झोपेत चालणे..
काहि लोकांना झोपेत चालण्याची सवय असते असे वाचनात आले..
काहींना विस्मृती व वैचारिक गोंधळामुळे चमत्कारिक वागण्याचा त्रास होतो. अशा स्थितीत माणसे झोपेत चालतात किंवा इतर हालचाली त्यांच्याकडून जाणीव नसताना होतात..
नायक वा नायिका झोपेत चालते या वर चित्रपटात हि बरेच प्रसंग आपण पाहिले असतिल..
स्लिप वॉकर नावाचा एक सिनेमा पण येवुन गेला होता..रात और दिन सिनेमात नरगीस वर असे सिन चित्रीत केले गेले होते.
काहि लोक झोपेत चालत जावुन दाराच्या कड्या उघडतात अश्या पण गोष्टी ऐकिवात आहेत...
आपल्या वाचनात वा पहाण्यात असे काहि आले का? अनुभव शेअर करणार का?
गझल
पुन्हा काल स्वप्नात आली गझल
खुले पापणी अन् उडाली गझल
कशी कोरडी मी, जरी वाहते
तुझ्या आठवांच्या पखाली गझल?
नसे वेगळे रूप माझे-तिचे,
मला वारशाने मिळाली गझल
"जरा एकटे वाटते, शब्द दे
तुझे सोबतीला" म्हणाली गझल
जुळे प्रेम एका कटाक्षामध्ये,
क्षणार्धात माझीच झाली गझल!
नको या प्रवासात थांबा कुठे,
सवे आज माझ्या निघाली गझल
काव्यरस
जाहिरातीच्या --चा घोव....
जाहिरातीच्या --चा घोव....
रंगलेल्या सामन्यात जाहिरातींचे मांजर आडवे ... कधी शाहरुख ओठांचा चंबू करून मैत्रिणीची वाट पाहतोय... तर ३ अंडामन टीटी खेळताना उच्छाद मांडतायत.....चित्र नेहमीचेच आहे... पण काल ते प्रकर्षाने खटकले शिवाय आपण जिंकलेल्या मॅचचे महत्व वेगळेच....भिऊ नकोस ...
फुलपाखरांमागे धावताना, कधी झोक्यावर हिंदोळताना
पावसात भिजून आणि ओल्या मातीत खोपे करताना
दगडधोंडे उचकताना अन् काट्याफुफाट्यात हिंडताना
कळलंच नाही की तो आहे आणि हळूच कानी म्हणतो आहे
"भिऊ नकोस ... पण मी तुझ्या पाठीशी आहे."
नवी नव्हाळी फुटताना, सगळं जग फुलताना
नवी शिखरे चढताना, सागर पालथे घालताना
छातीने पर्वत फोडताना अन् लाथेने पाणी काढताना
दुर्लक्ष केलं उद्दामपणे जरी कळलं तो म्हणतोच आहे
"भिऊ नकोस ...
काव्यरस
बेदखल
धुराच्या ढगात वेढलेला, आणि
चारी बाजूनी घोंगावणा-या
चारचाकी यंत्राच्या गोंगाटात,
डांबराच्या तापलेल्या रस्त्यांवरच्या
करड्या मळकट पट्ट्यांना ओळख देत
तल्लीन झालेला तो रंगारी…
त्यांनी ह्याला कि ह्यानी त्यांना बेदखल केलंय,
हे ओळखण तसं कठीणच.
जपणा-या माणसांपेक्षा
मुकाट खपणा-या बिन हृदयाच्या
यंत्रांची जंत्री वाढली कि
हे अस व्हायचंच…
इटालियन लज्जत ... पांढरा पास्ता.
संजीव कपूर छाप पांढरा पास्ता (दोन-तीन जणांसाठी)
साहित्य
मॅकरोनी पास्ता (पाव किलो ते तीनशे ग्राम)
पास्त्याचे विविध प्रकार इथे आहेत... http://www.archimedes-lab.org/pastashape.html
चीज ...
पास्त्याचे विविध प्रकार इथे आहेत... http://www.archimedes-lab.org/pastashape.html
चीज ...पारंपारिक प्रतिस्पर्धी
तुम्ही कधी साप आणि मुंगुसाला भांडताना बघितले आहे? दोघेही जीव खाउन लढतात. कारण ती अस्तित्वाची लढाई असते. आजवर कधी पाहण्याचा योग आला नसेल तर आज बघा. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० मिनिटांनंतर २ देशातले २२ खेळाडु साप आणि मुंगुसासारखे लढणार आहेत. हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर २ देशांच्या अस्मितेचा सुद्धा प्रश्न आहे. आजचा भारत - पाकिस्तान सामना हा तिसर्या महायुद्धापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा आहे. याआधी विश्वचषकाच्या इतिहासात हे २ देश कधीही उपांत्य फेरीच्या सामन्यात समोरासमोर आले नाहीत. याआधी कधीही त्यांची लढाई अस्तित्वाची लढाई नव्हती.
मिसळपाव
