Skip to main content

निमंत्रण - इंक्रेडीबल फोर्टस ऑफ इंडिया !

लेखक मालोजीराव यांनी मंगळवार, 19/04/2011 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्गअभ्यासक प्रमोद मांडे यांनी टिपलेल्या देशभरातील दुर्गांच्या छायाचित्र प्रदर्शनाला शुक्रवारपासून बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात सुरवात होत आहे. येत्या २२ ते २७ एप्रिल च्या दरम्यान सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. सर्व दुर्गप्रेमी,शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील दुर्गम किल्ल्यांच्या छायाचित्रांसह कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, केरळ अशा विविध राज्यांतील किल्ल्यांची चारशेहून अधिक छायाचित्रे प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

जिंदगी क्या राज ही ?

लेखक बन्या बापु यांनी मंगळवार, 19/04/2011 04:26 या दिवशी प्रकाशित केले.
ही गझल माझी नाही.. पण आज कोण जाणे खूप आठवते आहे... आशुतोषदादा जगणे तुझ्या कडुन शिकावे.. त्या दिवसातली ती प्यास आज जीव कासावीस करून जाते आहे. सगळी गझल आता आठवत नाहि.. तरिही.. ------------------------------------------------------------------------------ हे खुदा मुझको बता, येह जिंदगी क्या राज ही ? आजतक वोह हमसे, हम उनसे नाराज है कर तलब यु जाम-ए-उल्फत कौन पिता है यहा ? अश्क पी पी कर बहकना येह मेरा अंदाज है.. ------------------------------------------------------------------------------ अशीच अजुन एक... कवी आज आठवत नाही..
काव्यरस

प्रेरणा (शिर्षक बदल).

लेखक निनाव यांनी मंगळवार, 19/04/2011 03:01 या दिवशी प्रकाशित केले.
***नवीन शिर्षक कवितेच्या संदर्भास अधिक जवळ आहे असे वाटले, म्हणून हा बदल.*** तु आलीस? - चला बरं वाटलं कुठे गेली होतीस मला असंच सोडून? कल्पना तुला काही? दमलो किती मी होतो तुला इथं तिथं शोधून! प्राणच गेले होते जणु माझे निघून थांग पत्ता नव्हता ठाउक कुणा - पुरता थकलो होतो विचारून!! मात्र, देव कॄपेनं माझ्या परतलीस पुन्हा - हायसं वाटलं तु आलीस!! - चला बरं वाटलं माझे हातच सुटले होते हाता मधुन आणिक श्वास सुटले होते श्वासा मधुन नसती आलीस पुन्हा तु जर आलीच नसती कधी पुन्हा तु परतण्यासाठी अगं वेडे सापडलो तरी असतो का इथे तुला? कल्पनाच नव्हती तु अशी येशील परत करशील मजवर प्रेम तसंच काही-का-होईना.. असो!!

सरुटॉबाने कट्टा - एक सुरुवात

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 19/04/2011 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
१७ एप्रिल,रात्रीचे साडेसात वाजलेले, पुण्याच्या हद्दीबाहेर थोड्याश्या सुनसान रस्त्याच्या बाजुला एका मोठ्या इमारतीसमोर दोन धिप्पाड तरुण थोड्याश्या अंधारात उभे. समोरुन एक गाडी येते, कर्र्र्र्र्र ब्रेक दाबुन बंद पडते, एक दोन वेळा सुरु होते पुन्हा बंद पडते, त्या दोन्ही तरुणांच्या चेह-यावर हसु येतं, त्यांचे हात खिशात जातात, पुढ्च्याच क्षणी बाहेर येतात, तेवढ्यात गाडी पुढं जाते, त्या तरुणांचे हात पुन्हा खिशात. ते परत अंधारात सरकतात. गाडी थोडी पुढं जाउन पुन्हा त्या तरुणांच्या दिशेने येते, पुन्हा कर्र्र्र्र्र्र ब्रेकचा तोच आवाज पण यावेळी गाडितुन दोघं जण खाली उतरतात, त्या तरुणांच्या दिशेनं जायला लागतात.

चाललंय काय हे????

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 18/04/2011 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
मायबाप महाराष्ट्र सरकारने एका "जल संपत्ती नियमन सुधारणा "नामक विधेयकावर रात्री १:२० मिनिटानी मतदान घेवून ते विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करून घेतले आहे. या विधेयकानुसार पाणीवाटपाचा पिण्यासाठी त्यानन्तर शेतीसाठी आणि त्यानन्तर उद्योगांसाठी असा असलेला अग्रक्रम बदलून पिण्यासाठी उद्योगासाठी आणि सर्वात शेवटी शेतीसाठी असा करून घेतला आहे. विधेयकातील इतर तरतूदीनुसार या विषयावर न्यायालयात जाता येणार नाही.

रामदेव बाबा आयुर्वेदाचे व्यायवसायिकीकरण करत आहेत का ?

लेखक सुनिल पाटकर यांनी सोमवार, 18/04/2011 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
अखिल भारतीय आखाडा परिषदेने योग गुरु रामदेव बाबा आयुर्वेदाचे व्यायवसायिकीकरण करीत असून पारंपरिक औषधे अधिक किमतीत विकत असल्याची टीका केली आहे.रामदेव बाबा स्वदेशीच्या मुद्‌द्‌यावरही दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप परिषदेचे प्रवक्ते बाबा हठयोगी यांनी केला आहे. आपल्याला या विषयी काय वाटते ?

काय वाटल असेल माझ्या जीवाला...........

लेखक शिल्पा कांबळे यांनी सोमवार, 18/04/2011 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
चाललो होतो एकटाच एका वाटेवरुन तु भेटलीस आणि सुरुवात झाली नव्या आयुष्याला आनंद वाटु लागला माझ्या जीवाला पुन्हा रोज येऊ लागलो कॉलेजला एक दिवस धाडस करुन विचारल मी तुला तु नाही म्हंटल नाही, पण टाईमच नाही उरला अभ्यासाला श
काव्यरस

कोल्हापुर वारी...

लेखक किसन शिंदे यांनी सोमवार, 18/04/2011 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, नुकतीच पार पडलेली ज्योतिबाची यात्रा आणि महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात स्त्रियांना मिळालेला प्रवेश..... या निमित्ताने काही फोटूरूपी आठवणी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. ३१ डिसेंबर ...... नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण मुंबई नगरी पार्ट्या झोडण्यात आणि नविन वर्षाचे संकल्प करण्यात (की मोडण्यात) दंग होती आणि त्याच वेळेला कोणतीही पूर्वनियोजित तयारी नसताना कोल्हापूरला जाण्यासाठी आम्ही मुंबापुरीचा निरोप घेतला.