Skip to main content

जाहिरातीच्या --चा घोव....

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 31/03/2011 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
जाहिरातीच्या --चा घोव....
रंगलेल्या सामन्यात जाहिरातींचे मांजर आडवे ... कधी शाहरुख ओठांचा चंबू करून मैत्रिणीची वाट पाहतोय... तर ३ अंडामन टीटी खेळताना उच्छाद मांडतायत.....चित्र नेहमीचेच आहे... पण काल ते प्रकर्षाने खटकले शिवाय आपण जिंकलेल्या मॅचचे महत्व वेगळेच.... २०१५ च्या वर्ल्ड कपच्या वेळी काय असेल याचे त्रैराशिक मनांत आणले तर ते काहीसे असे असावे..... हवेत चौकोन काढून तिसऱ्या अंपायरचा निर्णय ठरेपर्यंत जसा खेळ तात्पुरता थांबतो तसा जाहिरातींसाठी तो थांवलेला असेल जाहिरातीं संपल्या की पुढला चेंडू टाकायला अंपायर परवानगी देतोय.... ...उंच लगावलेला चेंडू हवेतून येताना जाहिरातीची वेळ झाली तर तो बॉल नो बॉल मानला जाऊन पुन्हा टाकावा लागणार असे काहीसे ते असावे...

वाचने 4499
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

कधी स्वतःचे घर बांधायला काढण्याची औकात आलीच तर मी जेपी सिमेंट चुकूनही आणणार नाही. कोणतीही गोष्ट भाताने किंवा खळ बनवून चिकटवीन पण फेविकॉल आणणार नाही. लाकडी फर्निचरला फेविकॉल अनिवार्य असेल तर रॉट आयर्नचे फर्निचर आणेन. झेनिथचा मोबाईल असाही घेतला नसताच, आता मात्र हातात बघायलाही घेणार नाही. आणि बरेच काही... असो.

In reply to by गवि

+१ गवि.. कधी स्वतःचे घर बांधायला काढण्याची औकात आलीच तर मी जेपी सिमेंट चुकूनही आणणार नाही. कोणतीही गोष्ट भाताने किंवा खळ बनवून चिकटवीन पण फेविकॉल आणणार नाही. लाकडी फर्निचरला फेविकॉल अनिवार्य असेल तर रॉट आयर्नचे फर्निचर आणेन १ नंबर... =)) =))

जाहिराती म्हटले की वपुंची 'तारतम्य' कथा आठवते. (बाकी असतो एक 'ठराविक' काळ वपु वाचण्याचा) म्हणून तर आम्हाला 'येम्म येल्ल येम्म' कुम्पण्या आडवतात. ;) णो जाहिराती. ( आम्बवे सोडून )

अगदी अगदी!! आपल्या सार्‍या एन्थुचा चुथडा करतात ऐनवेळी . बर्‍याचदा मी शेवटचा बॉल हा रिप्ले तच बघितलाय, कारण? माणस जेव्हढी टी.व्ही ला चिकटतील तसा जाहिरातीच्या मधला वेळ कमी कमी होत जातो. कधी कधी अगदी कपाळाला हात मारुन घेण्या इतका वीट येतो त्या जाहिरातींचा.

डॉळे पाणावले. नाडी व्यतिरिक्त लिखाण वाचुन.

'पेप्सी' पीत 'लावा(लावी)' केल्याने मला 'हरो-हुंडा' चे 'अ‍ॅडिक्शन' झाले... :) -सूर्यपुत्र.

ओक साहेब या एकदा आमच्या गरीबांच्या आफ्रिकेत, स्टार्ट टु फिनिश आख्खी मॅच विदाअट अ‍ॅड बघायला. :)

In reply to by गणपा

शशिकान्त'जींचा लेख खूप दिवसांनी आल्याबद्दल अभिनन्दन! :) __________________ आजकाल शाह्-रुक- खान बरोबर कोणतीही मुलगी दिसली... की ती त्याच्या मुलीप्रमाणे किना सर्वांत धाकट्या बहिणीप्रमाणे वाटते! ;) त्याच्या गालावरच्या खळ्या आणि सुरकुत्या यांतला फरक आजकाल खूपच्च अस्पष्ट होत चाल्लाये! ;) -सलमानप्रेमी मृंगीता निजयानी /नैनर्या माय / मृगरिना नैक /मृगीन ! ;)

In reply to by मृगनयनी

मृंगीता निजयानी /नैनर्या माय / मृगरिना नैक /मृगीन !
त्रिवार नमन !!! __/\__ __/\__ __/\__ -(अझहरुद्दीन/अभिषेक-विवेक/ अक्षयकुमार)

In reply to by टारझन

आपणांस नेमके कुणाचे वडील म्हणायचे आहे याचा खुलासा द्यावा... आम्ही लालुंच्या गावाहुन आलेलो नसल्याने एवढी कुवत नक्कीच नाही....

In reply to by मृगनयनी

मृंगीता निजयानी /नैनर्या माय / मृगरिना नैक /मृगीन !
हा नवा काव्यालंकार तो ही मृलमान नैमी ने रचलाय मग त्या वानरसेनेचे काय होणार...

नाय नाय असा नाय काय ह्यो वपाडारुद्दिन/वपाडावषेक-वपाडाविवेक/वपाडावकुमार असा पायजेल. इरमान सान

त्यांना पण पोट असते.. वाहिन्या चालणार कश्या? झु झु ग्रेट

In reply to by नरेशकुमार

नरेशकुमार!... आपण नवीन आहात का मिपावर? ;) शशिकान्त्'जींनी त्यान्च्या सहीच्या वरती दिलेली लिन्क फॉलो करा.... मग तुम्हाला कळेल... "नाडी" म्हणजे काय? :)

In reply to by नरेशकुमार

णाराज नका होऊ ... मिसळपाव वर मोठे होणं .. लहाण होणे .. हा णिसर्गाचा णियम आहे ... त्याला आव्हाण देऊ नका णकु .. अवघडुन बसाल -ऍड्जेस्टेबल

अलिकडेच आम्ही एम्बेडेड नि इन्डायरेक्ट मार्केटिंग बद्दल वाचले. चांगली कॉन्सेप्ट आहे. ती हेवर्डस ५००० सोडाची जाहिरात पाहिली का? जाणकारांना त्यातून आवश्यक त्या उत्पादनाची आठवण होते. नि पुन्हा जाहिरात करणारा आपण त्या उत्पादनाची जाहिरात केलीच नाही असे म्हणू शकतो (आणि ते तांत्रिकदृष्ट्या खरेच असते). पण ती जाहीरात पाहणार्‍याच्या डोक्यात जाहिरात न केलेले उत्पादनच कायम राहते (हा जाहिरात पाहणार्‍याचा दोष!). यालाच साहित्यिक भाषेत 'प्लेईंग इन द हॅन्ड्स ऑफ...' असे म्हणतात.

In reply to by रमताराम

नि पुन्हा जाहिरात करणारा आपण त्या उत्पादनाची जाहिरात केलीच नाही असे म्हणू शकतो (आणि ते तांत्रिकदृष्ट्या खरेच असते).
त्याशिवाय, दखलक्षम अधिकारीवर्गसुद्धा याबाबत सोयिस्करपणे काणाडोळा करू शकतो, हा या तंत्रामागील अधिकचा ('बोनस') फायदा आहे. सोड्याची जाहिरात म्हणजे तरी खूपच प्रत्यक्ष झाली. पत्त्यांच्या क्याटची जाहिरातसुद्धा पाहिलेली आहे. (हा म्हणजे थोडासा, 'कोणाला चॉकलेट हवे का चॉकलेट?' अशी वस्तूची उघडपणे जाहिरात करावी, 'चॉकलेट चोखता येते' अशी अधिक माहिती पुरवावी, शिवाय 'चॉकलेटमध्ये बीफ घातलेले आहे' म्हणून वस्तूच्या मांसलत्वाकडेही निर्देश करावा - जाहिरातीच्या विषयवस्तूचा स्पष्ट उल्लेख न करतासुद्धा 'ही काहीतरी गडद रंगाची मांसल चोष्यवस्तू असावी' असा इष्टसंदेश 'टार्गेट ऑडियन्स'ला व्यवस्थित पोहोचतो, आणि 'नॉन-टार्गेट ऑडियन्स'ची दुर्लक्ष करण्याचीही सोय होते. बरोबरच आहे, जाहिरातीचे जे लक्ष्य नाहीत, त्यांना याकडे लक्ष वेधले जाण्याचा फुकाचा त्रास का द्यावा? - अशातला प्रकार आहे. आपण म्हणता ते बरोबर आहे. अशा प्रकारच्या जाहिरातक्यांपेनी पाहायला मिळतात खर्‍या. आणि सफलही होतात असे वाटते.)