Skip to main content

मेथीची पचडी --

लेखक निवेदिता-ताई यांनी बुधवार, 30/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 6011
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

In reply to by गवि

गवि साहेब , पचडी छान लागते. खाऊन पहा. मेथी मात्र एकदम बारीक चिरलेली हवी. आमच्या घरी फोडणी न देता कच्चेच तेल वापरतात. वरील सर्व जिन्नस त्यात असतात फक्त फोडणी नाही. ऑलीव्ह चे तेल तर छानच लागेल त्यात. @निवेदिता ताई - पछडी असा शब्द पहिल्यांदाच ऐकला. ह्या रेसिपीला पचडी म्हणतात असेच आतापर्यत ऐकलेले आहे.

In reply to by वहिनी

आमच्या वहिनीबाईंना पचडी खूपच आवडलेली दिसते.;) तसे असेल तर शाल्मलीने अश्याच प्रकारची कांद्याच्या पातीची कोशिंबीर दिलेली होती. तीही आवडेल.

क्यामेरा नविन घेतला काय नि-ता?:) आम्ही याला पचडी (च चा उच्चार चमच्यातल्या च सारखा करावा.) म्हणतो आणि भन्नाट आवडते. हे फ्याटी फूड नसल्याने खाताना अपराधीपणा जाणवत नाही.

निवेदिता ताई, आम्ही पचडीत चिमूटभर साखरही भुरभुरतो. म्हणजे मग मेथी (किंचित कडवट), लिंबू (आंबट), मीठ (खारट), मिरची (तिखट) आणि साखर (गोड) असे पंचरस पूर्ण होतात. मेथी थोडी चिरुन कच्चे तेल, तिखट-मीठ, बारीक कांदा टाकून खाल्ली तरी चविष्ट लागते.

मलाही आवडेल ही पचडी खायला .मी यात लसुन्-शेंगदाणा चटणी आणि कच्चे तेल घालते मस्त लागते.-कच्ची पचडी

आम्च्याकडे मेथीची पाने चिरत नाही. तसेच ह्यात कांदा आणि टोमॅटो बारीक चिरुन, वर थोडं शेंगदाण्याचं किंवा तिळाचं कुट, तिखट, मीठ, चिमुटभर साखर, छोटा चमचा कढवलेलं तेल, आणि थोडंस लिंबू असं सगळं घालतो. ह्याला आम्ही घोळाना म्हणतो. हे सॅलर्ड लै भारी लागते... शिवाय ह्यात गोड, कडू (मेथीचा कडवटपणा), आंबट, आणि खारट अश्या सगळ्या चवीपण आहेत!

ह्म्म... बाय डिफॉल्ट ताई... मेथीची पचडी हा नवा प्रकार कळला. कोबीची पचडी मला लयं आवडते.चकली तायच्या ब्लॉगवर त्याची पाकॄ सापडेल. (बाय डिफॉल्ट खादाड) ;)

पाकृ दिसतेय छान पण मेथीची अशी फक्त पाने खुडून घेणे म्हणजे अगदी कंटाळवाणे काम :( मी तर, मेथीची भाजीदेखिल देठासकट करतो. शिजल्यावर देठ कळतही नाही.