Skip to main content

बिहार युपी बिमारू राज्ये

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी रविवार, 17/04/2011 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी पुरीवाल्यांना का मारले ? इतर सर्व पाणीपुरीवाले हातात ग्वोज घालून पाणीपुरी विकतात . त्यांची नखे व हात ते जेव्हा पाण्याच्या मटक्यात बुडवतात तेव्हा स्वच्छ असतात . ती लोक १० ते १५ जण मिळून एका खोलीत राहतात त्यामुळे शारीरिक स्वच्छता उत्तम रीत्या जोपासतात .अश्या स्वच्छ निर्मळ मनाच्या पाणीपुरी वाल्यांना जे दर महिन्याला मुंबईच्या रस्त्यावर तो रस्ता त्यांच्या तीर्थ रूपांचा असल्याच्या अविर्भावात धंदा करतात (

चेरि ब्लोसम - सोल, दक्शिण कोरीया.

लेखक प्रशान्त पुरकर यांनी शनिवार, 16/04/2011 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो, येथे काहि छायाचित्र डकवत आहे, श्री. शरद तसेच इतर जानकारान्च्या मार्गदर्शानाचि प्रतिक्षा.

मिसळपाव विषयी......

लेखक किसन शिंदे यांनी शनिवार, 16/04/2011 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी..... माझा पहिलाच प्रयत्न आहे मिपालेखनाचा त्यामुळे काही त्रुटी आपल्याला आढळल्यास सांभाळून घेणे. तसा मी सुद्धा मिपाकर आहे पण फ़क़्त वाचनापुरता. गेल्या वर्षी आगस्टमध्ये गुगलवर कोल्हापुरी मिसळीची पाककृती(स्वाती राजेश यांनी लिहलेली अतिशय चटकदार अशी कोल्हापुरी मिसळीची पाककृती) शोधता शोधता मिसळपाववर आलो आणि मग इथलाच झालो. सर्व मिपाकरांप्रमाणे मिसळपाव हा माझासुद्धा वीक पोइन्ट आहे. त्यानंतर मिसळपावची सवय इतकी अंगवळणी पडली कि सकाळी ऑफिसला आल्यावर सर्वात पहिल्यांदा मिसळपाव ओपन करतो आणि त्यानंतरच मग बाकीची सगळी कामे करतो.

एकाची सजा सगळ्यांना

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 16/04/2011 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
मान्य आहे, की कोणी एक पाणीपुरीवाला एक घाणेरडे कृत्य करतांना पकडला गेला. शक्य आहे, की असे समाजविघातक आणखीही काही असतील. समाजत घडलेले असे एक उदाहरण पाहिले आणि हातावर पोट असलेल्या ३०० कष्टकरी लोकांचे स्टॉल्स फोडले. वड्याचे तेल वांग्यावर? हे सगळेच स्टॉलवाले असे बेजाबदार होते? अशी शिक्षा ३०० निरपराध लोकांना देणारे हे कायद्याचे रक्षक होते की आणखी कोणी? एका घाणेरड्या कृत्याने येवढी चीड निर्माण केली. मग पोट फुगेस्तोवर खाऊन देखील भूक न भागलेले, आणि पुढच्या सात पिढ्यांची तरतूद स्वीस बँकेत करून ठेवणारे भ्रष्टाचारी, त्यांची किळसवाणी भूक बघून सगळे गप्प का बसतात?

टारोबाचे डब्बल अभिनंदन !!!

लेखक पक्का इडियट यांनी शनिवार, 16/04/2011 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे परममित्र हभप (हळूच भलते पहाणारे) परमपूज्य श्री श्री श्री १००००००००००००००००००००००००००० टारोबा महाराज यांचा लेख सामनाच्या फुलोरामधे आलेला आहे. http://www.saamana.com/2011/April/16/Link/FULORA1.HTM त्याचा आम्हाला फार फार आनंद झाला आहे इतकेच काय http://www.saamana.com/2011/April/16/Link/FULORA3.HTM हा लेख सुद्धा त्यानेच लिहिला आहे. फक्त त्यात खाली त्याचे नाव नाही छापले गेले हरकत नाही.. नावात काय आहे.. विचार महत्वाचा.. लेख महत्वाचा... !!!

दूर वाट अशी ही छळणारी

लेखक निनाव यांनी शनिवार, 16/04/2011 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
दूर वाट अशी ही छळणारी वळणावर अलगद निजणारी; रात्र मोजती अंतर किती अंतरावर तुझ्या ही सळणारी. ह्रदयी टोचते ही पानगळ मनास बोचतो गार वारा; येशील कधी तु सांग सख्या रे झुंझते वात ही विझणारी. नागिण विरहाची भिरणारी आवळते पाश भोवती मज असा; येशील कधी तु सांग सख्या रे विषदंश हर-क्षण ही घेणारी. खडू आठवणींचे नदीत टाकतांना तरंग एक एक उठणारी; येशील कधी तु सांग सख्या रे जगेल तरंग का ही विरणारी.

कार्ट्यांस...

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...