Skip to main content

जाणीव ,नेणीव आणि फ्री विल ह्यांची ऐसी तैसी

लेखक भागो यांनी बुधवार, 16/03/2022 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटे म्हणा किंवा सकाळी म्हणा सहा वाजले की तात्याचा मोबाइल तात्याला विसाव्या शतकातील गोड गोड गाणी ऐकवून जागा करतो. तुम्ही काहीही म्हणा पण तात्याला स्वतःला विसाव्या शतकातील गाणी फार आवडतात. त्या वेळी कोणी लता मंगेशकर नावाच्या एक गायिका होत्या त्यांचा गळा गोड होता. त्यांनी गायिलेल्या बऱ्याच गाण्यांचा संग्रह तात्याकडे आहे. हा गाण्यांचा संग्रह तात्याला कसा मिळाला? सगळं सांगत बसलो तर वेळ लागेल. पुन्हा केव्हातरी. सगळ्यांत आधी कॉफी! त्याशिवाय तात्याचा दिवस सुरु कसा होणार? तात्याने कॉफी मेकर स्विच ऑन केला.

मुखवटे.

लेखक Deepak Pawar यांनी मंगळवार, 15/03/2022 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
रंग पाण्यास ना, हे तसे चेहरे थांग लागेच ना मन किती गहिरे व्देष माडापरी, प्रेम झाले थिटे चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे. पुण्य गेले कुठे, पाप शिरजोर हे सभ्य वेषात या नांदती चोर हे दान देण्या निघे अन जगाला लुटे चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे. शब्द फुलापरी मनी निखारा जळे वेष संतापरी हृदयी विषारी तळे लुच्चे फिरती इथे साव गेले कुठे चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे.
काव्यरस

होळी रे होळी, पुरणाची पोळी.

लेखक देवीका यांनी मंगळवार, 15/03/2022 06:22 या दिवशी प्रकाशित केले.
आता पुरण्पोळीची कसली आलीय कृती. म्हणजे त्यात काय नवीन. पण , कणीकेची सुद्धा तलम , मऊ अशी पोळी होते हेच ह्या विडिऑतून दाखवलेय. शास्त्रीय दृष्ट्या ह्याला, ऑटोलाईझ म्हणतात. ह्यात कणीक ज्यास्त काळ भिजळ्याने, तिचा दाणा न दाणा भिजतो व त्यातील ग्लुटन वाढते. व हेच पोळीला मौ बनवते. तर ह्या वर्षी, कणीक अश्या रीतीने भिजवून पुरणाची पोळी करून पहा. मी कृती देत नाहीये तर तुम्ही विडिओ पहाच. हा माझा विडिओ पुरणपोळीचा,

हे वाचा: शेष प्रश्न

लेखक अनुस्वार यांनी मंगळवार, 15/03/2022 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
कटाक्ष: भाषा- हिंदी (मूळ बंगाली) लेखक- शरच्चंद्र चट्टोपाध्याय प्रकाशन- डायमंड बुक्स प्रथमावृत्ती- १९३१ पृष्ठसंख्या- २०८ किंमत- ₹१५० ISBN : 978-81-7182-917-1 ओळख: कहाणीचा काळ स्वातंत्र्यपूर्व, वीसाव्या शतकाचा पूर्वार्ध. सगळे कथानक आग्र्यातल्या बंगाली वस्तीत घडते. आशु बाबु, अविनाश, हरेन्द्र, अक्षय आणि इतर ही बंगाली भद्र मंडळी. संस्कृतीचे पाईक आणि पूजक अशा या मंडळींची गाठ पडते कथेची नायिका कमल हिच्याशी (कथेला नायक नाही!). कमल आणि तिचा गायक पती शिवनाथ यांच्या विवाहाची वैधता ते कमलचे कुळ, जात इ.

माझी राधा - २

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 14/03/2022 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
न ठरवताही अचानक कोमल ऋषभ स्वर येवून जातो. जीव कसावीस करणारा हा स्वर.एक तर तन्मय होऊन आसपासाच्या जगाला विसरून उत्कटतेने वाजवत रहावे किंवा सर्वसंग परित्याग करून दूर कुठेतरी निघून जावे अशी काहीशी भावना जागवणारा हा स्वर.
आजकाल हे असं का झालं आहे तेच समजत नाही. या राज्यकारभारापासून दूर कुठेतरी निघून जावे असे वाटते पण एकटेपणाला आपण घाबरतोय. दिवस राज्यकारभारात व्यतीत होतो. कामात मग्न असल्यामुळे एकटेपणाची जाणीव होत नाही. रात्री एकटे असल्यावर डोक्यात विचारांचे काहूर माजते. सगळा इतिहास डोळ्यापुढे येत रहातो. उगाचंच.

B A T A

लेखक भागो यांनी सोमवार, 14/03/2022 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
B A T A बबड्या बाबांच्या कुशीत शिरला. बबड्या दिवसभर न्यूटन, आईनस्टाईन, हायझेनबर्ग, स्क्रोडींजर, नील्स भोर, झेलींजर वा फाईनमन ह्यांच्या बरोबर गप्पा मारण्यात गुंग असला तरी रात्र झाली की त्याला बाबांची कुशी आठवत असे. “बाबा, गोष्ट सांगा ना.” “ठीक आहे. ऐक, एक होता राजा-------“ गोष्ट ऐकता ऐकता बबड्या केव्हाच झोपी गेला. “समोरच्या फ्लॅटमध्ये कोणीतरी रहायला येणार आहे.” रामभाउंनी बोलता बोलता बायकोला म्हणजे पुष्पाला सांगितले. “फॅमिलीवाले असतील तर बरं. मला मेलीला तेवढीच कंपनी होईल. कोणी रहायला आले तर बिचाऱ्या फ्लॅटला फ्लॅटपणा येईल.” “पहा काय होतं ते.”. सात आठ दिवसांनी---- सकाळी रामभाऊ चहा पीत होते.

कृष्ण जन्मभूमी आंदोलन

लेखक निनाद यांनी रविवार, 13/03/2022 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
-इतक्यातच हे विकिवर लिहिले तोच लेख येथे पुनरुक्तीचा दोष पत्करून घेतो आहे.- कृष्ण जन्मभूमीची इतिहास कृष्ण जन्मस्थान मंदिर परिसर हा मल्लापुरा, मथुरा, उत्तर प्रदेश, येथील हिंदू मंदिरांचा समूह आहे. येथे भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. हे मंदिर भारतातील सर्वात जास्त भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक आहे. जन्माष्टमी, दिवाळी आणि होळी हे प्रमुख हिंदु सण येथे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकापासून या ठिकाणाला धार्मिक महत्त्व आहे.

शान्तिपुर्ण अपमृत्यु

लेखक शेर भाई यांनी शनिवार, 12/03/2022 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
ये उन दिनो कि बात है, जेव्हा नुकतच मिसरूड फुटायला लागली होती. विद्यालयातून महाविद्यालयात जाण्याचे दिवस सुरु झाले होते. सक्काळी उठून पहिले लेक्चर गाठणे आणि मग इतर महाविद्यालयिन कर्तव्ये आटपून जेव्हा मी आमच्या स्थानिक गोतावाळ्यासह स्टेशनच्या बस डेपोला यायचो तेव्हा दुपारच्या अधिवेशानातल्या मैना - बकुळांची हि भलीमोठी गर्दी आमच्या सोबतीला असे. (आमच्याकडे त्या काळापासून फक्त महिलांचे असे एक महाविद्यालय आहे.) त्या भर गर्दीत देखील आपली आवडती खिडकी मिळत नाही तो पर्यंत येणारी बस सोडायची चंगळ आम्ही करत असू. कोणालाही खर वाटणार नाही पण बेस्टची “झिरो वेटिंग बस सेवा” हा प्रकार आमची मदत करायचा.

एकोणतीस नव्वे एकसष्ठ दोन.

लेखक आजी यांनी शनिवार, 12/03/2022 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी एक "झोल" म्हणतात तसा झाला. माझं आणि झोपेचं वाजलं. ती काही माझं ऐकेना. माझ्या डोळ्यांत उतरेना. रात्रभर झोप नाही. क्वचित कधीतरी लागलीच तर तास दोन तास. रात्री बारा , बारा,एक, एक वाजेपर्यंत मी तळमळायची.(प्रेमात पडलेली नसतानाही) नंतर जरा झोप येतेय असं वाटायचं तर बाथरुमला लागायची. तिकडं जाऊन आल्यावर पुन्हा झोपेची आराधना. सफल होगी तेरी आराधना, काहेको रोए।असं म्हणून मी माझं समाधान करुन घ्यायची. पण छेः! झोप माझ्याशी फटकूनच वागायची. पहाटे साडेतीन नंतर डोळे जरा जड व्हायचे तर साडेपाच वाजता नेहमीच्या वेळेला मी टक्क जागी. मग उगीचच योगासने प्राणायाम करायची.