Skip to main content

आज ही गेले

लेखक निनाव यांनी रविवार, 10/04/2011 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज ही गेले काल मधे जमा झाले आठवणींच्या पेटित असे बंद झाले!! न आठवलो मी कुणास आजही न कुणी मज आज भेटीस आले!! बघून आभाळ खिडकी तुन म्हणतो मी चला दिवस अजुन एक कमी झाले!! अनवाणी चालतांना टोचले जर पायी अजुन एक घाव, नवीन काय झाले!! कुणी ठेवले नाव मज, तिच्या नावानं नाव असे झालेच, तर निनाव काय झाले!! आज ही गेले काल मधे जमा झाले आठवणींच्या पेटित असे बंद झाले!!
लेखनविषय:

वाचने 819
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

निनाव, अतिशय सुंदर रचना!!! त्यातल्या त्यात
अनवाणी चालतांना टोचले जर पायी अजुन एक घाव, नवीन काय झाले!!
ह्याला तर तोड नाही.