Skip to main content

श्री. सुधीर काळे यांचे अभीनंदन

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 10/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांचा झेंडा पुन्हा एकदा प्रिंट मिडीयावर लागला. सुधीर काळे मिपावर जागतीक घडामोडींचा आढावा नेहमीच घेत असतात. त्यांचा "मित्रराष्ट्र म्हणून कशी आहे अमेरिका"" हा लेख दि.३ एप्रीलच्या सकाळच्या "सप्तरंग" पुरवणीत छापुन आला आहे. तो लेख येथे वाचा. (काही काळापुर्वी त्यांची 'न्युक्लीयर डिसेप्शन' ही लेखमालासुद्धा प्रसीध्द झाली होती.) ह्याच प्रमाणे मिपावर त्यांनी टाकलेला "सचिनचे शतक म्हणजे भारताचा पराजय हा निखालस (गैर)समज" हा लेख सुद्धा ३ एप्रीलचे सकाळ मधे प्रसीध्द झाला आहे (येथे वाचा) मिपाकरांचा झेंडा पुन्हा एकदा प्रिंट मिडीयावर लावणा-य सुधीर काळे यांचे अभीनंदन.

वाचने 6944
प्रतिक्रिया 46

प्रतिक्रिया

मिपा अशीच वेळोवेळी प्रगती करो, आणी काळे साहेब सूध्दा.

In reply to by आत्मशून्य

खुपंच छाण हो श्री. काळे . आता तुम्ही फुलटाईम पेपरात लिहा बघु .. :) आणि अंतरजालाला जरा मुक्ती द्या .. ;) ;)

In reply to by सुनील

काळे काकांचे अभिनंदन ! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काळे काकांचे अभिनंदन !

चिंतामणी-जी, माझ्या लेखांची नोंद घेऊन व त्यांचे दुवे इथे दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!

अभिनंदन! काका 'न्युक्लीयर डिसेप्शन' चे पुस्तक (अनुवाद) झाले का हो? व्हायला पाहीजे. मोठ्या पुस्तकाचा अनुवाद असो, भारतापुढील राजनैतीक, सरंक्षण आव्हाने असो किंवा नुकताच झालेला विश्वचषक असो. काका मोठ्या चिकाटीने अभ्यासपूर्ण लेखन करतात. त्यांचा हा गुण आपण घेण्यासारखा आहे.

In reply to by सहज

लिहून केंव्हांच संपलंय्, पण पुस्तकरूपाने लोकांसमोर आणण्यासाठी प्रकाशक मिळत नाहींय्! जकार्ताच्या 'उंटा'वरून प्रकाशनाच्या 'शेळ्या' हाकणे फारच कठीण वाटते आहे! यथील सहसभासदांनी मदत केल्यास उपकार होतील.

In reply to by प्रास

@ आणि शिल्लक उपक्रमाबद्दल हार्दिक शुभेच्छा! +१ सकाळच्या चोखंदळ वाचकांनी काकांचे लिखाण नेहमीच आवडीने वाचले आहे .हे त्यांच्या लेखाला आलेल्या प्रतिसादावरून दिसून येते .

ह्या लेखांची वैचारिक पातळी ही ज्या "प्रिंट" मिडिया " मध्ये हे लेख प्रसिध्द झाले आहेत त्यांच्या पेक्शा खूप मोठी आहे. काळेकाकांच्या लेखांवर विचार करून कृती करणे आवश्यक आहे असे ही वाटते ( ऊदा. चीनी वस्तुंचा वापर न करणे / टाळणे )

In reply to by तर्री

>>ह्या लेखांची वैचारिक पातळी ही ज्या "प्रिंट" मिडिया " मध्ये हे लेख प्रसिध्द झाले आहेत त्यांच्या पेक्शा खूप मोठी आहे. अगदी असेच म्हणतो.. काळेकाकांचे अभिनंदन,

In reply to by पक्का इडियट

असेच म्हणतो. काळेकाका अभिनंदन. आपण लिहीत राहा आम्ही वाचत आहोत.

In reply to by तर्री

चीनी वस्तुंचा वापर न करणे / टाळणे ) विचार ठीक आहेत पण आजकाल सगळीचकडे चायनामेड वस्तु प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळतात...कसे टाळणार?

काळेकाकांचे अभिनंदन!! काळेकाकांचे लिखाण नेहमीच वाचनिय असते. त्यांचा अभ्यास त्यांच्या लिखाणातुन दिसुन येतो. सचिन वरचा लेख केवळ लाजबाब होता. पुलेशु,

In reply to by नरेशकुमार

सर्वप्रथम माझ्या लिखाणाला प्रोत्साहन देणार्‍या प्रतिसादांबद्दल ते देणार्‍या सर्वांचे मनःपूर्वक आभार! तसेच माझा लेख स्वीकारून छापल्याबद्दल 'सकाळ'चे श्री. सम्राट फडणीस यांचेही मनःपूर्वक आभार. इथे एकाला तरी "भारतीय-कसा मी, असा मी ----" ची आठवण झाली आणि मी धन्य झालो! आता विश्वचषकाची 'जंबोरी' संपली आहे व ते लिखाण पुन्हा लवकरच सुरू करत आहे! पुन्हा एकदा सर्व 'मिपा' वाचकांचे मनःपूर्वक आभार!

काळेकाकांचे अभिनंदन! आणि पु. ले. शु.

काका मी हा लेख तुम्ही आवर्जून सांगीतला तरी ही कार्यबाहुली मुळे उशिरा वाचला, त्याबध्द्ल क्षमस्व ! तुमचे लेख अप्रतिम असतात अन ते दुर्लक्षीत होत नाहीत हे त्यावर आलेल्या प्रतिसादांच्या संख्येवरुनच समजते आहे पुनश्च अभिनंदन !!

In reply to by वाहीदा

मी हा लेख तुम्ही आवर्जून सांगीतला तरी ही कार्यबाहुली मुळे उशिरा वाचला, त्याबध्द्ल क्षमस्व !
असेच म्हणतो . मला आत्ता थोडी कार्यबाहुली आहे .. ती संपवुन येतो !!! - (अंमळ कार्यबाहुला) टारझन

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ओ पुपे तुम्ही ऒफ़ीस मध्ये आल्टमपाल्टी खेळता का हो ?? की तुम्ही अन तुमचा बॉस / बॉसीण शिवाशिवी / पकडापकडी खेळता :-?

हा लेख वाचल्याबद्दल चिंतामणीकाकांचे अभिनंदन. आम्ही आमची पोच लेख वाचल्या दिवशीच दिली आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

हा लेख वाचल्याबद्दल चिंतामणीकाकांचे अभिनंदन. धन्स भा. पो. :) आम्ही आमची पोच लेख वाचल्या दिवशीच दिली आहे. अधीक माहितीबद्दल पुन्हा एकदा धन्स.