकारी यंत्रणेला मेजवानी द्यायचे ठरवले. या पापी लोकांना अशी स्वर्गात पार्टी देण्यामागे इंद्राचा अंतस्थ हेतू बहुदा एखादा भूखंड लाटण्याचा असावा अशी दाट शंका बर्‍याच देवांना होती. पार्टीत इंद्र कुणा कुणाला कशी वागणूक देतो यावर बर्‍याच जणांचे लक्ष होते. संध्याकाळी सात पासून पाहुणे यायला सुरुवात झाली. स्वर्गीय संगीताच्या तालावर अप्सरा नृत्य करु लागल्या. त्रिभुवनातील उत्तमोत्तम आणि प्राचीनतम मद्यांचे चषक किणकिणत पाहुण्यांमधून फिरू लागले.

मोहाली सामना आणि राष्ट्रगीते

लेखक अलख निरंजन यांनी मंगळवार, 29/03/2011 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
उद्याच्या मोहालीतील सामन्यात पाकिस्तानचे राष्ट्रगीत गायले जावे का? पाकिस्तानच्या अध्यक्षांच्या येण्यावरुन तात्या वगैरेंनी निषेध नोंदवला आहे, उद्या त्यांच्या राष्ट्रगीताला मोहालीतील प्रेक्षकांनी उभे राहावे का? एक वडा दोन पाव लोकांचे मत काय आहे?