मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेरणा (शिर्षक बदल).

निनाव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
***नवीन शिर्षक कवितेच्या संदर्भास अधिक जवळ आहे असे वाटले, म्हणून हा बदल.*** तु आलीस? - चला बरं वाटलं कुठे गेली होतीस मला असंच सोडून? कल्पना तुला काही? दमलो किती मी होतो तुला इथं तिथं शोधून! प्राणच गेले होते जणु माझे निघून थांग पत्ता नव्हता ठाउक कुणा - पुरता थकलो होतो विचारून!! मात्र, देव कॄपेनं माझ्या परतलीस पुन्हा - हायसं वाटलं तु आलीस!! - चला बरं वाटलं माझे हातच सुटले होते हाता मधुन आणिक श्वास सुटले होते श्वासा मधुन नसती आलीस पुन्हा तु जर आलीच नसती कधी पुन्हा तु परतण्यासाठी अगं वेडे सापडलो तरी असतो का इथे तुला? कल्पनाच नव्हती तु अशी येशील परत करशील मजवर प्रेम तसंच काही-का-होईना.. असो!! - तुला माझी झाली आठवण हेच खूप झालं तु आलीस!! - चला बरं वाटलं जाउ नकोस पुन्हा असे कधी सोडून तुझी शप्पथ, जातो मी पुर्णतः मोडून तुझ्या नसण्यानं होतात गं हाल माझे कुणी विचारत नाहि मला संपल्यासारखे सगळे कसे जाते वाटून माझ्या प्रेरणे सांग मला जर माझं म्हणणं असेल कुठं चुकलं मात्र, परतलीस पुन्हा - हायसं वाटलं!! तु आलीस!! - चला बरं वाटलं संदर्भः आवर्जुन सांगण्यासारखे आहे असे काही. (पाषाणभेद, ह्यांच्या उत्स्फुर्त प्रतिक्रिये नंतर हे संदर्भ इथे आपल्या सर्वांसोबद शेयर करावेसे वाटून गेले). ही कविता मला काल सुचली काल ऑफिस मधून काल घरी प्रवास करतांना... शेजारील सीट वर एक मुलगा त्याच्या मित्रा ला नुकतेच तो गांजा/अफू च्या सवयी तून - त्याच्या प्रेरणे मुळे कसा सुटला हे सांगत होता.. आणिक त्याची प्रेरणा होती -मित्रांनी त्या साठी केलेले भरसक प्रयत्न आणिक एक संधि - जी त्यास मिळली होती - इथे एका फुट्बाल च्या टीम मधे खेळ्ण्याची. तो पुर्वी एक चांगला खेळाडू होता असे तो सांगत होता. पण ह्या वाइट सवयी मुळे त्या ला काढण्यात आले होते. काही काळ निराशेचा गेला असे तो सांगत होता. दरम्यान, त्याच्या मित्रांनी टीम कोच कडे मागणी धरली आणि तो नशा सोडून सिरियसली स्पोर्ट्स वर लक्ष केंद्रित करेल अश्या अटी वर त्याला घेण्यात येईल असे सांगण्यात आले. आणिक मग त्याची काही मित्र त्याला ते सांगण्यासाठी त्याच्या घरी गेली. तेन्व्हा मित्रांनी त्याला पुन्हा खेळाकडे खेचण्याची इतुकी प्रामाणिक धडपड पाहून त्याने ठरविले कि तो सुद्धा प्रयत्न करेल.. आणिक, काल त्याची मेडिकल टेस्ट देउन तो परत येत होता..रिजल्ट पोजिटिव्ह होते हे त्याच्या स्मित वरून कळंतच होते. त्याच्या भावना शब्दांत उतरविणे हा माझा फक्त छोटा सा प्रयत्न.

वाचने 1799 वाचनखूण प्रतिक्रिया 10

प्रकाश१११ 19/04/2011 - 07:08
निनाव - जाउ नकोस पुन्हा असे कधी सोडून तुझी शप्पथ, जातो मी पुर्णतः मोडून तुझ्या नसण्यानं होतात गं हाल माझे कुणी विचारत नाहि मला संपल्यासारखे सगळे कसे जाते वाटून छानच जमलेय. वा..!!

निनाव 19/04/2011 - 09:57
पाभे, प्रकाश दा : आभार. पाभे: हो, छान वाटावे , असेच काही तरी आहे ह्या कविता लिहिण्या मागचे कारण. :) संदर्भ जोडलेला आहे आपली उत्स्फुर्त प्रतिक्रिया वाचल्या वर.

मिसळलेला काव्यप्रेमी 19/04/2011 - 11:34
छान वाटल!!

पाषाणभेद 19/04/2011 - 16:19
निनाव: असल्याच छोट्या छोट्या गोष्टींकडे जर उघड मनाने जर बघितले तर काही चांगल्या गोष्टी तर दिसतातच पण काही वेळा मन खंतावणार्‍या गोष्टीही मनाच्या नजरेला येतात. नाव आठवत नाही पण ६० की ७० व्या दशकात एक मराठी कवी होते. त्यांना एका ऑलिंपीक मध्ये कसरत करणार्‍या व उंच उडी मारणार्‍या मुलीच्या कृतीत कविता सापडली होती. आणखी असेच मला नाव माहीत नसलेले कवि होते. ते सौराष्ट्रात द्वारकेला श्रीकृष्णाच्या मंदिरात गेले होते. तेव्हा आरती चालू होती अन तेथे गुलाल उधळत होते. त्यावेळी तो गुलाल त्यांच्या अंगावर सांडला व त्यांना त्या विषयावर कविता सुचली. (काय योगायोग आहे! वरील दोन्ही उदाहरणात मला नाव माहित नसलेले कवि आहेत अन तुमचेही नाव निनाव आहे!) आणखी एक: नागपुरकडे काही सुधारकांनी त्यांच्या गुरूच्या सांगण्यावरून सरकारी कागदपत्रांत 'अजात' अशी 'जात' लावायला सुरूवात केली. नंतरनंतर 'अजात' हिच त्यांची जात आहे असे ग्राह्य धरण्यात आले! (थोडक्यात आपल्याकडे जात जाणार नाहीच. (आमची मागची जातीवरची कविता फुकट गेली तर!)) असो. काहीतरी सुचणे, ते कागदावर उतरवणे हे जागृत मनाचे काम आहे. आपणाला शुभेच्छा!

In reply to by पाषाणभेद

निनाव 19/04/2011 - 17:12
सह्ही. खूपच सुंदर उदाहरणे, आश्चर्यजनक योगायोग!! वेळ काढून हे सर्व माझ्या सोबत वाटले त्याबद्दल विशेष आभार पाभे. :)