Skip to main content

उमलू द्या कळ्यांना : लहान मुलांचे शोषण, माहिती, खबरदारी व कायदा

लेखक अरुंधती यांनी रविवार, 10/04/2011 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
''मुले म्हणजे देवाघरची फुले'' या उक्तीला लाजिरवाणी, न साजेशी अपकृत्ये जेव्हा भोवतालच्या समाजात घडून येताना आढळतात तेव्हा मुलांचे बालपण त्यांच्यापासून हिरावून घेणार्‍या, त्यांना कुस्करणार्‍या कुप्रवृत्तींचा राग आल्यावाचून राहवत नाही. परंतु कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर हे विषय उघडपणे मांडणे हेही अनेकदा निषिध्द मानले जाते. अतिशय गंभीर अशा ह्या विषयावर घरात किंवा घराबाहेरही चर्चाविचार करण्यास लोक अनुत्सुक दिसतात. ''माझा काय संबंध?'' ह्या प्रवृत्तीपासून ते ''असले विषय दूर राहिलेलेच बरे'' इथपर्यंत असलेली सामाजिक उदासीनता कायदा व सुव्यवस्थेला आणि समाजाला घातकच ठरते.

आज ही गेले

लेखक निनाव यांनी रविवार, 10/04/2011 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज ही गेले काल मधे जमा झाले आठवणींच्या पेटित असे बंद झाले!! न आठवलो मी कुणास आजही न कुणी मज आज भेटीस आले!! बघून आभाळ खिडकी तुन म्हणतो मी चला दिवस अजुन एक कमी झाले!! अनवाणी चालतांना टोचले जर पायी अजुन एक घाव, नवीन काय झाले!! कुणी ठेवले नाव मज, तिच्या नावानं नाव असे झालेच, तर निनाव काय झाले!! आज ही गेले काल मधे जमा झाले आठवणींच्या पेटित असे बंद झाले!!

श्री. सुधीर काळे यांचे अभीनंदन

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 10/04/2011 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांचा झेंडा पुन्हा एकदा प्रिंट मिडीयावर लागला. सुधीर काळे मिपावर जागतीक घडामोडींचा आढावा नेहमीच घेत असतात. त्यांचा "मित्रराष्ट्र म्हणून कशी आहे अमेरिका"" हा लेख दि.३ एप्रीलच्या सकाळच्या "सप्तरंग" पुरवणीत छापुन आला आहे. तो लेख येथे वाचा.

संकल्प सिद्धी

लेखक बाळासाहेब तानवडे यांनी शनिवार, 09/04/2011 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
संकल्प सिद्धी मिळेल जीवनात खात्रीने जय. पहिलं पक्क असावं अंतिम ध्येय. स्वप्नरंजनातच न व्हावं चकित. कागदावर ध्येयाच होऊ दे लिखित. नवी कल्पना नित्य लिखितात भरु दे. अंतिम ध्येयाला परिपूर्णत्व येऊ दे. सार्याय कल्पनांची आता योजना बनु दे. प्राथमिकता महत्ते अनुक्रम ठरू दे. नुसत्या ध्येयाला ना आरंभ ना शेवट. पूर्णत्वाची समय सीमा असावी चिवट. आता ना कशाची वाट पहावी. तत्काळ कार्याला सुरुवात करावी. एक ही दिन ना व्यर्थ असावा. अंतिम ध्येय प्राप्तीतच अर्थ दिसावा. लिखित ध्येयाच महत्व सर्वास कळावं. मनाजोग यश सर्वास मिळावं. कवी : बाळासाहेब तानवडे © बाळासाहेब तानवडे – ०४/०४/२०११
काव्यरस

रिकामा देव्हारा

लेखक शरद यांनी शनिवार, 09/04/2011 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
याच देव्हार्‍यात होता .... याच देव्हार्‍यात होता देव आमुचा आधार आता रिकामा देव्हारा तरी माझा नमस्कार. नमस्कारास वाकता क्षणी घडे चमत्कार वीणा लागली वाजाया झाला टाळांचा गजर. समईत जळू लागे प्राण होऊनिया ज्योत आणि उजळले विश्व काळ राहिला तेवत. कसे मला आता दिसे माझे वेगळे शरीर रिकाम्या देव्हार्‍याला पुन्हा माझा नमस्कार. शंकर वैद्य श्री. वैद्यांचा चमत्कार काय तो पाहण्याआधी थोडी अवांतर माहिती देतो. शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर माऊली दोघेही अद्वैती. दोघांनी गीतेवर टीका लिहल्या. दोघांच्या मतात साम्य दिसल्याने डॉ.

चित्रपटसृष्टीतील मधुर आणि अवीट गाणी.

लेखक कलंत्री यांनी शनिवार, 09/04/2011 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
भारताची चित्रपटसृष्टी हे न समजणारे आणि त्याचबरोबर हवेहवेसे वाटणारे गारुड आहे. भारताच्या या मयसभेवर सर्वच भारतीयांचे मनापासून प्रेम असते आणि त्याचबरोबर आपल्या भावविश्वात यातील अनेक गोष्टींना मनापासून स्थान असते. याच मयसभेतील एक दालन म्हणजे यातील असणारी गाणी आणि त्या गाण्यावर नाचणारी पावले, त्यातील नृत्यांगणा आणि नर्तक. संध्याकाळी घरी थकून भागुन आल्यानंतर युट्युब वर गाणी ऐकणे आणि पाहणे हा खरोखरच आनंदाचा न संपणारा खजिना आहे. मला आवडलेली काही गाणी. १. लागा चुणरीमै दाग मै मिटाऊ कैसे? २. ओठोपै बात मै दबाके चली आई ३. दिलके झरोको मै तुझको बिठाकर. ४. पियातु अब तो आजा. ५.

अगम्य

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 09/04/2011 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
काल बर्‍याच वर्षांनंतर ठाण्याला जायचा योग आला. मीटिंग होती ती टाळण्याकडेच माझा कौल होता. २ तासांची मीटिंग आणि ६ तासाचा प्रवास हे काही मला न झेपणारे समीकरण आहे. पण फक्त ठाण्याला मीटिंग आहे म्हणुन शोध घेतला तेव्हा कळाले की मीटिंग थेट शाळेच्या शेजारच्या इमारतीत आहे. मीटिंगबद्दल अनुत्साही असलेला मी त्यामुळे एकाएकी उत्साहाने कामाला लागलो. बरोबर २-३ सहकारी होते. सगळ्यांना फोनाफोनी करुन मीटिंगला उशीर होउ नये यासाठी लवकर निघाले पाहिजे असे ढोल बडवले. त्यामुळे ११ च्या मीटिंगसाठी ७ वाजताच निघालो. त्यामुळे अर्थातच लवकर पोचलो. ठाण्यात शिरताना जुन्या खुणा शोधत होतो.

निमंत्रण

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 09/04/2011 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर लोकांना वादविवाद घालायला अथवा काथ्याकूट करायला फार आवडते. अशांसाठी आज एक कार्यक्रम आहे आज दि. ९ एप्रिल २०११ रोजी राजीव साने यांची पहिली मांडणी खालील विषयावर असेल. “युक्तिवाद म्हणजे क्लुप्तिचातुर्य नव्हे!” (वादविवादातील हमखास भरकटवणारे प्रकार, फॅलसीज) वेळ: संध्याकाळी ६.०० वाजता मांडणीला सुरुवात होईल. त्यापूर्वी पोचावे ही विनंती. स्थळ: मनीषा सोसायटीचे सभागृह, नवसह्याद्री जवळील अलंकार पोलीस चौकीकडून प्रतिज्ञा मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर `देवेश, (चितळे बंधू अधिकृत विक्रेते)” या दुकानाच्या रस्त्याला वळावे.

हे पुस्तक कुणाच्या पहाण्यात आहे काय ???

लेखक ईश आपटे यांनी शनिवार, 09/04/2011 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
नाव-स्वर्गरहस्य लेखक- खरे किंवा दुसर काही नाव ही असेल प्रकाशक- व्हीनस प्रकाशन , पुणे मी प्रकाशकांकडे चौकशी केली , पण त्यांनी ते आउट ओफ प्रींट असल्याचे सांगितले... माझ्या नेहमीच्या ग्रंथालयातुन जे १०० वर्षे जुने आहे..., ते पुस्तक कोणी नतद्र्ष्टाने पळवळले आहे... कृपया कुणाला ह्या पुस्तकाबद्दल माहिती असल्यास कळवावी..........