मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुखवटे.

Deepak Pawar · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
रंग पाण्यास ना, हे तसे चेहरे थांग लागेच ना मन किती गहिरे व्देष माडापरी, प्रेम झाले थिटे चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे. पुण्य गेले कुठे, पाप शिरजोर हे सभ्य वेषात या नांदती चोर हे दान देण्या निघे अन जगाला लुटे चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे. शब्द फुलापरी मनी निखारा जळे वेष संतापरी हृदयी विषारी तळे लुच्चे फिरती इथे साव गेले कुठे चेहर्‍यावर इथे मुखवटे... मुखवटे.

वाचन 4473 वाचनखूण प्रतिक्रिया 13

राघव Wed, 03/16/2022 - 16:26
आवडली कविता. पुलेशु. खूप दिवसांनी साव हा शब्द आला वाचण्यात. :-)

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 03/17/2022 - 12:09
सध्याच्या फेसबुक व्हॉट्सप ट्विटर आणि इन्स्टाच्या काळात हे मुखवटे जास्तच अभेद्य आणि चेहर्‍याला घट्ट चिकटणारे झाले आहेत. इतके की ते जर ओढून काढायचे म्हटले तर खरा चेहराच फाटून भेसुर होईल. एकाच वेळी अनेक मुखवटे घालण्याची सुध्दा आजकाल मोठी फॅशन आलेली आहे. पैजारबुवा,

श्रीगणेशा Sat, 03/19/2022 - 12:33
रंग पाण्यास ना, हे तसे चेहरे थांग लागेच ना मन किती गहिरे
खूप छान! प्रत्येकजण सभोवतालच्या समाजाने ठरवून दिलेले मुखवटे घालूनच जगत असतो.

बाजीगर Sat, 03/19/2022 - 19:38
सरड्या सम नेते, रंग बदलती सारखे शिवीगाळ न चिखल, फेकती मारके रोजच इथे होळी शिमगा हेचि पटे चेह-यावर इथे मुखवटे... मुखवटे

In reply to by बाजीगर

Deepak Pawar Mon, 03/21/2022 - 10:11
सरड्या सम नेते, रंग बदलती सारखे शिवीगाळ न चिखल, फेकती मारके रोजच इथे होळी शिमगा हेचि पटे चेह-यावर इथे मुखवटे... मुखवटे छान....